Showing posts with label बिग बॉस मराठी. Show all posts
Showing posts with label बिग बॉस मराठी. Show all posts

Sunday, 18 August 2019

बिग बॉस मराठीच्या घरामधून हीना पांचाळ बाहेर !

मुंबई ११ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठी सिझन 2 चा या आठवड्यातील WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकरांनी अभिजीत बिचुकलेंची, शिव - वीणाची शाळा घेतली. अभिजीत बिचुकले नेहेमीच चर्चेत असतात... मांजरेकर यांनी बिचुकलेंना घरात इतर सदस्यांची लायकी का काढता असा जाब विचारला. तर घरातील सदस्यांनादेखील बिचुकले यांची त्यांच्यासोबत राहण्याची लायकी आहे का ?' असा प्रश्न विचारल तेंव्हा त्यावर बहुतेक सदस्यांनी बिचुकले यांची त्यांच्यासोबत राहण्याची लायकी नाही असं उत्तर दिले. वूट आरोपी कोण यामध्ये रोहिणी यांनी शिवला आरोपी ठरवले. त्यांनी बिग बॉसची आणि आरोहीची माफी मागायला सांगितली, तर शिवला वीणा सोबत नव्हे तर आरोहसोबत डान्स सादर करावा अशी शिक्षा दिली. या आठवड्यात हीना आणि शिव हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले होते आणि कमी मत पडल्यामुळे हीनाला  घराबाहेर जावे लागले. वीणा खूप भाऊक झाली. येत्या आठवड्यात सदस्यांना कोणते नवे टास्क मिळणार कसा असणार त्यांचा हा येणारा नवा आठवडा ?  हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.     
घरामधून हीना बाहेर पडल्यावर अभिजीत बिचुकले यांनी गाणे सादर केले... हीनाला तिच्या आतापर्यंत घरातील प्रवासाची AV दाखविण्यात आली. 
सुप्रसिध्द राशीतज्ञ शरद उपाध्ये मंचावर आले आणि त्यांनी प्रत्येक सदस्यांना त्यांच्या राशीबद्दल सांगितले... त्यांनी प्रत्येक सदस्याची रास देखील संगितली आणि त्यांचे भविष्य... तर बिचुकलेंची रास कुठली आहे ? या प्रश्न मला देखिल ८४ दिवस पडला असे ते मजेत म्हंटले. वीणा आणि आरोह वृषभ राशीची असून त्यांनी शिवची वृश्चिक रास आहे आणि त्याचे वीणाशी कसे पटले हा प्रश्न आहे असे ते म्हणाले... शिवानी आणि नेहा या मकर राशीच्या आहेत... मकरही कष्टाळू रास आहे,बराच विलंब, अडथळे असतात आणि दिसतात तितके रागीट नसतात असे सांगितले. तर त्यांनी प्रत्येक राशीला अनुसरून मजेदार उदाहरण देखील दिली.
महेश मांजरेकरांनी सदस्यांना सल्ला दिला की कधी कधी डेंजर झोनमध्ये येण चांगल असत. प्रेक्षक काय विचार आहेत त्याचा अंदाज येतो. तर रागावर ताबा ठेवा असा देखील सल्ला दिला... घरातील किशोरी शहाणे सोडल्या तर सगळ्यांना रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले, त्यातल्या त्यात शिवानीने आता त्यावर नियंत्रण ठेवले आहे. घरामध्ये एक खेळ खेळण्यात आला ज्यामध्ये सदस्यांना गाण ओळखून डान्स सादर करायचा होता. वीणा आणि बिचुकले यांनी तू चिझ बडी है मस्त या गाण्यावर तर किशोरी शहाणे आणि अभिजित बिचुकले यांनी साकी साकी रे या गाण्यावर डान्स केला. तर वूट चुगली बूथमध्ये किशोरी शहाणे यांच्या चाहत्याने आरोहविषयी चुगली केली की नेहा आणि शिवानील सांगत होता की, कॅप्टन होण्यासाठी त्या योग्य नाहीत त्यावर आरोह आणि किशोरी यांनी स्पष्टीकरण दिले.
बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? कोण घराबाहेर जाईल हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन 2 सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर. 

Sunday, 4 August 2019

बिग बॉस मराठीच्या घरामधून रूपाली भोसले बाहेर !

मुंबई ४ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठी सीझन २ – WEEKEND चा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी घरामध्ये पुन्हा एंट्री घेतलेल्या अभिजीत बिचुकले पासून सगळ्यांनाच फैलावर घेतले... या आठवड्याच्या भागामध्ये देखील सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली... अभिजीत बिचुकले यांनी घरातील काही काम करण्यास नकार दिला,त्यांना महेश मांजरेकर यांनी कडक शब्दामध्ये खडसावले आणि कुठलेही काम करणे कमीपणा नसतोघरातील नियम हे पळावेच लागतात असा सल्ला दिला... तर शिव, वीणा आणि अभिजीत केळकरची देखील कानउघडणी केली. शिवला असे देखील सांगितले तू चांगला खेळतोस, बिग बॉसचा विजेता होण्याचे गुण तुझ्यात आहेत. परंतुवीणाची नेहमी वकिली करत असतोस त्यामुळे तू वाईट ठरतोस आणि वीणा विक दिसतेतर महेश मांजरेकर यांनी शिवची आई आणि अभिजीतच्या मुलाचा कौतुक केले की, त्याच्या मुलाला सगळ्यांची नवे माहिती होती... सदस्यांमधील गंमत, वाद विवाद सुरू राहिले... पीएन तो महत्वाचा क्षण आला ज्यामध्ये दर आठवड्याला एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असते. या आठवड्यामध्ये हीना, वीणा, अभिजीत बिचुकले, आरोह आणि रूपाली नॉमिनेट झाले होते... रूपाली आणि वीणा डेंजर झोनमध्ये आले पण रूपालीला मत कमी मिळाल्याने या आठवड्यामध्ये घरामधून नाएर जावे लागले. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन बनेल सदस्यांना कोणते टास्क मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.     
बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर रूपाली भोसलेला तिच्या आतापर्यंच्या प्रवासाची सुंदर AV दाखविली... एक विशेष अधिकार मिळाला आणि तिने ठरवल्याप्रमाणे हीनाला वाचवले. रूपाली म्हणाली मी हे ठरवले होते की मी तुला वाचवेन जेंव्हा मी इथे उभे असेन...
फ्रेंडशिप डे बद्दल सदस्यांना सरप्राइझ दिले... महेश मांजरेकर यांनी रीमा लागू यांच्याशी बोलणे का थांबवले आणि त्याचे त्यांना अजूनही वाईट वाटते असे सांगितले...  किशोरी शहाणे यांना अलका कुबल आठल्ये यांनी खास संदेश दिला आणि किशोरीचे कौतुक देखील केले... “ती गोड स्वभावाची आहे... मुळातच तिच्यात भांडणंतंटे, आक्रसताळेपणा नाहीये... आता तुझा स्पष्टवक्तेपणा दिसुदे, आरोप सहन करू नकोस” असे सांगितले... तर किशोरी यांनी देखील अलका कुबल यांच्या मैत्रीविषयी काही बाबी सांगितल्या... तर ऋजुता देशमुख हिने अभिजीत केळकरला संदेश दिले... तर शिवानीला खूप मोठे सरप्राईझ मिळाले कारण अजिंक्य ननावरे याने तिला संदेश दिला... तर शिवानीने उखाणा देखील घेतला. हीनाला सायरा शेख म्हणजेच कुकीने संदेश दिला. वीणाला अक्षया गुरवने संदेश दिला. राधा प्रेम रंगी रंगली मालिकेच्या सेटवरील काही किस्से सांगितले. रूपालीला सुशांत शेलारने सल्ला दिला. अभिजीत बिचुकलेंना सातारामधून तर खुद्द महेश मांजरेकर यांनी शुभकामना दिल्या... तर नेहाला आपला आवडता अभिनेता म्हणजेच जितेंद्र जोशीने प्रोत्साहन दिले. नेहाला आणि घरच्यांना अतिशय सुंदर संदेश दिला...  शिवला त्याच्या प्रिय मित्राने संदेश दिला. वूट आरोपी कोणमध्ये साधनाने शिव आणि वीणाला आरोपी ठरवले, आणि शिव आणि वीणाला शिक्षा दिली की दोन वाईट गुण सांगायचे होते... तर वूट चुगली बूथमध्ये शिवला त्याच्या चाहत्याने अभिजीत बिचुकलेंबद्दल चुगली केली.
बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल आणि कोण घराबाहेर जाईल हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.  

Wednesday, 12 June 2019

बिग बॉस मराठीच्या घरात वैशाली देणार संगीताचे धडे… अभिजीत बिचुकले शिकवणार इंग्लिशचे...

मुंबई १२ जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असणाऱ्या शाळा सुटली पाटी फुटली या कार्यामध्ये सदस्य विद्यार्थी बनून बराच दंगा घालत आहेत. आज प्रेम शास्त्राबरोबर संगीत आणि इंग्लीशचे क्लास देखील घरामध्ये भरणार आहेत... संगीताचा तास वैशाली म्हाडे तर इंग्लीशचा अभिजीत बिचुकले घेणार आहेत... सदस्य या क्लास मध्ये देखील बरीच धम्माल मस्ती करतील यात शंका नाही...
कुठल्याही प्रश्नाचे उत्तर सरळ देतील ते विद्यार्थी कुठले आणि हे तर बिग बॉसच्या घरातील सदस्य... वैशालीने विद्यार्थीना जेंव्हा विचारले संगीत म्हणजे काय तेंव्हा विद्याधर जोशी म्हणाले “संगीता”बद्दल मला नाही माहिती... संगीताबद्दल नाही तर गाण्याबद्दल बोलणे सुरु आहे असे वैशालीने सांगितले ... शेवटी सदस्यांच्या उत्तरांना आणि कल्ल्याला त्रस्त होऊन वैशालीने सांगितले गाण म्हणणेनाच करणे आणि एखाद वाद्य वाजवणे या तीन गोष्टींचा जिथे संगम होतो त्याला संगीत म्हणतात... यावर देखील दिंगबर नाईक यांचे उत्तर फारच गंमतीदार होते “मला वाटल लग्नाच्या आदल्या दिवशी जो कार्यक्रम होतो त्याला संगीत म्हणतात”.
BB विद्यालयमध्ये अभिजीत बिचुकले यांचा इंग्लीशचा तास देखील रंगणार आहे... हा क्लास घरामध्ये विशेष गमतीशीर असणार आहे... पराग आणि विणाने या क्लास मध्ये बिचुकले यांच्यासोबत बरीच धम्माल केली... बिचुकलेंचा इंग्लीशमध्ये बोलण्याचा प्रयत्न पुर्णपने दिसून येणार आहे... बिग बॉस यांनी सदस्यांवर हे कार्य सोपवून घरामध्ये वेगळीच गंमत आणली आहे... आज कोण नापास होईल कोण कॅप्टनसीच्या टास्क मधून बेदखल होईल कळेलच...
तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

Tuesday, 11 June 2019

बिग बॉस मराठीच्या घरात डोकावणार एक्स-कंटेस्टंट सई लोकुर !

अभिनेत्री सई लोकुर बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचली होती. आता पून्हा एकदा सई बिग बॉस मराठीच्या घरात डोकावत आहे. पण ह्याचा अर्थ ती बिग बॉसच्या घरात जाणार नाही आहे. तर बिग बॉसच्या घरातल्या रोजच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष घालून त्यावर भाष्य करणारा एक घर बारा भानगडी हा शो ती मराठी बॉक्स ऑफिस वर घेऊन आलीय.
ह्याविषयी अभिनेत्री सई लोकुर म्हणते, हा शो सुरू झाल्यापासून मला सोशल मीडियावरून माझ्या चाहत्यांचे सतत मेसेजेस येत होते. मी हा शो पाहते का, मला ह्यातल्या स्पर्धकांविषयी काय वाटतं, ह्याविषयी ते जाणून घेऊ इच्छित होते. त्यामूळे माझी मतं सांगणारा हा शो मी घेऊन आलीय. ह्याशोचं वैशिष्ठ्य आहे, की, बिग बॉसच्या स्पर्धकांविषयी माझी परखड मत मी इथे मांडतेय, पून्हा एकदा बिग बॉसशी ह्या शोमूळे मी अप्रत्यक्षपणे जोडली गेलीय, ह्याचा मला आनंद आहे.
सई पूढे सांगते, बिग बॉसचा आवाज त्यांच्या घरात ऐकु यायचा, तसा बिग मावशीचा आवाज ह्या शोमध्ये आम्ही ठेवलाय. तिच्यासोबतची माझी बातचित खूप मनोरंजक होत असल्याच्या प्रतिक्रिया माझ्या चाहत्यांकडून येतायत. मला स्पर्धकांविषयी नक्की काय वाटतं. ते तुम्ही ह्यातून ऐकाल. 
मराठी बॉक्स ऑफिसवर येणा-या ह्या शोमधून सई सोबतच तिचा बिग बॉसच्या घरात दिसलेला लाडका मित्र पुष्कर जोगही दिसणार आहे. त्यामूळे आता जशी बिगबॉसच्या घरात ह्या दोघांची आंबट-गोड मैत्री पाहायला 

Friday, 7 June 2019

कोण आहे बिग बॉस मराठीच्या घरातील जुलिया रॉबर्ट्‌स ? बिचुकलेंचे शिवानीसाठी खास गाणे ...


  
मुंबई ७ जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांनी इतर सदस्यांना वेगवेगळी नावे ठेवली आहेत. शाकाल म्हणजे परागबिल्डर म्हणजे शिव आणि बरचं काही... तर बिग बॉस मराठीच्या घरात पराग रुपालीला म्हणाला जुलिया रॉबर्ट्‌स... अभिजीत बिचुकले आणि पराग गप्पा मारत असताना रुपाली तिथे आली आणि ती म्हणाली “आज तू मला बोला नाहीस... मी वाट बघत होते” हे ती इंग्लीशमध्ये बोली म्हणून बिचुकलेंना कळाले नाही तर पराग त्यावर म्हणालामी तिला रोज कशी दिसते आहे हे सांगतो. याच संभाषणा मध्ये पुढे परागने रुपालीला जुलिया रॉबर्ट्‌स अशी कॉम्पलिमेन्ट दिली.
सध्या पराग आणि रुपालीबद्दल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चर्चेला उधाण आले आहे... त्यांच्यामध्ये नक्की काय सुरु आहे याबद्दलची चर्चा सदस्यांमध्ये होते आहे... गोव्याविषयी चर्चा होत असताना गंमतीमध्ये पराग शिवसमोर रुपालीला त्याच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले आणि म्हणाला आई बाबांना घेऊन ये मुदिखाई कर लेंगेपोहे मी करेन... तर शिवने विचारले फाईनल झाल का त्यावर पराग म्हणाला मी तिच्या मागे लागलो आहे पण ती होकार देत नाही... अशा गोष्टी घरातील सदस्यांमध्ये होणाऱ्या चर्चेला अजूनच वाढवत आहेत... किशोरी शहाणेसमोर त्याचे रुपालीद्दल बोलणे हे सगळेच या गोष्टीकडे इशारा देते... आता या दोघांच्या मनामध्ये खरच अस काही आहे कि नाही हे त्यांनाच माहिती...
तर बिचुकले यांनी आज शिवानीसाठी तुमसे मिलनाबाते करना हे गाण म्हंटल आहे... तेंव्हा अजून गोष्टी जाणून घेण्यसाठी बघत रहा बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Thursday, 6 June 2019

बिग बॉस मराठीच्या घरात अभिजीत बिचुकलेंचीच चर्चा ... शिवानी बिचुकलेंना देणार घर कामाचे धडे... “मी वाट बघतोय तुम्हाला घराबाहेर पाठवायची”- अभिजित बिचुकले


 
मुंबई ६ जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये माधव आणि अभिजीत बिचुकले यांची चांगली मैत्री आहे... तर आज माधव आणि बिचुकलेंमध्ये एक संभाषण होताना दिसणार आहेजिथे माधव म्हणतो आहे, तुम्ही सगळे माझी बाहेर जाण्याची वाट बघत आहातमी इथे वाट बघतो आहे तुम्हाला बाहेर पाठविण्याची...हेच करतायना तुम्ही ?त्यावर बिचुकले म्हणाले १०० टक्के...  दिगंबर नाईक तिथे येताच या दोघांनी कारण दिले आज आमचा performance आहे आणि त्यानंतर माधवने हेच संवाद हिंदीमध्ये कसे म्हणायचे हे अभिजीत बिचुकले यांना सांगितले. आता हा नक्की कुठल्या टास्कचा भाग आहे असणार आहे का काही वेगळे हे आजच्या भागामध्ये कळेलच...
शिवानी बिचुकलेंना शिकवणार झाडू मारायला ?
पुन्हाएकदा शिवानी सुर्वे अभिजीत बिचुकले यांची शाळा घेताना दिसणार आहे... त्याचे असे झाले कि, शिवने कॅप्टन झाल्यावर घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी सदस्यांना वेगवेगळ्या टीम्स मध्ये टाकले... आणि त्यामुळे  अभिजीत बिचुकले आणि शिवानी सुर्वे हे एका टीममध्ये आले... आणि बिचुकले यांना घरच्या कामाची फारशी सवय नाही आणि त्यांना ते जमत देखील नाही याचा अंदाज शिवानीला आला आहे... शिवानीने बिचुकले यांना सांगितले “मी रीझाईन करेन या कामामधून” त्यावरून बिचुकले यांनी मजेदार प्रतिक्रिया मारायला सुरुवात केली... तर शिवानीने शिवला सांगितले “मी जेवणाच्या टीममध्ये जाते” ... असं कोण झाडू मारतं हा प्रश्न शिवानीला पडला आहे... बिग बॉसच्या घरात आलं कि प्रत्येक कामामध्ये सदस्यांना मदत करावी लागते... आणि आता शिवानी  बिचुकले यांना झाडू कशी मारायची हे  शिकवणार का हे बघणे गंमतीशीर असणार आहे... याआधी तिने बिचुकलेंना त्यांचे कपडे आणि जागा कशी साफ ठेवावी हे शिकवले होते...
तेंव्हा नक्की बघा ही गंमत आजच्या बिग बॉस मराठी सिझन २ च्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन २ दिवस ११ !“मी प्रयत्न करतो आहे करू दे” – पराग


 
मुंबई ६ जून२०१९ : बिग बॉसच्या घरात चोर बाजार या साप्ताहिक कार्याने चांगलाच जोर पकडला आहे ... टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरीच बाचाबाचीधम्माल - मस्ती बघायला मिळत आहे... काल शिवानी आणि शिवमध्ये बराच वाद झाला... चोरांनी मारामारी करू नये असे शिवचे म्हणणे होते... तर बिग बॉस यांनी दोन्ही टीमसोबत संचालक मैथिली हिला सांगितले दोन्ही टीम चोर बाजार हा खेळ बरोबर खेळत नसून संचालक देखील दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडत नाही... तरीही बिग बॉस यांनी सदस्यांना पुन्हा कार्य करण्यास परवानगी दिली...
...काल टास्क दरम्यान काय घडले ?
या टास्क दरम्यान किशोरी शहाणे अभिजीत केळकरवर खूपच नाराज झाल्या... कारण, त्याने आणि त्याच्या टीमने टास्क दरम्यान केलेली नासधूस त्यांना पटलेली नाही.... वीणाचे देखील मत हेच होते कि, अभिजीत केळकरने खूप वाईट पध्दतीने टास्क पार पाडला. हे वाद ज्यामुळे झाले ते किशोरी शहाणे यांचे सामान सापडले तरी देखील विरुध्द टीमला खजील वाटावे म्हणून वीणाच्या सांगण्यावरून किशोरीजीनी रडण्याचे नाटक केले. किशोरी शहाणे यांनी रुपाली देखील सांगितले कि, अभिजित केळकरला मी सोडणार नाही... त्यांनी ही खंत बिचुकले यांच्याकडे देखील व्यक्त केली...  तर शिव इकडच्या गोष्टी तिकडे करतो असे म्हणणे वैशाली, दिगंबर यांचे पडले. तर शिवानीने अभिजित केळकर आणि माधव देवचकेला विरुध्द टीमचे बोलण सांगितले कि, या टीमने जंगली लोकांसारखा खेळ खेळला आपण तस नाही खेळायचे... आणि शिवानीने बोलताना माधव आणि अभिजीतला सांगितले मला पूर्ण खात्री आहे ते देखील तसाच खेळ खेळणार... आता विरुध्द टीम आज कोणत्या प्रकारे टास्क पाडेल हे आज बघायला मिळणार आहे... माधवने टास्क सुरु होणायाआधीच त्याचे काही कपडे लपवून ठेवले... तर वीणा दुसऱ्या टीमच्या सदस्याचे आणि रुपालीने अभिजीत बिचुकले यांचे कपडे टास्क सुरु होण्याआधी स्वत:च्या ताब्यात घेतले... आता दुसरी टीम आज टास्क कोणत्या प्रकारे पार पाडेल हे बघणे रंजक असणार आहे...
किशोरी शहाणे & पराग कोणाबद्दल करत आहेत Gossip ?
चोर बाजार हा टास्क सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे... या टास्कमध्ये सदस्यांच्या बऱ्याच गोष्टी चोर टीमचे सदस्य चोरत आहेत... आणि यामध्येच रुपालीचा मेकअप कीट विरुध्द चोर बनलेल्या टीमने घेतला... पराग यावरूनच किशोरी शहाणे यांच्याशी गप्पा मारताना मजेत बोलताना म्हणाला कि, लोक २ तास ३७ मिनिट मेकअप करत आहेत तर किशोरी ताईनी रुपालीची बाजू घेत म्हणाल्या बिचारीचा मेकअप कीट चोरला आहे तरी सांभाळून घेते आहे... असं नाही हा बोलायच... तर पराग लगेच त्यावर म्हणाला, “हे आपल्यातच राहुदे तिला नका सांगू मी असो बोलो नाही तर माझी वाट लागेल” तर परागला चिडवीण्यासाठी किशोरी ताई म्हणाल्या मी वेळेला याचा उपोग करणार ... हे संभाषण इथेच थांबले नाही यावर पराग म्हणाला. मी प्रयत्न करतो आहे करू दे ... आता कसला प्रयत्न पराग करतो आहे हे त्यालाच माहिती... यावर किशोरी ताई म्हणाल्या “डाळ शिजते आहे का ? किशोरी ताईनी परागची या गोष्टीवरून बरीच मजा घेतली. आता नक्की कोणामध्ये डाळ शिजते आहे इथे काय सुरु आहे हे आजच्या भागामध्ये कळेलच ...
तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठीच्या घरात अभिजीत बिचुकलेंचीच चर्चा ... शिवानी बिचुकलेंना देणार घर कामाचे धडे...“मी वाट बघतोय तुम्हाला घराबाहेर पाठवायची”- अभिजित बिचुकले


 
मुंबई ६ जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये माधव आणि अभिजीत बिचुकले यांची चांगली मैत्री आहे... तर आज माधव आणि बिचुकलेंमध्ये एक संभाषण होताना दिसणार आहेजिथे माधव म्हणतो आहे, तुम्ही सगळे माझी बाहेर जाण्याची वाट बघत आहातमी इथे वाट बघतो आहे तुम्हाला बाहेर पाठविण्याची...हेच करतायना तुम्ही ?त्यावर बिचुकले म्हणाले १०० टक्के...  दिगंबर नाईक तिथे येताच या दोघांनी कारण दिले आज आमचा performance आहे आणि त्यानंतर माधवने हेच संवाद हिंदीमध्ये कसे म्हणायचे हे अभिजीत बिचुकले यांना सांगितले. आता हा नक्की कुठल्या टास्कचा भाग आहे असणार आहे का काही वेगळे हे आजच्या भागामध्ये कळेलच...
शिवानी बिचुकलेंना शिकवणार झाडू मारायला ?
पुन्हाएकदा शिवानी सुर्वे अभिजीत बिचुकले यांची शाळा घेताना दिसणार आहे... त्याचे असे झाले कि, शिवने कॅप्टन झाल्यावर घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी सदस्यांना वेगवेगळ्या टीम्स मध्ये टाकले... आणि त्यामुळे  अभिजीत बिचुकले आणि शिवानी सुर्वे हे एका टीममध्ये आले... आणि बिचुकले यांना घरच्या कामाची फारशी सवय नाही आणि त्यांना ते जमत देखील नाही याचा अंदाज शिवानीला आला आहे... शिवानीने बिचुकले यांना सांगितले “मी रीझाईन करेन या कामामधून” त्यावरून बिचुकले यांनी मजेदार प्रतिक्रिया मारायला सुरुवात केली... तर शिवानीने शिवला सांगितले “मी जेवणाच्या टीममध्ये जाते” ... असं कोण झाडू मारतं हा प्रश्न शिवानीला पडला आहे... बिग बॉसच्या घरात आलं कि प्रत्येक कामामध्ये सदस्यांना मदत करावी लागते... आणि आता शिवानी  बिचुकले यांना झाडू कशी मारायची हे  शिकवणार का हे बघणे गंमतीशीर असणार आहे... याआधी तिने बिचुकलेंना त्यांचे कपडे आणि जागा कशी साफ ठेवावी हे शिकवले होते...
तेंव्हा नक्की बघा ही गंमत आजच्या बिग बॉस मराठी सिझन २ च्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

जाणून घ्या : बिग बॉस मराठीचे सदस्य घरामध्ये फावल्या वेळात काय करतात ...


 
मुंबई ६ जून, २०१९ : बिग बॉसच्या घरात १०० दिवस सदस्य कुठल्याही मनोरंजन साधनांशिवाय रहातात. आपल्याला मोबाईलटेलिव्हीजनवर्तमानपत्र या गोष्टींशिवाय एक दिवस रहाणे देखील कठीण असते. या घरामध्ये  सदस्यांचा इतके दिवस बाहेरच्या जगाशी कुठलाही संबंध नसतो... टास्क नसताना सदस्य संपूर्ण दिवस या घरामध्ये काय करतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडण सहाजिक आहे...बिग बॉसच्या घरामध्ये विरंगुळासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. प्रेक्षकांना माहितीच आहे बिग बॉसच्या घरात सदस्यांच्या दिवसाची सुरुवात गाण्याने होते. त्यानंतर घरातील सदस्य त्यांना नेमून दिलेली कामे पार पाडतात... घरामध्ये सदस्यांचे स्वास्थ्य निरोगी रहावे म्हणून बिग बॉस व्यायाम शाळेची सोय करण्यात आली आहे... ज्यामधल्या विविध गोष्टींचा वापर सदस्य त्यांच्या फिटनेससाठी करतात तर काही सदस्य योगा देखील करतात. टास्कसाठी प्रत्येक सदस्याचे फिट राहणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे घराच्या आतमध्ये सगळ्या गोष्टींची सोय करण्यात आली आहे.  
याबरोबरच घरातील सगळ्या महत्वाचा भाग म्हणजे स्वयंपाक घर... जिथे रोज घरातील सदस्य रुचकर पदार्थ बनवतात... यावेळेस तर घरामध्ये शेफ आहे त्यामुळे नवनवीन डिश सदस्यांना खायला मिळत आहेत... इतर सदस्य देखील खूप चविष्ट खाद्यपदार्थ बनवताना प्रेक्षकांना दिसतात. स्वयंपाक घरामध्ये मिक्सर नसल्याने पाटा वरवंटाचा वापर केला जातो... बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरेखा पुणेकर असताना नृत्य होणार नाही असे अशक्यच... सुरेखा अटी घरातील सदस्यांना लावणी तर कथ्थकचे धडे देखील शिकवतात.

Tuesday, 4 June 2019

बिग बॉस मराठीच्या घरात किशोरी शहाणे यांच्या अश्रूचा बांध फुटला ... दुखावले गेले मी, मला का टार्गेट केलं ? – किशोरी शहाणे शिवानी सुर्वे आणि किशोरी शहाणेमध्ये वाद


 
मुंबई ५ जून, २०१९ : बिग बॉसच घर सदस्यांच्या प्रत्येक भावभावनांचा साक्षी आहे... राग, प्रेम, तिरस्कार, हसण आणि रडण ... १०० दिवस एका घरामध्ये रहाण सोपी गोष्ट नक्कीच नसते... या १०० दिवसाच्या कालावधीमध्ये सदस्य या घरामध्ये प्रत्येक गोष्ट अनुभवतात... टास्क दरम्यान प्रत्येकच सदस्याची कसोटी लागते. हा टास्क सदस्य कसा पूर्ण करतात हे महत्वाचे असते... पण यामध्ये कधी कधी घरातील इतर सदस्य दुखावले जातात. चोर बाजार या टास्क दरम्यान किशोरी शहाणे आणि शिवानी सुर्वे मध्ये चांगला वाद झाला आणि त्यांनी शिवानीला सायको देखील म्हंटले... त्यावर शिवानीने देखील उत्तर दिले “किशोरी शहाणे असतील ते त्यांच्या घरीमाझ्यासमोर आवाज नाही करायचा”
किशोरी शहाणे अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून रहात आहेत... त्यांचा आधार घरातील बाकी सदस्यांना वाटतो आहे... पण बिग बॉस यांनी दिलेल्या चोर बाजार या टास्क दरम्यान शिवानी आणि किशोरी मध्ये वाद झाला. या टास्क दरम्यान त्याचं सामान उध्वस्त केलंत्यांन टार्गेट केलं या गोष्टीच किशोरी शहाणे यांना खूप वाईट वाटलं. आपल्या मनात काय आहे हे त्यांनी बिचुकलेंना सांगितले... अभिजित बिचुकलेनी किशोरीजींना धीर द्यायचा प्रयत्न केला... अभिजीत बिचुकले यावर असे देखील म्हणालेआताच्या आता १४ सदस्यांना तुमचं काय दु:ख आहे ते सांगू आणि किशोरीजींच सामान काही असेल ते त्यांना देऊन टाका असं मी त्यांना सांगतो” मैथिलीने देखील किशोरी शहाणे यांना समजवण्याचा प्रयत्न केला.

बिग बॉस मराठीच्या घरात वीणा आणि वैशालीमध्ये उडाला वादाचा भडका ...


 
मुंबई ४ जून, २०१९ : आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन सदस्यांमध्ये भाषेवरून उडणार वादाचा भडका... आणि ते दोन सदस्य म्हणजे वीणा आणि वैशाली... वैशालीने रुपालीशी बोलताना केलेल्या शब्दांच्या गैरवापरामुळे वीणा आणि वैशालीमध्ये वादाची ठिणगी उडाली आणि वाद वाढतच गेला... ज्यामध्ये वैशालीने वीणाला बरच काही सुनावले... वीणाने वैशालीला सांगण्याचा प्रयत्न केला कि, तू तुझी भाषा सुधारायला हवी त्यावर “मी इथे काही सुधारायला आलेले नाही” असे वैशालीने वीणाला सांगितले. इतकेच नाही तर तू माझ्या चुका काढू नकोस, हि तुला शेवटची ताकीद आहे असे देखील वैशाली वीणाला म्हणाली... वीणाने वैशालीला सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केला कि, तू माझ्यावर ओरडू नकोस आणि तुझ्या Warning चा मला काहीही फरक पडत नाही... त्यावर वैशाली म्हणाली, शांत बस, गप्प बस अस तू नको सांगूस मला... हे होत असताना वैशालीने वाईटशब्द उच्चारले तेंव्हा किशोरी आणि वीणाने शिव्या नको असे देखील तिला सांगितले... हे भांडण इतके वाढले कि, वैशाली वीणाला म्हणाली “मी तुझ्या बापाला घाबरत नाही”... त्यावर वीणाने तिला खडसावून सांगितले “माझा बाप काढू नकोस... तुझी लायकी नाही”
आता हे भांडण का झाले कोणामुळे झाले पुढे काय होईल हे आजच्या भागामध्ये कळेलच... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार “चोर बाजार” साप्ताहिक कार्य !


 
मुंबई ४ जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात नवनवीन टास्क बिग बॉस देत असतात... जे कधी मजेदार आणि कधी आव्हानात्मक असतात... आज घरामध्ये चोर बजार हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन दिवस असून या कार्यात दोन्ही टीम एकमेकांच्या विरुध्द खेळणार आहेत म्हणजेच - टीम Aआणि टीम B. टीम A चे सदस्य आज चोर असणार आहेत तर टीम B चे पोलीस आणि दुकानदार. चोरांनी दुकानदार आणि पोलिसांच्या गोष्टी चोरायच्या आहेत आणि त्या दुकानदारांना विकायच्या आहेत. दुसरीकडे दुकानदारांनी जास्तीत जास्त गोष्टी विकत घ्यायच्या आहेत तर पोलिसांनी चोरी होण्यापासून रोखायचे आहे. आता या टास्क मध्ये कोणती टीम विजयी ठरेल हे बघणे रंजक असणार आहे... सदस्यांना मिळणारे टास्क ते कशाप्रकारे पार पडतात हे या शो मधील महत्वाची बाब असते... तेंव्हा बघू हे सदस्य कसा पार पडतील आजचा हा टास्क. 
याच टास्कसोबत दो दिल मिल रहे है हे गाण घरातील सदस्य गाणार आहेत म्हणजेच शिव, शिवानी, वैशाली म्हाडे आणि दिगंबर नाईक आता हे गाण कोणासाठी आहे कि असचं म्हणत आहेत त्यांनाच ठाऊक !
तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ चा आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Monday, 3 June 2019

बिग बॉस मराठीच्या घरात कोणाचबोलण सदस्यांना होत नाही सहन...


मुंबई ३ जुने, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात एका नावाची चर्चा खूप रंगली आणि ती म्हणजे अभिजित बिचुकले. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांच्या बोलण्याचा वेगळाच अर्थाचा काढला गेला,तर कधी त्यांचे म्हणणेच कुणाला कळाले नाही... अभिजीत बिचुकले त्यांच्या बोलण्यातून कधी कधी गोष्टीत गंमत आणण्याचा प्रयत्न करतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे...आज अशीच एक गंमतीशीर गोष्ट किचनमध्ये घडणार आहे... रुपाली भोसले किचनमध्ये जेवण बनवताना कुकर मध्ये पाणी जास्त झाले आणि ते बाहेर येऊ लागले... यालाच अभिजित बिचुकले यांनी स्वत:शी जोडले... कि कुकरला माझे बोलण सहन झाल नाही तर तुला कस होईल त्यावर शिवने देखील अभिजित बिचुकले यांवर एक टोंबणा मारला कि,“तुमच्या बोलण्यावर धिंगाणा झाला तर ... जिथे तुम्ही बोलता काय ना काय होतं” त्यावर बिचुकले यांनी देखील शिवला उत्तर देताना म्हंटले “प्रेशर कुकर असून देखील त्याला माझे प्रेशर सहन होत नाही... तर माणसांना कसं होईल ?...

Friday, 31 May 2019

बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार अंताक्षरी !

 
मुंबई ३१ मे२०१९ : बिग बॉसच्या घरात एकदा सदस्य गेले कि त्यांचा मोबाईल, टीव्ही, पेपरअशा कुठल्याही करमणुकीच्या साधनांशी संबंध तुटतो...आणि याशिवाय रहाण हाच मोठा टास्क सदस्यांसमोर असतो. यांच्याजवळ कुठलही मनोरंजनाच साधन नसताना काही मोजकेच पर्याय उरतात. त्यामुळे संपूर्ण दिवस काय करायचं हा मोठा प्रश्न सदस्यांसमोर असतो. घरामध्ये कधी स्वत:बद्दलची माहिती सदस्यांना सांगणे, स्वयंपाक घरात रुचकर पदार्थ बनवणे, गप्पागोष्टी करणेबिग बॉस यांनी दिलेले टास्क करणे अशा प्रकारे सदस्य आपला वेळ घालवतात... सध्या बिग बॉसच्या घरामध्ये एकापेक्षा एक कलाकार असल्यामुळे कधी गाण्याची मैफल रंगते तर कधी स्वादिष्ट पदार्थ खायला मिळतात ... तर सुरेखाताई कधी लावणी आणि त्यातील अदा शिकवताना दिसतात...
आज बिग बॉसच्या घरामध्ये सुरेल अंताक्षरी रंगणार आहे... ज्यामध्ये अभिजित केळकर याने खूप सुंदर गाणी सादर केली जसे चंदा रे चंदा रेये राते ये मौसम... ससा रे ससा हे गाण देखील या अंताक्षरीत सदस्यांनी म्हंटले आहे... याचबरोबर वैशालीचा मधुर आवाज देखील बऱ्याचदा घरामध्ये ऐकू येतो आणि अंताक्षरीमध्ये देखील तिची सुरेल गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत...
तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ चा भाग आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Thursday, 30 May 2019

बिग बॉस मराठीच्या घरात आज काय घडणार ?


-          विणा आणि शिवानी मध्ये वाद
-          अभिजित बिचुकलेंच्या डोळ्यात का आले पाणी ?
-          “आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर” - दिगंबर नाईक
मुंबई ३० मे, २०१९ :अनेक लोकं एकत्र आले कि भांड्याला भांड लागणारच, शब्दाला शब्द लागणारच... आणि गैरसमज होणारच... आणि बिग बॉसचं घर म्हंटल कि, हे स्वाभावाकीच आहे ... कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ कलाकार एकत्र आले म्हणजे एकमेकांचा स्वभाव समजण, त्यांच्या सवयी कळण याला वेळ लागतोच... मराठी टेलिव्हिजनवरील दोन लोकप्रिय अभिनेत्री राधा म्हणजेच विणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांचं घरामध्ये तसं चागलं जमत होत... पण आता या दोघींमध्ये वाद होताना दिसणार आहे ... आणि हा वाद देखील अभिजित बिचुकले यांच्यावरूनच आहे ... “मला नको सांगूस कसं बोलायचं” असं शिवानीच म्हणणे आहे तर विणाचा मुद्दा आहे किचन मध्ये आरडाओरडा नको ... आता नक्की काय झालं ? वाद मिटणार का ? हे आजच्या भागामध्ये कळेलच...
बिग बॉस मराठी सिझन २ सुरु झाल्यापासून अभिजित बिचुकले हे नाव चर्चेत आहे ... पण अभिजित केळकर याच्याशी बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी का आले ? त्यांनी कोणत्या गोष्टी सांगितल्या या दरम्यान सांगितल्या ? हे आजच्या भागामध्ये कळेलच ... दिगंबर नाईक यांनी सुंदर कविता सादर केली... “रत्नागिरी,देवगड, कणकवली कट्टा, मालवण, राजापूर आणि आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर”अशा शब्दांत त्यांनी गाण्याची सुरुवात केलीआणि याचबरोबर कोकणचे कौतुक आणि वर्णन त्यांनी खूप सुंदररीत्या शब्दांत केलं... याचबरोबर त्यांनी गाऱ्हांण देखील सादर केले ज्याला घरातील बाकीच्या सदस्यांनी देखील साथ दिली...
अजून या घरामध्ये काय काय घडेल ? काय गंमती जमती घडतील ? कोणाची मैत्री होईल ? तर कोणाचे वाद होतील ?हे  जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.