Showing posts with label शिवानी सुर्वे. Show all posts
Showing posts with label शिवानी सुर्वे. Show all posts

Saturday, 31 August 2019

शिवानी सुर्वेचं बिग बॉस मराठीची विजेती ठरावी – शिवानीच्या मालिकांमधल्या नायकांची इच्छा !

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व आता अंतिम टप्प्यावर आले असताना अभिनेत्री शिवानी सुर्वेचं जिंकावी अशी शिवानीच्या सहकलाकारांची इच्छा आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीने नुकताच एका व्हिडीयोव्दारे आपल्या आगामी सिनेमाची नायिका शिवानी सुर्वेला  जिंकण्यासाठी ट्रिपल शुभेच्छा दिल्या होत्या. आता तिच्या हिंदी आणि मराठीतल्या सुपरडुपर हिट ठरलेल्या मालिकांच्या हिरोज् नी सुध्दा शिवानीच बिग बॉस मराठीची विजेती बनावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
शिवानी सुर्वेच्या देवयानी’ मालिकेतल सहकलाकार आणि मित्र संग्राम साळवी, ‘जाना ना दिलसे दूर’ आणि 'एक दिवाना था' या हिंदी मालिकेतला सहकलाकार आणि मित्र विक्रम सिंग चौहान ह्या दोघांनीही शिवानीला जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रभर गाजलेल्या देवयानी’ मालिकेची शिवानी सुर्वे नायिका होती. ह्या मालिकेतला तिचा नायक अभिनेता संग्राम साळवीने सोशल मीडियावर खास संदेश दिला आहे.  तो म्हणतो, “टॉप ६ सदस्यांपैकी बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी शिवानी अधिक पात्र स्पर्धक वाटते. ती बिग बॉस सीजन २ जिंकू शकेल असे मला वाटते.” संग्रामने आपल्या चाहत्यांना शिवानीसाठी भरपूर वोट करा असे आवाहन केले आहे. तो म्हणतो, “तिला इतके वोट्स करा कि ती बिग बॉस सीजन दोन जिंकलीच पाहिजे.
मराठी मालिकांच्या जगतात अधिराज्य गाजवल्यावर शिवानी हिंदी मालिका विश्वामध्ये लोकप्रिय झाली. हिंदीतली जाना ना दिलसे दूर’ या मालिकेत तिने विविधा कश्यप भूमिका साकारली होती. विविधा आणि अथर्व म्हणजेच शिवानी आणि विक्रम सिंग चौहान यांची जोडी प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरली. विक्रम सिंग आणि शिवानी मालिकेनंतरही देखील छान मित्र आहेत. विक्रम सिंग चौहान म्हणतो, ''शिवानी सुर्वे खूप छान खेळत आहे. मला मराठी फारसं समजत नाही तरी ही मी शिवानीसाठी बिग बॉस मराठी २ चे काही एपिसोडस बघितले. माझी खूप इच्छा आहे की शिवानी सुर्वे हिच बिग बॉस २ ची विनर व्हावी.''
जाना ना दिलसे दूर’ नंतर शिवानी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभर लोकप्रिय झाली. सध्या तिची हि मालिका इंडोनेशियामध्ये सालेमानाचिंता नावानेदाखवली जात आहे. त्यामुळे शिवानीची लोकप्रियता जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली. शिवानीला सध्या  हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा प्रचंड पाठींबा मिळत आहे.

Wednesday, 28 August 2019

शिवानी सुर्वेचे महाराष्ट्रभरातले फॅन्स साजरा करतायत तिचा आज वाढदिवस

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील फायटर शेरनी शिवानीचा २८ ऑगस्टला वाढदिवस असतो. बर्थडेच्या दिवशी शिवानी बिग बॉसच्या घरात असली तरी तिचे चाहते महाराष्ट्रभर तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करत आहेत. फॅन्सचं शिवानीवर असलेलं प्रेम थक्क करणारं आहे. आपल्या आवडत्या शिवानीचा वाढदिवस स्पेशल व्हावा म्हणून खूप नाविन्यपूर्ण पद्धतींनी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
बिग बॉस मराठीत आता टॉप ६ मध्ये पोहचलेल्या शिवानीचा चाहता वर्ग अफाट आहे. महाराष्ट्रातील साताराकोल्हापूरसोलापूरउरमुंबई अश्या कितीतरी ठिकाणच्या चाहत्यांनी शिवानीचा वाढदिवस साजरा केला आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक असे सगळ्या वयोगटातले निस्वार्थ प्रेम करणारे तिचे चाहतेआहेत.
 रायगड जिल्ह्यातल्या केगाव मध्ये राहणारा शिवानीचा जबरा फॅन निनाद म्हात्रे जो गाडीवर शिवानी स्टाईल’ स्टिकर लावल्यामुळे चर्चेत आला होता. त्याने शिवानीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी परत एकदा खूप मेहनत घेतली आहे. तो राहत असलेल्या गावात कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीयेत. तरी शिवानीसाठी खास शहरात जाऊन वाढदिवसाच्या  दिवशी सकाळी निनाद केकग्रिटिंग कार्ड घेऊन आला. त्याने शिवानीसाठी खास पत्र लिहिलंय. वाढदिवसाचा आनंद केक कापून साजरा केल्यावर निनाद म्हणाला, मी शिवानी सुर्वेचा खूप मोठा चाहता आहे. तिच्या प्रेमापोटीच मी माझ्यासारख्या चाहत्यांचा शिवानीयन्स हा ग्रुप बनवला आहे. बिग बॉस मराठी सीजन २ ची ट्रॉफी शिवानीनेच जिंकावी अशीआम्हा सर्व चाहत्यांची इच्छा आहे. ती बिग बॉस जिंकल्यावर तिचा ट्रॉफी हातात घेतलेला मोठा फोटो मी माझ्या घराच्या भिंतींवर लावणार आहे. तिला वाढदिवसासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी आम्हा सर्व चाहत्यांकडून शुभेच्छा.  
साताऱ्यात राहणाऱ्या आसावरी कर्वेने आपल्या लहान मुली आणि पतीसह थेट कास पठारावर जाऊन शिवानीच्या वाढदिवसानिमीत्त केक कापला आहे. आसावरी म्हणाली, “ शिवानी बिग बॉसची ट्रॉफी तू जिंकून ये. तू जिंकावीस म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतेय. आम्ही सातारकर तू ट्रॉफी घेऊन येण्याची वाट पाहत आहेत. मला पूर्ण खात्री आहे कि बिग बॉसची विजेता तूच होणार आहेस.
शिवानीने तिची छाप लहान मुलांवरही पाडली आहे.  शिवानीची सातवीत असलेली एक फॅन आहे. या छोट्या  चाहती स्वानंदी धोत्रेने आपल्या लाडक्या शिवानीताईचं खूप सुंदर पेंटिंग बनवलं आहे. स्वानंदी म्हणते, “शिवानीताई खूप स्ट्राँग आहे. मी पण तिच्यासारखी स्ट्राँग होणार. मला ती खूप आवडते. ती सगळे टास्क जबरदस्त खेळते. बिग बॉसची ट्रॉफी शिवानीताईच जिंकेल, असा मला विश्वास आहे.
स्वप्निल सोनावणे ह्या शिवानीच्या चाहत्याने वाढदिवसानिमित्त तिचं पोर्ट्रेट फ्रेम केलेलं आहे. हि फ्रेम त्याने शिवानीच्या आईला घरी जाऊन दिली असल्याचे सांगताना तो म्हणाला, की, “शिवानीला मी कायम सपोर्ट करतो. ती खूप छान खेळते. माझी फेवरेट स्पर्धक आहे. बिग बॉसची ट्रॉफी तिनेच जिंकायला हवी.” 
सागर वाघमारे नावाच्या चाहत्याने तर शिवानी जिंकण्यासाठी नवस केला आहे. तो सांगतो,  शिवानी जिंकली तर मी लालबागच्या गणपती दर्शनाला अनवाणी जाणार आहे तसेच दर शुक्रवारी उपवास देखील करणार आहे.
ट्विटरवर #ShivaniSurveDeservesToWin हा हॅशटॅग सध्या चांगलाच ट्रेंड होतोय. त्यांची आवडती शिवानी बिग बॉस मराठीचा सीजन २ जिंकावी म्हणून चाहते प्रयत्नशील आहेत. शिवानी सुर्वेचं हे फॅन फॉलोविंग बघता, शिवानी यंदाच्या बिग बॉस सीजनची विजेती ठरली,  तरी नवल वाटून घेऊ  नका. 

Monday, 26 August 2019

बिग बॉसनंतर शिवानी सुर्वेच्या सिनेमांचा डबल धमाका

सध्या बिग बॉसच्या घरातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानी सुर्वेसाठी 2019 हे वर्ष

करीयरचा टर्निंग पॉईंट ठरले आहे. बिग बॉसच्या घरातल्या सह-स्पर्धकांची आणि आपल्या चाहत्यांचीही लाडकी ठरलेल्या शिवानीची बिग बॉसनंतर फिल्म इंडस्ट्रीत घोडदौड चालुच राहताना दिसणार आहे.
शिवानी सुर्वेने गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी टिव्ही कारकिर्दीमध्ये बिग बॉस मराठी हा रिएलिटी शो केला. आपल्या पहिल्याच रिएलिटी शोमधून शिवानीने रसिकांची मनं जिंकली. आता टेलिव्हिजन रसिकांची मनं जिंकल्यावर शिवानी सुर्वे सिनेरसिकांवरही आपली मोहिनी घालायला येणार आहे.   
शिवानी सुर्वेचे ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. अंकुश चौधरीसोबतचा ट्रिपल सीट आणि हेमंत ढोमे लिखीत-दिग्दर्शित सातारचा सलमान हे दोन्ही सिनेमे ऑक्टोबर महिन्यातच सिनेसरसिकांच्या भेटीला येत आहेत. शिवानीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच  डबल गुड न्यूज आहे.  
2016 ला शिवानीचा घंटा हा सिनेमा आला होता. त्यानंतर आता तीन वर्षांनी ती रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. रूपेरी दूनियेत परतताना एकाच महिन्यात तिच्या दोन फिल्म्स रिलीज होत आहेत. 11 ऑक्टोबरला सातारचा सलमान तर ट्रिपल सीट हा चित्रपट 24 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे शिवानीच्या ह्या सोनेरी भेटीने तिच्या चाहत्यांची दिवाळी नक्कीच धमाकेदार होईल.
सूत्रांच्या अनुसार,  शिवानी सुर्वे ही बिग बॉस मराठीतून बाहेर पडणारी एकुलती एक अशी कंटेस्टंट आहे. जी बाहेर पडताच तिचे दोन मोठे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. बिग बॉसच्या घरातून प्रकृतीच्या कारणास्तव ब्रेक घेऊन घरी काही काळासाठी परतलेल्या शिवानीला अजून दोन मोठ्या फिल्ममेकर्सकडूनही सिनेमाच्या ऑफर्स आल्या आहेत. ज्यावर आता शिवानी बिग बॉसच्या ग्रँड फिनालेनंतर घरातून बाहेर आल्यावर विचार करेल. +

Wednesday, 31 July 2019

शिवानी सुर्वेच्या जबरा फॅनने गाडीवर लावला तिच्या नावाचा स्टिकर

कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचं एक वेगळच नातं असतं. हजारोंच्या फॅन्समधून आपण त्या कलाकाराचे सगळ्यात मोठे फॅन आहोत हे दाखवण्यासाठी ते खूप अजब गोष्टी करत असतात. बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वामधील स्पर्धक शिवानी सुर्वे हिचा एक जबरा फॅन आहे. ह्या फॅनने शिवानी स्टाईल’ नावाचा स्टिकर त्याच्या गाडीवर लावला आहे.
निनाद म्हात्रे असं ह्या जबरा चाहत्याचं नाव असून, हा रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये राहणारा आहे.  शिवानी सुर्वेच्या ह्या चाहत्यानेसोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून  ट्रेंड होत असलेल्या शिवानी स्टाईल ह्या हॅशटॅगचा स्टिकर बनवलाय. ह्यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणतो, “शिवानी मला खूप आवडते. मी तिचा खूप मोठा चाहता आहे. मला तिचा बेध़डक स्वभाव खूप आवडतो. ती बिग बॉसमध्ये खूप छान खेळत आहे.  माझ्यासाठी ती बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची विजेती आहे. मी तिच्याप्रेमाखातर शिवानी स्टाइलस्टिकर गाडीवर लावला आहे. आता लवकरच तिच्या फोटोचा वॉलपेपर माझ्या खोलीत लावणार आहे.
निनाद म्हात्रे शिवानीसाठी सोशल मीडियावर रोज पोस्ट टाकतो. त्याने तिच्यासाठी फॅनपेज देखील बनवले आहे. तिच्या या बिग बॉसच्या प्रवासात तो तिला भक्कम पाठिंबा देतो. तो म्हणतो, आम्हा चाहत्यांचा एक इन्स्टावर ग्रुप आहे तसेच व्हॉट्सअरग्रुपही आहे. ज्यामध्ये आम्ही सर्व शिवानीचे चाहते एकत्र आहोत. मी शिवानीला कधी भेटलो नाही. पण आता 1 सप्टेंबरच्या ग्रँडफिनाले एपिसोडनंतर तिला भेटून तिच्यासोबत एक फोटो काढायची आणि ऑटोग्राफ घेण्याचीही इच्छा आहे.  
शिवानी सुर्वे हिने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये अभिनेय केला आहे. तिची हिंदी टेलिविजन मालिका जाना ना दिल से दूरइंडोनेशियामध्ये सध्या टेलिकास्ट होत असल्याने शिवानीचे जगभरामध्ये फॅन्स आहेत. काही काळापूर्वी तिने गुगल सर्चमध्ये महेश मांजरेकरांनाही मागे टाकले होते.

Tuesday, 23 July 2019

शेरनी शिवानी सुर्वे बनली बिग बॉसच्या घराची कॅप्टन

बिग बॉसच्या घरात एका आठवड्यापूर्वी परतलेली शिवानी सुर्वे आता बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन बनली आहे.  शिवानीचा घरात प्रवेश होताना बिग बॉसने तिला पाहुणी म्हणुन घरात पाठवले होते. पण शिवानी सुर्वेने केलेली उत्तम कामगिरी पाहता बिग बॉसने शिवानीला घराचे सदस्यत्व बहाल,केले. ह्या संधीचे सोने करत शेरनी शिवानी सुर्वेने कॅप्टनपद पटकावले.
शिवानीला पून्हा एकदा सदस्यत्व बहाल करताना बिग बॉस म्हणाले, गेल्या आठवड्याभरातrल कार्यात दिसलेला सकारात्मक वावर, उत्साहपूर्ण सहभाग आणि कार्यातील कामगिरी ह्या बाबी लक्षात घेता बिग बॉसच्या घरातल्या सदस्यत्वाचा दर्जा शिवानीला दिला जात आहे.
ह्या सदस्यत्वानंतरच बिग बॉसच्या घरात हल्लाबोल हे कॅप्टनसी कार्य रंगले. मर्डर मिस्ट्री कार्यात सर्वात चांगली कामगिरी करणा-या अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वेमध्ये हे कॅप्टनसी कार्य रंगले. लिलिपूटच्या राज्याच्या ह्या कार्यात महाकाय मानव बनलेल्या शिवानीने आपल्या प्रतिमा सुरक्षित ठेवून चांगली कामगिरी केली. अभिजीतच्या सर्व प्रतिमा शिवानीच्या टीमने नष्ट केल्या.  आणि शिवानी विजयी ठरून कॅप्टन बनली.
सूत्रांच्या अनुसार, बिग बॉसमध्ये पहिलं पाऊल ठेवतानाच शिवानीने ती एक स्ट्राँग कंटेस्टंट असल्याचेच सर्वांना दाखवून दिले होते. तब्येतीच्या कारणास्तव तिला 21 दिवसांमध्येच घरच्यांचा निरोप घेऊन बाहेर पडावे लागले होते. पण परतताना शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या फिट होऊन 28 दिवसांनी परतलेल्या शिवानीने पहिल्या दहाच दिवसांत पून्हा एकदा चांगल्या परफॉर्मन्सने बिग बॉसची वाहवाही मिळवली. म्हणूनच बिग बॉसनेही तिला सदस्यत्व बहाल केले. आणि ती किती स्ट्राँग खेळाडू आहे, हे तिने लगेच कॅप्टनसी टास्क जिंकुन दाखवले. सध्या शिवानीवर तिच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षीव होत आहे.  आता शिवानी बिग बॉस-2 ची  विनर बनू शकते. शिवानीचे चाहतेही सध्या सोशल मीडियावरून शिवानीच्या यशासाठीच तिला शुभेच्छा देत आहेत.  

Monday, 15 July 2019

शिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री

शिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पून्हा एकदा एन्ट्री झाली आहे. बिग बॉसच्या दूस-या पर्वात दणक्यात एन्ट्री घेऊन बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमधला पहिला महिना गाजवणारी शिवानी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसमधून बाहेर पडली होती. पण आता पूर्ण बरी झालेली शिवानी सुर्वे बिग बॉसमध्ये शुक्रवारी परतलीय.
बिग बॉसच्या घरात पुनरागमन केलेल्या शिवानीची एन्ट्री नाट्यमय अंदाजात झाली. बिग बॉसमध्ये परतताना शिवानीने बिग बॉसमधल्या इतर स्पर्धकांसाठी पेस्ट्रीज आणल्या. घरच्यांनीही तिचे हसतमुखाने स्वागत केले. परतताना मात्र शिवानी कन्टेस्टंट म्हणून नाही, तर घरातली पाहूणी बनून आलेली आहे.
शिवानीची एन्ट्री जशी बिग बॉसच्या घरच्यांसाठी आनंददायी होती तशीच तिच्या चाहत्यांसाठीही हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. शिवानीच्या चाहत्यांनी कलर्स मराठीच्या पेजवर आपल्या भरघोस प्रतिक्रियांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. वेलकम बॅक’ , ‘शिवानी परत आली’, ‘वाघीण परत आलीये’ अश्या भरपूरशुभेच्छांचा वर्षाव सातत्याने सोशल मीडियावर होत आहे.
सूत्रांच्या अनुसार, शिवानी ही बिग बॉसच्या यंदाच्या पर्वातली एक खूप स्ट्राँग स्पर्धक होती. ती बिग बॉसमध्ये असावी, असं बिग बॉस पाहणा-या अनेक प्रेक्षकांचे मत होते. शिवानीला प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडायला लागल्यावर अनेक चाहत्यांची निराशा झाली होती. तशा प्रतिक्रियाही सातत्याने प्रेक्षक नोंदवत होते. आता बिग बॉसमध्ये शिवानीची पून्हा एन्ट्री झाल्यावर हा खेळ नक्कीच अधिक मजेशीर होत जाणार आहे. हे विकेन्डच्या  वारमधून लक्षात आलंच आहे.  सध्या बिग बॉसमध्ये खूप मत-मतांतरं होत आहे. नवे ग्रुप बनत आहेत. अशावेळी आता शिवानीच्या एन्ट्रीने हा शो खूप मनोरंजक होईल यात शंका नाही.  

Friday, 7 June 2019

शिवानी सुर्वेची स्ट्रगल स्टोरी : एकेकाळी रोजच्या जेवणासाठीही करावा लागायचा संघर्ष

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट मानल्या जाणा-या देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेने आपली संघर्षकथा बिगबॉसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रसमोर पहिल्यांदाच मांडली. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असण्यापासून ते समुद्रापासून 15 मिनीटांच्या अंतरावर आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर घेण्यापर्यंतचा आपला संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास शिवानीने बिग बॉसमध्ये सगळ्यांना सांगितला.
मुळची चिपळुणची आणि लहानाची मोठी डोंबिवलीला झालेली शिवानी सांगते, अभिनय क्षेत्रात अपघातानेच आले. आई-वडिलांचे एक्सिबिशन शिवाजीमंदिर नाट्यगृहाच्या शेजारी होते. तिथे मनोहर नरे यांनी ओम नाट्यगंधच्या मांगल्याचे लेणे नाटकात मला संधी दिली. ह्या नाटकाच्यावेळी मी डोंबिवलीहून सगळीकडे प्रवास करायचे आणि एकदा एक अख्खी रात्र मला आजीसोबत प्लॅटफॉर्मवर काढावी लागली. त्यामूळे आईने ठरवलं आता मुंबईतच राहायला यायचं. म्हणून आम्ही सायनला राहायला यायचा निर्णय घेतला. पण त्यानंतर आमची आर्थिक स्थिती खूप खालावली.
ती सांगते,  एकवेळ अशी आली की, जेव्हा घरात खायचे पैसे नव्हते. कित्येकदा माझ्या लहान बहिणीला पार्ले-जीच्या पुड्यावर अख्खा दिवस काढायची वेळ आलीय. तेव्हा वाण्याकडून सामान आणताना अपू-या पैशाअभावी दहा रूपयाची डाळदहा रूपयाचे तांदुळ आणि दहा रूपयाचे तेल आणावे लागायचे. तेवढेच पैसे कसेबसे असायचे. त्यावेळी मी ठरवलं, की घरच्यांसाठी काहितरी करायचं. आणि आज मला अभिमान आहे की, मी वयाच्या 16 वर्षी गाडी घेतली. आणि सतराव्या वर्षी आईचे समुद्रापासून 15 मिनीटांवर स्वत:चं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण केले. 

Tuesday, 28 May 2019

दिव्यांग मुलांसाठी शिवानी सुर्वे उचलतेय खारीचा वाटा, ‘बिगबॉसमराठी’मध्ये घालतेय, त्यांनी डिझाइन केलेले शूज

दिव्यांग मुलांसाठी शिवानी सुर्वे उचलतेय खारीचा वाटा, ‘बिगबॉसमराठी’मध्ये घालतेय, त्यांनी डिझाइन केलेले शूज
‘बिग बॉस मराठी सिझन 2’ मध्ये देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करून घेत आहे. तिचे स्टाइलिश आउटफिट, एक्सेसरीज आणि शूजची क्रेझ तिच्या फॅन्समध्ये आहे. आता अभिनेत्री आहे, म्हटल्यावर कोणत्यातरी महागड्या डिझाइनरकडूनच तिने हे सर्व डिझाइन केलेले असणार , असं अनेकांना वाटतंय. पण शिवानीच्या शूज मागचे शिल्पकार ऐकाल, तर चकित व्हाल.
शिवानीचे शूज डिझाइनर जरूर आहेत. पण कोणत्याही महागड्या डिझाइनरने ते डिझाइन केलेले नसून, ते दिव्यांग मुलांनी डिझाइन केलेले आहेत. फिट मी अप एनजीओच्या मुलांनी डिझाइन केलेले हे शूज शिवानी सध्या घालत आहे. दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ काम करते. ह्या संस्थेचा ‘फिट मी अप’ हा दिव्यांग मुलांना रोजगार मिळवण्यासाठी सुरू झालेला इनिशिएटिव्ह आहे.
फिट मी अपची निदेशक, प्रसन्नती अरोरा सांगते, “मी आणि माझी मैत्रिण दिपशिखाने 2011ला दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ची सुरूवात केली. त्यांना सज्ञान झाल्यावर रोजगार मिळावा हे ह्या मागचा उद्देश आहे. आणि आम्हांला आनंद आहे,की, शिवानी सुर्वेसारखे सेलिब्रिटीज आमच्या इनिशिएटिव्हला अशा पध्दतीने पाठिंबा देत आहेत.”
बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर शिवानी सुर्वे ह्यासंदर्भात सांगताना म्हणाली, “जरी ही मुलं दिव्यांग असली तरीही कोणत्याही पारंगत डिझाइनर प्रमाणे त्यांनी शूज डिझाइन केले आहेत. त्यामुळे मी त्यांनी डिझाइन केलेले तीन-चार शूज घेऊन बिगबॉसमध्ये चाललीय. त्यां
च्यासाठी माझ्या परीने उचललेला हा खारीचाच वाटा म्हणा ना.”