Showing posts with label समरसिंह मंत्री-पाटील. Show all posts
Showing posts with label समरसिंह मंत्री-पाटील. Show all posts

Wednesday, 6 November 2019

समरसिंह मंत्री-पाटील यांना मुख्यमंत्री बनवा!!!

'मुख्यमंत्री कोण होणार?' या एका प्रश्नावर राजकीय कलगीतुरा रंगला असतानाचमहाराष्ट्राच्या जनतेने मात्र सुमीला मिसेस मुख्यमंत्रीम्हणजेच पर्यायाने समरसिंहना मुख्यमंत्री बनवा असं गमतीत सुचवलंयसोशल मीडियावर 'बोलोबनोगे एक दिन के लिये मुख्यमंत्री?' या अनिल कपूर यांच्या 'नायकचित्रपटातल्या या डायलॉगने सध्या धुमाकूळ घातला आहेहाच प्रश्न आणि प्रसार माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या मिम्सबद्दल समरसिंह म्हणजेच अभिनेता तेजस बर्वेला विचारल असताना तो म्हणाला, "जर मी मुख्यामंत्री झालो तर सर्वात आधी मी माझा कार्यकाळ वाढवून घेईनकारण जर-तर का होईनामुख्यमंत्री बनण्याची संधी मिळतेच आहेतर ती कोण दवडेलआणि व्यावहारिकदृष्ट्या मुख्यमंत्री म्हणून एका दिवसात काम करणं शक्य नाहीते फक्त चित्रपटातच घडू शकतंत्यामुळे कार्यकाळ वाढवलाकि राज्यातील जनतेमध्ये एकात्मता आणण्यासाठी शक्य ते निर्णय घेईनजातधर्मआर्थिक विषमता यातून बाहेर पडत लोकांनी आज एकत्र आनंदी वातावरणात वावरायला हवंमाझा दुसरा निर्णय अर्थात भ्रष्टाचाराच्या विरोधात घेईनअनेक सक्षम तरुण यामुळे मागे पडत आहेतपर्यायाने देशसुद्धात्यामुळे मला प्राधान्यानं या विषयाकडे लक्ष द्यायला आवडेलतिसरं आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लावण्याऐवजी प्रत्येक शेतकरी इतरांना कर्ज देण्याइतपत सक्षम कसा होईल हे मी पाहेन."
तेजसने या मिम्सवर सडेतोड उत्तर दिलेत्याच्या उत्तराकडे लक्ष देता तो मालिकेतील मुख्यमंत्रीचं पद मात्र नक्की मिळणार यात शंकाच नाही.