Showing posts with label स्पृहा जोशी. Show all posts
Showing posts with label स्पृहा जोशी. Show all posts

Tuesday, 9 June 2020

स्पृहा जोशीच्या लॉकडाऊनमधल्या खजिना सीरिजला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

अभिनेत्री स्पृहा जोशीने लॉकडाऊनमध्ये खजिना ही सेलिब्रिटी गप्पा आणि कवितांच्या इन्स्टा लाइव सेशनची एक श्रवणीय मालिका केली. 15 भागांच्या खजिना आठवणीतल्या, साठवणीतल्या कविता,पुस्तकं आणि बरचं काही..’ इन्स्टालाइव सेशन्सना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
लॉकडाउन सुरू झाल्यावर हॅशटॅग ग्रॅटिट्युड डायरी’ नावाने सोशल मीडियावर स्पृहा जोशी आपल्या जवळच्या व्यक्तिंविषयीचे फोटो आणि पोस्ट टाकत होती. 21 दिवसांच्या पहिल्या लॉकडाउननंतर ही ग्रॅटिट्युड डायरी संपली आणि खजिना सीरिज सुरू झाली. ह्या इन्स्टा सीरिजव्दारे स्वानंद किरकिरे, सुबोध भावे, अवधुत गुप्ते, अनिता दाते, जीतेंद्र जोशी, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, महेश काळे, वैभव जोशी, संदीप खरे, अमेय वाघ, संकर्षण क-हाडे, शाल्मली खोलगडे, सिध्दार्थ मिश्रा अशा 14 सेलिब्रिटींच्यासोबत स्पृहा जोशीच्या अमिट कविता, साहित्यावरची लाइव सेशन्सची मेजवानी रसिकांना पाहायला मिळाली.
अभिनेत्री स्पृहा जोशी खजिनाविषयी सांगते, वाचनाचा छंद असल्याने लॉकडाऊन सुरू झाल्यावर मी वाचन सुरू केलं. मग त्यावेळी उत्सुकता चाळवली की, आपले सेलिब्रिटी मित्र ह्या लॉकडाऊनच्या काळात सध्या काय वाचन करत असतील, त्यांची आवडती कविता, पुस्तक कोणतीहे जाणून घेण्यासाठी खजिनाची संकल्पना सुचली. ह्या गप्पा निश्चितच प्रेक्षकांनाही मनोरंजक आणि माहितीपर ठरतील. लाइव सेशन्स केली तर प्रेक्षकांचाही त्यात सहभाग असेल, असं वाटल्याने खजिनाची इन्स्टा लाइव सेशन्स सुरू केली. ही सेशन्स सुरू झाल्यावर लक्षात आलं की, ह्या प्रत्येक कलाकाराकडे आपल्या सिनेसृष्टीतल्या कामाचा, अनुभवाचा आणि वाचनाचा एवढा खजिना आहे, की त्यामूळे ह्या सीरिजचे नावही कुठेतरी सार्थक झाल्याचे समाधान वाटले.
दुपारच्या वेळी ही सीरिज असूनही प्रत्येक लाइव सेशनला मिळणारा रसिकांचा भरभरून प्रतिसाद पाहून स्पृहा जोशीला हुरूप आला. बा.भ बोरकरांपासून ते शांता शेळके आणि कवी ग्रेस ह्यांपर्यंत अनेक कवींच्या कवितांची फर्माइश रसिकांनी केली. ह्या लाइव सेशन्समधल्या सेलिब्रिटींनीही एवढ्या अप्रतिम कवितांनी सेशन्स आठवणीतली केली, की, त्यामूळे 15 भागांनंतर ही रंगलेली सीरिज संपल्याने अनेक रसिकांचा हिरमोड झाला. ह्याविषयी विचारल्यावर स्पृहा सांगते, प्रत्येक सेशननंतर रसिकांचा मिळणारा प्रतिसाद हे दरवेळी माझा उत्साह वाढवणारे होते. म्हणूनच तर 14 भाग सेलिब्रिटींसोबत केल्यावर रसिकांसोबत केलेला शेवटचा भागही उत्तम रंगला. अनेकांनी खजिना संपल्यावर नाराजी व्यक्त केली. पण मला असं वाटतं की, प्रत्येक गोष्टीची थोडक्यात गोडी असते. कधी संपवणार ह्या प्रश्नापेक्षा का संपवलं हा प्रश्न सुखद असतो. सध्यापुरतं हा स्वल्पविमार आहे, असं म्हणूया. आता नवीन संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीला यायचा विचार आहे.

Tuesday, 5 November 2019

अभिनेत्री स्पृहा जोशीने ‘रंगबाज’च्या युनिटसाठी बनवलं जेवण

अभिनेत्री स्पृहा जोशी गेले काही दिवस आपल्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त होती. रंगबाज ह्या स्पृहाच्या नव्या वेबसीरिजचे चित्रीकरण मध्यप्रदेशमधील भोपाळ आणि चंदेरीमध्ये झाले आहे. रंगबाजच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी स्पृहाने सर्वांसाठी मस्त मेजवानीचा घाट घातला.
मध्यप्रदेशच्या चंदेरीमध्ये रंजबाजची टीम राहत असलेल्या किला कोठी हॉटेलध्येच स्पृहाने सर्वांसाठी फक्कड जेवण बनवले. चिकन करी आणि मस्त भेंडीच्या भाजीचा घाट घातला. रंगबाजच्या युनिटमधल्या शाकाहारींनी स्पृहाच्या हातच्या चविष्ट भेंडीच्या भाजीवर ताव मारला. तर मांसाहारी मंडळींनी चिकन करी फस्त केली. आपल्या हातचे जेवण सगळ्यांना आवडल्याचे दिसल्यावर स्पृहाचाही चेहरा फुलला.
अभिनेत्री स्पृहा जोशी सांगते, गेले कित्येक महिने आम्ही रंगबाजसाठी मेहनत घेत होतो. ह्या काळात एकमेकांसोबत भोपाळ, चंदेरी आणि मध्यप्रदेशच्या इतर भागांमध्ये चित्रीकरणा दरम्यान आम्ही सर्वच कलाकारांनी खूप वेळ एकत्र घालवला होता. त्यामुळे सर्वांसोबतच माझे जिव्हाळ्याचे संबंध झाले. ह्या सर्वांसाठी काहीतरी स्पेशल करावंस वाटलं. त्यामुळेच चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी माझ्या हातचं काहीतरी सर्वांना बनवून खायला घालावं, असं मनातं आलं. आणि मग शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा मी घाट घातला.
स्पृहा पूढे म्हणते, मला सर्वांसाठी प्रेमाने जेवण बनवायचा जेवढा आनंद झाला. त्यापेक्षा जास्त आनंद सर्वजण पोटभर जेवून, तृप्त झाल्यावर वाटला.” 

Friday, 25 October 2019

अभिनेत्री स्पृहा जोशीची यंदाची दिवाळी भोपाळमध्ये, घरच्यांच्या आठवणीने स्पृहा झाली भावूक

दिवाळी हा सणच एकत्र मिळून साजरा करण्याचा आहे. त्यामुळे दिवाळीसणाला तरी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढण्याचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. अभिनेत्री स्पृहा जोशी सुध्दा दरवर्षी न चुकता आपल्या घरच्यांसोबतच दिवाळी साजरी करते. पण यंदाची दिवाळी मात्र अपवाद आहे. स्पृहाची यंदाची दिवाळी तिच्या घरच्यांसोबत नाही आहे. ती एकटी भोपाळला असणार आहे. आणि त्यामूळे ती सध्या तिच्या घरच्यांना खूप मिस करत आहे.
स्पृहा जोशी ह्याविषयी सांगते, सध्या मी भोपाळमध्ये माझ्या आगामी हिंदी वेबसीरिज

च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सध्या वेगाने चित्रीकरणाचे काम सुरू आहे. इथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त अर्ध्या दिवसाची सुट्टी आहे. त्यामुळे आसपास राहणारे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांच्या घरी जातील. पण भोपाळपासून मुंबई खूप दूर असल्याने मला घरी पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे मी दिवाळीत भोपाळला अगदी एकटी असणार आहे.”
स्पृहा जोशी पूढे म्हणते, खरं तर, दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे. आजवरचा इतक्या वर्षांचा माझा नियम होता, की, दिवाळीला तर घरीच राहायचं. पण यंदा मात्र पहिल्यांदा घरच्यांपासून दूर एकटीच दिवाळीत राहत असल्याने मन भरून आलंय. अशावेळी जाणवतं, की, सणाच्यादिवशी आपली माणसं जवळ असणं किती महत्वाचं असतं. मला घरच्यांची खूप आठवण येतेय.” 

Monday, 16 September 2019

हॉटस्टारवर चर्चेत असलेल्या 'द ऑफिस' या कॉमेडी हिंदी वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये, अभिनेत्री स्पृहा जोशी दिसली 'गीता'च्या भूमिकेत

#spruhajoshi #Geeta #TheOffice #TheOffice2 #webseries #comedy #DreamersPR #hotstar

*Twitter* - 
Actress @spruhavarad as #Geeta in famous comedy web series #TheOfficeseason2
@DreamersPR 
#spruhajoshi #Geeta #TheOffice #TheOffice2 #webseries #comedy #DreamersPR  #hotstar 

*Facebook* - 
अभिनेत्री स्पृहा जोशी झळकली हॉटस्टारवरील 'द ऑफिस' या प्रसिद्ध हिंदी वेबसिरीजच्या दुस-या पर्वात
#spruhajoshi #Geeta #TheOffice #TheOffice2 #webseries #comedy #DreamersPR #hotstar

Monday, 2 September 2019

स्पृहा जोशीने केली ट्री-गणेशाची प्रतिष्ठापना

अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीची ओळख सजग आणि संवेदनशील कलाकार अशी आहे. तिच्या कृतीतूनच तिचे समाजभान वेळोवेळी प्रत्ययाला येत असते. स्पृहाच्या गावी गणपती बसतो. त्यामूळे जर गावी जाता नाही आले, तर मंगलमुर्ती घरात आल्यानंतरचे चैतन्यमयी वातावरण ती मिस करते. त्यावर आता उपाय म्हणून यंदा प्रथमच तिने घरात इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे. आपल्या परीने निसर्ग संवर्धनासाठी हातभार लागावा म्हणून तिने ट्रिगणेशाचे पूजन केले आहे. गणरायाच्या ह्या इको फ्रेंडली मूर्तीत एका रोपट्याचे बीज असल्याने 15 दिवसांनंतर त्यातून रोप उगवणार आहे.  
ट्रि-गणेशाची प्रतिष्ठापना केल्यावर स्पृहा जोशी म्हणाली, " दरवर्षी गावी जाणं शक्य होत नाही. म्हणून यावर्षी मी ठरवलं की आपल्या घरीच बाप्पाची छोटीशी मूर्ती आणून त्याची प्रतिष्ठापना करायची. म्हणून मी ट्रीगणेशाची स्थापना केली. दररोज त्याला पाणी घातल्यावर १५व्या दिवशी त्यातून छान रोपटे तरारून येणार आहे. मला हि कल्पना फारच आवडली त्यामुळे मी ठरवलंय कि आपल्या घरी जरी बाप्पा बसत नसले तरी यावर्षीपासून हि नवीन सुरवात करता येईल. मला वाटतं गणेशोत्सव साजरा करायची हि सगळ्यात सुंदर पद्धत आहे."
स्पृहा पूढे सांगते, “कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरूवात आपल्या घरापासूनच होते. त्यामूळे निसर्ग संवर्धनाचा श्रीगणेशा आपल्या घरापासूनच अशापध्दतीने सुरू करण्याची आता गरज आहे. “

स्पृहा जोशीने केली ट्री-गणेशाची प्रतिष्ठापना

अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीची ओळख सजग आणि संवेदनशील कलाकार अशी आहे. तिच्या कृतीतूनच तिचे समाजभान वेळोवेळी प्रत्ययाला येत असते. स्पृहाच्या गावी गणपती बसतो. त्यामूळे जर गावी जाता नाही आले, तर मंगलमुर्ती घरात आल्यानंतरचे चैतन्यमयी वातावरण ती मिस करते. त्यावर आता उपाय म्हणून यंदा प्रथमच तिने घरात इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे. आपल्या परीने निसर्ग संवर्धनासाठी हातभार लागावा म्हणून तिने ट्रिगणेशाचे पूजन केले आहे. गणरायाच्या ह्या इको फ्रेंडली मूर्तीत एका रोपट्याचे बीज असल्याने 15 दिवसांनंतर त्यातून रोप उगवणार आहे. 
ट्रि-गणेशाची प्रतिष्ठापना केल्यावर स्पृहा जोशी म्हणाली, " दरवर्षी गावी जाणं शक्य होत नाही. म्हणून यावर्षी मी ठरवलं की आपल्या घरीच बाप्पाचीछोटीशी मूर्ती आणून त्याची प्रतिष्ठापना करायची. म्हणून मी ट्रीगणेशाची स्थापना केली. दररोज त्याला पाणी घातल्यावर १५व्या दिवशी त्यातून छान रोपटे तरारून येणार आहे. मला हि कल्पना फारच आवडली त्यामुळे मी ठरवलय कि आपल्या घरी जरी बाप्पा बसत नसले तरी यावर्षीपासून हि नवीन सुरवात करता येईल. मला वाटतं गणेशोत्सव साजरा करायची हि सगळ्यात सुंदर पद्धत आहे."
स्पृहा पूढे सांगते, कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरूवात आपल्या घरापासूनच होते. त्यामूळे निसर्ग संवर्धनाचा श्रीगणेशा आपल्या घरापासूनच अशापध्दतीने सुरू करण्याची आता गरज आहे. 

Wednesday, 17 April 2019

सध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी !!

अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झांसीमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र हे चित्रीकरण ह्या आठवड्याअखेरीस आटोपून ती लवकरच परतणार आहे. आणि पाणी फाउंडेशनच्या श्रमदानात आमिर खान आणि इतर मराठी कलाकारांसह सहभागी होणार आहे.
सूत्रांच्या अनुसार, स्पृहा जोशी गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यातल्या पोखर ह्या गावात श्रमदानासाठी गेली होती. श्रमदानाशिवायही पाणी फाउंडेशनच्या वर्षभर होणा-या कार्यक्रमांना स्पृहा सक्रिय सहभागी होती.
अभिनेत्री स्पृहा जोशी 1 मे रोजी श्रमदानासाठी जाणार आहे. ती गेल्यावर्षीच्या अनुभवाविषयी सांगते,  मुंबई-पुण्यातल्या सुखासीन आयुष्याच्या बाहेर भयावह परिस्थितीत पाण्यासाठी वणवण करणा-या लोकांची आयुष्य पाणी फाउंडेशनच्या मोहिमेमूळे मला पाहायला मिळाली. पाणी फाउंडेशनसोबत, दुष्काळाशी दोन हात करताना, पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन संघटित होणारे, जातव्यवस्था निर्मुलन होऊन, एकमेकांमधले पिढ्यान् पिढ्यांचे मतभेद विसरून, एकत्र पंगतीला बसणारे गावकरी मी पाहिलेत. मोठ्या शहरात राहणारी सुखवस्तू कुटूंबातली उच्चशिक्षित मुलं, गावात येऊन कुदळ-फावडे घेऊन उन्हात घाम गाळताना पाहताना, इंडिया भारतात परतल्याचा सुखद अनुभव मिळतो.
स्पृहा पूढे सांगते, पाणी फाऊंडेशनची मोहिम आता चळवळ झालीय. पाणी फाउंडेशनसाठी काम करताना नैसर्गिक आपत्तीवर आपण मात करण्याचा आनंद गावकर-यांच्या आणि शेतक-यांच्या चेह-यावर मला दिसून आलाय. ह्या आनंदात मीही सहभागी असल्याचे समाधान काही आगळेच असते. गेल्यावर्षी मी एकटीच श्रमदानासाठी गेले होते. पण यंदा मी माझ्या आई आणि काकूसोबत श्रमदानात सहभागी असेन.”