Showing posts with label ‘फत्तेशिकस्त’. Show all posts
Showing posts with label ‘फत्तेशिकस्त’. Show all posts

Monday, 9 December 2019

‘फत्तेशिकस्त’ ला शालेय विद्यार्थ्यांचा दमदार प्रतिसाद

आपले भविष्य घडविण्यासाठी आपला वर्तमान सुरक्षित असणे गरजेचे असते. आपला गौरवशाली इतिहास पुढच्या  पिढीपर्यंत पोहचवायचा असेल तर त्याचं जतन आणि संरक्षण ही आपली जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची, शौर्याची गाथा पुढच्या पिढीला समजावी यासाठी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्तेशिकस्त’ चित्रपट शाळांतील विद्यार्थ्यांना दाखविण्यात येत आहे. राज्यभरातील असंख्य शाळांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. चौथ्या आठवड्यात ही चित्रपटाची जोरदार घोडदौड महाराष्ट्रभरात सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील हणमंतवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेने इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवला. ठाणे शहरातील युवाशक्ती ग्रुपने स्वामी विवेकानंद आश्रमयेऊर येथील ७० मुलांना हा चित्रपट दाखवला. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूल शाळेत शिकणाऱ्या सुमारे ६०० मुलांना हा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच मंगळवारी १० डिसेंबरला मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड पुणे यांनी आपल्या ८७५ विद्यार्थ्यासाठी ईस्क्वेअर टॉकीज येथे चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन केले आहे. या शाळांप्रमाणे इतर शाळांनी देखील यासाठी पुढाकार घेतला आहे.
या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळखशिवछत्रपती व त्यांचे अनेक पैलू यांचे दर्शन तर घडतेच तसेच त्यांच्या युक्त्यात्यांचे बुद्धीचातुर्य असे वेगवेगळे गुण फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळत असल्याच्या भावना विद्यार्थी चित्रपट पाहिल्यानंतर व्यक्त करतायेत.
मराठेशाहीचा इतिहास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेच त्यासोबतच खूप रोमांचकथरारक आणि अभिमानास्पद आहे. शिवाजी महाराजांनी अल्पशा सैन्यबळाच्या जीवावर अनेक लढाया यशस्वी केल्या. या गोष्टी विद्यार्थ्याना कळेल अशा भाषेत सांगत खरा इतिहास त्यांना समजवून सांगण्याचा आमचा प्रयत्न विविध शाळांनी दिलेला प्रतिसाद पाहता सफल झाल्याच्या भावना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी बोलून दाखवल्या. या चित्रपटाच्या निमित्ताने सुपरमॅन, स्पायडरमॅनबॅटमॅन यांना सुपरहिरो मानणाऱ्या आजच्या लहानग्यांना छत्रपती शिवाजी महराजांच्या रूपाने रिअल सुपरहिरो' अनुभवायला मिळत आहे.

Friday, 22 November 2019

बॉक्स ऑफिसवर ‘फत्तेशिकस्त’ची दमदार वाटचाल

चित्रपटाच्या माध्यमातून शिवचरित्र आजच्या पिढीसमोर पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या फत्तेशिकस्त या चित्रपटाला मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा जोरदार कौल मिळत आहे. कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेल्या फत्तेशिकस्तची बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल सुरू आहे. चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद दिवसागणिक वाढत असून पहिल्या आठवड्यात ४०० चित्रपटगृहांत प्रदर्शित होत या चित्रपटाने तब्बल ५.६५ कोटींची कमाई केली आहे. मुंबई,पुण्यासह महाराष्ट्रभरातील प्रमुख शहरांतून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. याखेरीज महाराष्ट्राबाहेर गुजरात,गोवा, कर्नाटक, निजाम, दिल्ली, मैसूर या शहरांतूनही फत्तेशिकस्तची क्रेझ वाढतेय.
उत्कंठावर्धक कथानकपटकथेची मुद्देसूद मांडणीमार्मिक संवादकलाकारांचा सुरेख अभिनयनयनरम्य लोकेशन्सउत्तम व्हिएफएक्स, शिवकालीन वेशभूषासुमधूर संगीतधडाकेबाज अॅक्शन्स आणि नेत्रसुखद सादरीकरण हे सर्व दिग्दर्शकांनी चांगल्या पद्धतीने दाखविल्याने एक उत्कृष्ट चित्रपट पाहिल्याचे समाधान प्रेक्षकांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांनी आपल्या शूर मावळ्यांना एकत्र करत स्वत:चे युद्धशास्त्र स्थापित केले आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा चमत्कार एका रात्रीत झाला नाही. त्यासाठी अपरिमित कष्ट उपसावे लागले. याची आपल्या सर्वांना जाणीव करून देणारा हा चित्रपट शिवभक्तांच्या आशीर्वादाने प्रत्येकापर्यंत यशस्वीरीत्या पोहचतोय.
सर्वजण चित्रपटातील संवादांपासून-गाण्यांपर्यंत आणि अभिनयअॅक्शनपासून-व्हिएफएक्सपर्यंत सगळ्याच गोष्टीचं कौतुक करत आहेत. स्वराज्याची ही गौरवगाथा सिनेरसिकांच्या चांगलीच पसंतीस पडली असून फत्तेशिकस्त’ चित्रपटाची ही यशस्वी घोडदौड प्रत्येक मराठी मनासाठी निश्चितच आनंददायी अनुभव आहे यात शंका नाही.

Monday, 21 October 2019

‘फत्तेशिकस्त’च्या कलाकारांची किल्ले मोहिम

दिवाळी म्हणजे उत्साहचैतन्यआणि आनंदाचा सण. या दिवाळ सणासोबत अनेक जुन्या रूढी, परंपराही जोडल्या  गेल्या आहेत. दिवाळीच्या सणादरम्यान किल्ले बांधण्याची जुनी प्रथा आहे. लहानांसोबत मोठेही त्यात आंनदाने सहभागी झाल्याचे पहायला मिळते. या प्रथेचा धागा पकडून आगामी फत्तेशिकस्त चित्रपटाच्या कलाकारांनी किल्ले बांधणीची मोहिम हाती घेत जुन्या प्रथेला उजाळा दिला.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरअभिनेता आस्ताद काळेअजय पुरकर, हरिश दुधाडेविक्रम गायकवाडप्रसाद लिमयेअक्षय वाघमारे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडेतृप्ती तोरडमलरुची सावर्णनक्षत्रा मेढेकर या कलाकारांनी किल्ले बांधणी केली. उत्सवांच्या व्याख्या सध्या बदलत चालल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर किल्ले बनवणे हा आनंदाचा ठेवा आहे. तो आवर्जून जपायला हवा यासाठीच आम्ही एकत्र येत या किल्ले बांधणीमध्ये आवर्जून सहभाग घेतल्याचे फत्तेशिकस्त चित्रपटाच्या कलाकारांनी यावेळी सांगितले.
पराक्रमाचे, शौर्याचे इतिहासाचे प्रतीक असलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीला समजावा व जतन व्हावा व त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने चित्रपट निर्मितीसोबत किल्लेबांधणीचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा करणाऱ्या फत्तेशिकस्तच्या टीमचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचेल हे नक्की !
ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत फत्तेशिकस्त येत्या १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Thursday, 10 October 2019

..... आणि अवघी मराठेशाही अवतरली !!


फत्तेशिकस्त चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षक पसंतीस
भव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाला ढोल ताशांच्या गजराची साथ आणि त्यासोबत मराठेशाहीतील एकापेक्षा एक उत्तुंग व्यक्तिरेखांचा रंगमंचावरचा अविष्कार. हे सगळंच अगदी भारावून टाकणारं..!! निमित्त होतं फत्तेशिकस्त या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याचं.
या सोहळ्याच्या निमित्ताने अवघी शिवशाही रंगमंचावर अवतरली होती. चित्रपटातील कलाकारांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत स्वराज्य स्थापनेसाठीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांना प्राणपणाने सोबत करणाऱ्या शिलेदारांचा संकल्पपट रसिकांना उलगडून दाखवला.
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य’ निर्मितीसाठी स्वराज्याचा शत्रू तो साऱ्यांचा शत्रू’ या न्यायाने लढले. फत्तेशिकस्त हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. भारतातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार फत्तेशिकस्त चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. फत्तेशिकस्त १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा अजोड पराक्रम, शिस्तबद्ध आखणी या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल. शिवाजी महाराजांचा प्रत्येक गुण आत्मसात करण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाल्याची भावना कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केली.
मृणाल कुलकर्णीचिन्मय मांडलेकरअजय पुरकरमृण्मयी देशपांडेअंकित मोहननिखिल राऊतहरीश दुधाडे,  समीर धर्माधिकारीआस्ताद काळेतृप्ती तोरडमलरमेश परदेशीअक्षय वाघमारेविक्रम गायकवाडरुची सावर्णअश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकरप्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके यासोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी फत्तेशिकस्त चित्रपटात आहे.
छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजवि.स खांडेकरदिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. साहस दृश्ये बब्बू खन्ना तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. व्ही. एफ.एक्स इल्युजन ईथिरीअल स्टुडियोज यांचे आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत. अजय आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.
'फत्तेशिकस्त१५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
 ट्रेलर लिंक   - http://bit.ly/FatteshikastTrailerHD  

Monday, 23 September 2019

अंकित इन अॅक्शन ‘फत्तेशिकस्त’ मध्ये साकारणार 'येसाजी कंक'

दमदार अभिनयभरदार शरीरयष्टी आणि जबरदस्त अॅक्शन स्टंट या त्रिसूत्रीच्या जोरावर अभिनेता 'अंकित मोहन ने फर्जंद’ चित्रपटातून सर्वांची मने जिंकली होती. आता पुन्हा एकदा आगामी ‘फत्तेशिकस्त’ या  चित्रपटातून अंकितच्या अभिनयाची आणि अॅक्शनची हीच जादू अनुभवयाला मिळणार आहे. शिवकाळातील शूर आणि विश्वासू सरदारांपैकी एक असणाऱ्या 'येसाजी कंकही महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी अंकित ने चांगलीच कंबर कसली आहे. 'येसाजी कंकयांना ‘शिवबाचा ढाण्या वाघ’ म्हणून ओळखलं जातं. मदमस्त हत्तीला ही आपल्या शौर्याने काही क्षणांत लोळवणाऱ्या येसाजी कंक यांचे स्वराज्यनिर्मितीत बहुमूल्य योगदान राहिले असल्याची महती इतिहासात वर्णलेली आहे.
अंकितला अॅक्शनची प्रचंड आवड असल्याने चित्रपटातील अॅक्शन्स सीन स्वत: करण्यासाठी अंकित आग्रही होता. यातील एका सीनसाठी तर अंकितने चक्क दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत तो सीन पूर्ण केला. त्याचा हा धाडसी शॉटस बघून सगळेजण थक्क झाले. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना अंकित सांगतात, ‘कोंडाजी फर्जंद'च्या यशानंतर 'येसाजी कंकयांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी केला आहे. माझा हा प्रयत्न प्रेक्षकांनाही आवडेल, असा विश्वास अंकित व्यक्त करतो.
ए.ए फिल्म्सचे सहकार्य व आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर व अनिरुद्ध आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजवि.स खांडेकरदिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत.
१५ नोव्हेंबरला फत्तेशिकस्त प्रदर्शित होणार आहे.

Thursday, 29 August 2019

‘फत्तेशिकस्त’ उलगडणार भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार

फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणाऱ्या भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या फत्तेशिकस्त चित्रपटातून आपल्यासमोर घेऊन येणार आहे.
मराठ्यांचे पराक्रमी पर्व शिवाजी महाराजांपासून सुरु होते. रयतेचा राजा’ किंवा ‘जाणता राजा’ याबरोबरच महाराजांना ‘शस्त्रास्त्रशास्त्र’ पारंगत म्हटले जाते... त्यांच्या युद्धनीतीचे धडे जगभरात अनेक देशांच्या सैन्यदलांना दिले जातात... त्यांच्या कुशल युद्ध नेतृत्वाखाली मराठ्यांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची कथा उलगडणाऱ्या "फत्तेशिकस्त" या ऐतिहासिक चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी धैर्यानेशौर्याने आणि तळपत्या तलवारीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारले. आता थेट घुसायचं आणि गनिम तोडायचा... असं लिहिलेल्या या पोस्टरमध्ये शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीचा व त्यांच्या आत्मविश्वासाचा हाच दरारा पहायला मिळतो आहे.गनिमी कावा’ चे तंत्र वापरत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुतफत्तेशिकस्त हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. भारतातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार फत्तेशिकस्त चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.
छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजवि.स खांडेकर,दिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. ध्व्नीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. साहस दृश्ये बब्बू खन्ना तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. व्ही. एफ.एक्स इल्युजन ईथिरीअल स्टुडियोज यांचे आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत.
'फत्तेशिकस्त' १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.