Showing posts with label सीमा शुल्क विभागा. Show all posts
Showing posts with label सीमा शुल्क विभागा. Show all posts

Tuesday, 30 April 2019

सीमा शुल्क विभागातर्फे किनारी पायाभूत सुविधा उभारणी आणि व्यापार सुलभतेसाठी विशेष प्रयत्न, नौकाविहार क्षेत्राला जास्त उपयोग


मुंबई, 30 एप्रिल 2019

दी बॉम्बे कस्टम्स यॉट क्लबच्या (बीसीवायसी), मुंबई-गोवा-मुंबई सागरी मोहिमेवरील चालकदलाचे दोना पावला जेटी येथे आगमन झाले. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (जीसीसीआय) आणि गोवा यॉटिंग असोसिएशन यांनी या चालकदलाचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी 26 एप्रिल रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जीसीसीआयचे अध्यक्ष संदिप भंडारे, सीआयआय सदस्य नितीन कुनकोलीनकर आणि जीसीसीआयच्या इतर सदस्यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
त्यानंतर भारतीय महसूल सेवेतल्या अधिकाऱ्यांनी बीसीवायसीबाबत उपस्थितांना माहिती दिली तसेच भारतीय सीमाशुल्क विभागाने व्यापाराला चालना मिळावी यासाठी तसेच व्यापार सुलभतेसाठी हाती घेतलेल्या अलिकडच्या उपक्रमांबाबत सांगितले. किनारी पायाभूत सुविधा उभारणीसाठीचे विभागाचे प्रयत्नही त्यांनी अधोरेखित केले. किनारी व्यापार सुगम करण्यासाठी तसेच गस्तीसाठी रत्नागिरी येथील तरंगती जेटी मैलाचा दगड असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांचा नौकाविहार क्षेत्राला होणाऱ्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सागरी मोहिमेची उद्दिष्टे मुंबई ते गोवा प्रवासातील आव्हाने याविषयीही चर्चा झाली. विभागाच्या स्वच्छ भारत अभियानाची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सागरी प्रदूषण आणि त्यातले धोके याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवासादरम्यान याविषयी जागरुकता निर्माण करणे हा या मोहिमेचा हेतू आहे. गळाला अडकणाऱ्या प्लॅस्टिक बॅग आणि हानिकारक कचरा याविषयी चालकदलाने सांगितले तसेच यासंदर्भातले चित्रीकरण दाखवले.
गोवा यॉटिंग असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सातडेकर यांनी दोन्ही क्लबमधल्या अधिक भेटींची आवश्यकता व्यक्त केली. नाविकांच्या सहाय्यासाठी किनारी मार्गावर अधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची विनंती त्यांनी केली.
व्यापारी, मच्छिमार आणि किनारपट्टीशी संबंधित इतर हितधारकांशी चर्चा केलेल्या सर्व मुद्यांवर जागरुकता निर्माण करण्याबाबत बीसीवायसी, जीवाए आणि जीसीसीआय सदस्यांनी सहमती दर्शवली. विभागाच्या उपक्रमाबाबत व्यापार प्रतिनिधींनी आभार मानले.