Showing posts with label पल्लवी पाटील. Show all posts
Showing posts with label पल्लवी पाटील. Show all posts

Monday, 4 November 2019

अभिनेत्री पल्लवी पाटीलने सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला वाढदिवस

ट्रिपल सीट’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटील अभिनयक्षेत्रासोबतच समाजसेवेतही सक्रिय असते. ती नेहमीच वेगेगळ्या संस्थांसोबत राहून समाजकार्यात आपला खारीचा वाटा उचलत असते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाजसेवी संस्थांसोबत काम करणा-या पल्लवीने नुकताच आपला वाढदिवस मुंबईतल्या अनाथमुलांसह साजरा केला.
पल्लवी पाटील सांगते, मी जळगाव आणि पुण्याजवळच्या सामाजिक संस्थांमध्ये जाऊन कार्य करत असल्याने माझ्या वाढदिवशी मी ब-याचदा तिथे किंवा मग आई-वडिलांसोबत गावी असते. पण यंदा पहिल्यांदाच मी कामानिमित्ताने मुंबईत असल्याने माझा वाढदिवस मी मुंबईतल्या एका सामाजिक संस्थेतल्या मुलांसोबत साजरा करायचा ठरवला.
पल्लवी पाटील पूढे सांगते, वात्सल्य सामाजिक संस्थेच्या लहान मुलांना आणि शिक्षकांना भेटून मला वर्षभरासाठी सकारात्मक उर्जा मिळाली आहे. ह्या निरागस मुलांनी माझ्यासाठी गाणी गाऊन वाढदिवसाचं झालेलं उत्स्फर्त सेलिब्रेशन आठवणीत राहणारं आहे.

Wednesday, 10 April 2019

अभिनेत्री पल्लवी पाटीलचे नवे फोटोशूट, स्वत: डिझाइन केलेल्या स्टाइलिश कपड्यांमध्ये केले फोटोशूट


 ‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे अशा सिनेमांतून दिसलेली स्टाइलिश अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. ह्या फोटोशूटमधून तिचा इंडो-वेस्टर्न लूक तिच्या चाहत्यांसमोर रिविल झाला आहे. ह्या फोटोशूटचे वैशिष्ठ्य म्हणजे, ह्यात घातलेले सर्व कॉस्च्युम्स हे तिने स्वत: डिझाइन केलेले आहेत. आणि ते तिच्या आईच्या साड्यांचे बनलेले आहेत.
साड्यांचे ड्रेस डिझाइन करण्याच्या आपल्या आवडीविषयी सांगताना पल्लवी पाटील म्हणते, “माझ्या आईच्या अनेक आठवणी तिच्या साड्यांशी निगडीत आहेत. आणि त्यामूळेच तिला तिच्या साड्या जुन्या झाल्यावर टाकायला भावनिकदृष्ट्या किती कठीण जातेहे मी लहानपणापासून पाहत आलीय. तिच्या साखरपुड्यापासून ते आजवरच्या अनेक घरगुती सण-समारंभांपर्यंतच्या साड्या ती किती जपून ठेवतेहे पाहिल्यामूळेच ही नामी शक्कल डोक्यात आली की,आईच्या साड्यांचे ड्रेस बनवले तर स्टाइलफॅशनभावना ह्या सगळ्याचीच जपणूक होईल.
पल्लवी पाटीलने फॅशन डिझाइनिंगचे कोणतेही तंत्रशुध्द प्रशिक्षण घेतलेले नाही. तरीही तिच्या डिझाइन्सना तिच्या मैत्रीणी आणि जवळच्या लोकांची पसंती मिळते. पल्लवी सांगते, “इतर कोणाहीपेक्षा आपल्याला आपल्या शरीराची ठेवण आणि आवड ह्याची जास्त जाण असते. त्यामूळे मला काय साजेसे दिसेल,कोणत्या रंगसंगतीत मी उठून दिसतेकोणते मटेरिअल मला चांगले वाटेलहे माहित असल्याने साडीचे ड्रेस शिवताना मला माझ्या कम्फर्टप्रमाणे कपडे शिवता येतात. तुम्ही कशा प्रकारची स्टाइल कॅरी करू शकता ह्यावरून तुमची पर्सनॅलिटी कळतेअसं मला वाटतं. “ 
ती पूढे म्हणते, “अवॉर्ड फंक्शन्सच्या रेड कार्पेटवरही मला आता साड्यांचे डिझाइनर ड्रेस घातल्यावर चाहत्यांकडून  आणि विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतल्या डिझाइनर्सकडून माझ्या ह्या कलेसाठी कॉम्प्लिमेन्ट मिळायला लागल्या आहेतत्यामूळे तर आता साड्यांचे ड्रेस बनवायची कला जोपासायचा अजून हुरूप आला आहे.  ''