Showing posts with label बाळूमामा. Show all posts
Showing posts with label बाळूमामा. Show all posts

Thursday, 16 July 2020

बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात !


मुंबई १६ जुलै, २०२० : संत बाळूमामायांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते आहे. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान बनलं आहे.अवघा महाराष्ट्र “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या जयघोषाने दुमदुमला. बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना मालिकेतून घडत आहे. दिनदुबळ्यांचा कैवार घेणारे, गरीबांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे, भक्ताच्या हाकेला धावून जाणारे संत बाळूमामा, त्यांच्या अगाध लीलांची गाथा, मालिकेचे नवेआपल्या भेटीला येत आहेत भाग २१ जुलैपासून संध्या ७.३० वा. कलर्स मराठीवर ... मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून शासनाच्या नियमांचे योग्य पालन करून आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या चित्रीकरणाला जोरात सुरुवात झाली आहे...
                  याबद्दल बोलताना मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते - संतोष अयाचित म्हणाले, “ टेलीव्हिजन इंडस्ट्रीइतिहासात प्रथमच अशा पद्धतीने बंद पडली,परंतुसरकार,टिव्हीवाहिनी,प्रमुख निर्माते ह्यांच्याप्रयत्नाने पुन्हा चित्रीकरण सुरु झाले आहे.संसर्ग होईल असे वातावरण असताना देखील सगळे कलाकार,तंत्रज्ञ ह्यांनीसर्वकाळजी घेऊन प्रत्यक्ष सेट वर येऊन कामकरायला सुरुवात केली आहे.बाळूमामाच्या नावानं चांगभलंहि मालिका कलर्स मराठीवर श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी संध्याकाळी ७.३०वा. पुन्हा सुरू होते आहे.ह्या काळात प्रेक्षकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बाळूमामा पुन्हा कधी दिसणार अशी विचारणा केली होती.प्रेक्षकांचे बाळूमामावर प्रेम आहे ,श्रद्धा आहे त्याचे कारण प्रत्यक्ष बाळूमामांनी आयुष्यभर अव्याहत सर्व स्तरातल्या माणसांसाठी जे कार्य केलं त्यात आहे.बाळूमामांनी केवळ उपदेश नाही केला तर असंख्य कुटुंबाचा,माणसांचा उत्कर्ष होईल असे त्यांना सहाय्य केले असंख्य माणसांना योग्य वाटेवर नेले.पाचराज्यात भ्रमण करताना माणसं त्यांच्याशी कायमची जोडली गेली आणि आज त्याचा विस्तार पहायला मिळतो आहे.बाळूमामांच्या चरित्राला आता खरी सुरुवात झाली आहे आणि त्यातले अद्भुत प्रसंग आणि भव्य चरित्रपट पहायला महाराष्ट्रातले प्रत्येक कुटुंब कलर्स मराठी पाहाला एकत्र येईल ह्याची आम्हाला खात्री आहे”.
नव्या भागांसोबत आम्ही येत आहोत तुमच्या भेटीला २१ जुलैपासून संध्या ७.०० वा. पासून कलर्स मराठीवर !

Monday, 19 August 2019

बाळूमामा भक्ताला मिळवून देणार खरीओळख ! बाळूमामाच्या नावानं चांगभलं सोम ते शनि रात्री ८.०० वा


 
मुंबई ७ ऑगस्ट२०१९ : बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये बाळूमामांनी नेहेमीच भक्तांचा उध्दार केला आहेत्यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत. आजवर बाळूमामांनी केलेले अनेक चमत्कार गावकर्‍यांनी अनुभवलेकाहींची बाळूमामांवर श्रद्धा जडली तर अनेकांनी बाळूमामांना कमी लेखले... तरीदेखील कोणाच्याही बोलण्याला न जुमानता बाळूमामांनी भक्तांची मदत करणे नाही सोडले. अशाच एका भक्ताला योग्य मार्ग दाखवण्यासाठी बाळूमामा सज्ज झाले आहेत...बाळूमामांच्या ह्या भक्तासमोर नेमकं काय संकट उभं ठाकलयं या संकंटातून बाळूमामा भक्ताला कसे वाट दाखवतीलकसे ते भक्ताला त्याची खरी ओळख मिळवून देतील या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. तेंव्हा नक्की बघा बाळूमामाच्या नावानं चांगभलं सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
गावामधील एका कुटुंबासमोर एक समस्या ओढवली आहे आणि ते म्हणजे गावातील पाटलाचे कुटुंब आहे... गावामधील पाटील श्रीमंत आहे त्याच्याकडे सगळे सुख आहे,संपूर्ण गाव त्याच्या म्हणण्यात आहे... पण त्याच्या मुलामध्ये काही दोष आहेत असे त्याला वाटते आहे... त्याच्या मुलाची लक्षण वेगळी आहेतत्याला बायकांप्रमाणे शृंगार करायला आवडते आणि त्यामुळेच तो आणि त्याची पत्नी चिंतेत आहेत... दुसरीकडे पाटलाची बायको महादेवाची भक्त आहे... आपल्या मुलाचे सगळे नीट व्हावेलग्न करण्यास तो तयार व्हावा यासाठी ती महादेवाला साकड घालते... पाटलाच्या मुलाचा लग्न करण्यास नकार आहे. त्याच्या नकाराच्या मागचे कारण गावाला माहिती नाहीये परंतु घरातील लोकांना माहिती आहे कीतो तृतीय पंथातील आहे.... बाळुमामा भक्ताची ही समस्या कशी दूर करतील तो लग्न करण्यास तयार होईल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

Friday, 28 June 2019

बाळूमामाच्या नावनं चांगभलं मालिकेमध्ये संपन्न होणार बाळूमामा आणि सत्यवाचा विवाहसोहळा !

मुंबई २८ जून, २०१९ : कलर्स मराठीवर सुरु असलेली बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिका आता एका महत्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन पोहचली आहे.मालिकेमध्ये अखेर  बाळूमामा आणि सत्यवा यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे... पहिल्यापासून बाळूमामांचा सत्यवाबरोबर लग्न करण्यास नकार होता.. अनेक प्रयत्न करूनही बाळूमामा लग्नाला होकार देत नव्हते. मात्र सुंदराच्या सांगण्यावरून हलसिद्धनाथांचा कौल घेण्यास बाळू तयार होतो.. अखेर बाळूमामानी लग्नास होकार द्यावा यासाठी हलसिद्धनाथ बाळूमामांना कौल देतात त्यानुसार बाळूमामांसमोर सत्यावाशी लग्न करण्यावाचून पर्याय उरत नाही...कौल विरोधात गेल्यानंतरही बाळूमामा लग्न टाळण्यासाठी प्रयत्न करतात पण ते असफल होतात...अखेर बाळूमामा सत्यवाशी लग्न करण्यास तयार होतात... यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण...अनेक विरोधातून घडणार हे लग्न बाळूमामा आणि सत्यवाचा आयुष्यात अनेक नाट्यमय वळण घेऊन येणार आहे. बाळूमामा आणि सत्यवचा हा संसार कसा फुलणार हे बघणं रंजक ठरणार आहे. याचसोबत मालिकेत बाळूमामांच्या प्रपंच्याचात्यांच्या अपार प्रेमाचागोरगरिबांच्या  हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार प्रेक्षकांना घडणार आहे. प्रपंचाला सुरुवात तर झालीपण बाळूमामा आणि सत्यवाचे नाते कसे होते त्यांनी बाळूमामांना कशी साथ दिली कोणत्या अडचणी आल्या, आलेल्या संकंटाना ते कसे सामोरे गेले हा सगळा प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तेंव्हा नक्की बघा “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” सोम ते शनि संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर
सगळे मंगलमय सुरु असताना अजूनही अरिष्ट टळलेले नसूनविवाहाच्या शुभ प्रसंगी बाळूमामांनी सत्यवाच्या वडिलांना दिलेल्या  शापामुळे त्यांचा मृत्यू होतो.... आणि दु:खाच सावट सगळ्याच कुटुंबावर पसरते... आता पुढे काय होईल सत्यवा आणि सुंदरा बाळूमामांना माफ करू शकतील बाळूमामा सुंदराला शापामागचे कारण काय होते हे सांगू शकतील ? सत्यवा आणि बाळूमामांच्या संसारामध्ये आलेले हे अरिष्ट कस दूर होईल ?
हे जाणून घेण्यासाठी बघा “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” सोम ते शनि संध्या. ७.३० वा. आपल्या लाडक्या  कलर्स मराठीवर !!!