Showing posts with label पूजाचं झकास स्टाईल स्टेटमेंट!!!!. Show all posts
Showing posts with label पूजाचं झकास स्टाईल स्टेटमेंट!!!!. Show all posts

Wednesday, 18 September 2019

पूजाचं झकास स्टाईल स्टेटमेंट!!!!



तुम्हाला 'साजणा' मालिकेतील रमा आठवत असेल. साधी, सालस आणि सोज्वळ अशी ही रमा, आज घराघरात जाऊन पोचली आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या 'झी युवा' वाहिनीच्या मालिकांमधील 'साजणा' ही अशीच एक प्रेमकहाणी आहे. अभिजित श्वेतचंद्र आणि पूजा बिरारी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेची कथा एका गावात घडते. गावातल्या साध्या मुलीची भूमिका साकारताना, सलवार-कमीझ, त्यावर ओढणी असा सोज्वळ पेहराव करणारी पूजा खऱ्या आयुष्यात मात्र फारच बोल्ड आहे.
अनेकदा कलाकारांचं ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन आयुष्य यात साधर्म्य असतं. पूजाच्या 'स्टाईल स्टेटमेंट'च्या बाबतीत मात्र ही गोष्ट खोटी ठरते. सोशल मीडियावर असलेले तिचे फोटो बघून ही गोष्ट लगेच लक्षात येईल. टीव्हीवर अगदीच सोज्वळ दिसणाऱ्या पूजाचे झकास फोटो पाहून तोंडात बोट घालण्याची वेळ नक्कीच येईल. तिच्या इन्स्टावर तुम्हाला फॅशनचे विविध नमुने पाहायला मिळतील. निरनिराळ्या प्रकारच्या आकर्षक वेशभूषा करणं आणि त्यात प्रत्येक वेशभूषेत सुंदर दिसणं यात पूजाचा हातखंडा आहे. बॉलीवूड जगतातील आघाडीच्या अभिनेत्री तापसी पन्नू आणि सोनम कपूर यांच्याकडे ती फॅशनमधील आदर्श म्हणून बघते. अर्थात, मराठी टीव्ही जगतातील या अभिनेत्रीची फॅशनदेखील एक 'स्टाईल स्टेटमेंट' झालेली आहे. नेहमी पूजाला सध्या पेहरावात पाहणाऱ्या तिच्या चाहत्यांना तिचा हा 'बोल्ड लुक' नक्कीच आवडेल.