Showing posts with label ‘बायको देता का बायको’. Show all posts
Showing posts with label ‘बायको देता का बायको’. Show all posts

Tuesday, 25 February 2020

‘बायको देता का बायको’ चित्रपटाबाबत गैरसमज पसरवू नये - दिग्दर्शक सुरेश ठाणगे

‘बायको देता का बायको’ या चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासंदर्भात व चित्रपटाबाबत झालेल्या गैरसमजाबाबत खुलासा देण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना दिग्दर्शक सुरेश ठाणगे यांनी चित्रपटाबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे सांगत झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.  
प्रामाणिकपणे हा चित्रपट सर्वांपर्यंत पोहचावा अशी आमची इच्छा आहे. या चित्रपटातून कोणाचीही बदनामी करण्याचा हेतू नसून सद्यस्थिती दाखवली आहे. आम्हाला झालेली मारहाण पूर्वग्रह मनात ठेवून झाली असल्याचे आम्हाला समजले. ज्यांच्यामुळे हा प्रकार आमच्यावर ओढवला त्या मुलांच्या पालकांनी आम्हाला तकार न करण्याची विनंती केली. ज्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही हा चित्रपट केला त्याच मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही या हल्ल्याची पोलिसात तक्रार दाखल केली नाही, असं सांगत उगाच गैरसमज पसरवून चित्रपटाचे नुकसान न करता प्रत्येकाने हा चित्रपट आधी नक्की पहावा असे आवाहन निर्माता-दिग्दर्शकांनी केले आहे. आम्हाला चित्रपटातून नक्की काय सांगायचे आहे ते जाणून घ्यावे अशी विनंती दिग्दर्शक सुरेश ठाणगे व निर्माते धनाजी यमपुरे यांनी या पत्रकार परिषदेत केली.

Saturday, 20 July 2019

‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण विवाह संस्थेवर ग्रामीण पद्धतीने मार्मिक टिपण्णी

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. अनेकांसाठी  आनंदाचा तर काहींसाठी मात्र त्रासदायक ठरतो. वाढते शहरीकरण, शेतीची दुरावस्था, बेरोजगारी यांतून अनेक सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. ग्रामीण भागात ही याचे परिणाम दिसू लागले आहेत. या साऱ्या प्रश्नांचा वेध विनोदी आणि मार्मिक पद्धतीने घेणारा ‘बायको देता का बायको हा  मराठी चित्रपट २३ ऑगस्टला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार संगीत व ट्रेलर अनावरण सोहळा युवा संगीतकार जोडी चिनार- महेश यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. वाय डी फिल्मस्’ निर्मित ‘बायको देता का बायको या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश साहेबराव ठाणगे यांचे तर निर्मिती धनंजय रामदास यमपुरे यांची आहे.
शेतीत उत्पन्न नाहीनोकरीची संधी नाहीवाढती महागाई आणि त्यात जोडीदारांबद्दलच्या अवास्तव अपेक्षा यांतून आजची तरुण पिढी त्रस्त आहे. ही स्थिती अनेक घरांतून दिसत असली तरी या सामाजिक प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने पाहिल्याचे दिसत नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून या साऱ्याचा ऊहापोह अतिशय गमतीशीरपणे करण्यात आला आहे.
ए.आर मानेधनश्री गणात्रा अरुण पवार यांनी लिहिलेल्या गीतांना गायक सुरेश वाडकर, हंमसिका अय्यरआर्या आंबेकररोहित राऊत यांचा स्वरसाज लाभला आहे. धनश्री गणात्रा. ए आर माने यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. पार्श्वसंगीत अवि लोहार यांनी दिले आहे.
सुनील गोडबोलेकिशोर ढमालेअभिलाषा पाटीलवैशाली जाधवसिद्धेश्वर झाडबुकेप्रशांत जाधव,राणी ठोसरश्वेता  कुलकर्णीआरती तांबेअमोल पठाडे,वैष्णवी अनपटप्रतीक पडवळहनुमंत गणगे प्रीतम साळुंखेप्रमिला जगतापमहादेव सवई या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. कथापटकथासंवाद सुरेश साहेबराव ठाणगे यांची आहे. छायांकन विश्वजीत साहू तर नृत्यदिग्दर्शन राजेश राणेनंदुकुमारअमिता कदम यांचे आहे. संकलन राजेश शाह यांचे आहे. साऊंड मिक्सिंग राजीव कुमार तर ध्वनीमुद्रण जबाबदारी संकीर्तन सिदर, सय्यद सिकंदरविशाल बनसोडे यांनी सांभाळली आहे. कला दिलीप धुमाळ यांची आहे रंगभूषा रवी फुटाणे तर वेशभूषा सुनील भाडळे यांची आहे. निर्मिती व्यवस्था सतीश टापरे यांची असून कार्यकारी निर्माते सागर सूर्यवंशीकुपेन्द्र पवार आहेत.
विवाह संस्थेवर ग्रामीण पद्धतीने गमतीशीर टिपण्णी करणारा ‘बायको देता का बायको २३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Saturday, 6 April 2019

‘बायको देता का बायको’ चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण. वयात आलेल्या प्रत्येक युवकाला आपलंही लवकर लग्न व्हावं, सुंदर व सुशील बायको मिळावी आणि आपली जोडी चारचौघांत उठून दिसावी अशी इच्छा असते. याच भावनेतून बायकोच्या शोधात निघालेल्या युवकांची कथा सांगणारा ‘बायको देता का बायको’  हा धमालपट मराठीत येऊ घातला आहे.
वाय डी फिल्मस् निर्मित ‘बायको देता का बायको’  चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित करण्यात आली. लग्नपत्रिकेद्वारे प्रदर्शित करण्यात आलेली चित्रपटाची पहिली झलक उत्सुकता वाढवणारी आहे. आंतरपाटाआड एका युवकाची अर्धी झलक पहायला मिळत असून यावर लिहिलेला मजकूरही चित्रपटाची गंमत व त्यातला महत्त्वपूर्ण आशय दाखवून देणारा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश साहेबराव ठाणगे यांचे तर निर्मिती धनंजय रामदास यमपुरे यांची आहे.
ऐन लग्नसराईच्या मोसमात धमाल उडवून देण्यासाठी ‘बायको देता का बायको’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.