Showing posts with label ‘भयभीत’. Show all posts
Showing posts with label ‘भयभीत’. Show all posts

Friday, 28 February 2020

‘भयभीत’ चित्रपटाचा शानदार प्रीमियर

ट्रेलर पासून  उत्सुकता  निर्माण करणाऱ्या ‘भयभीत’ या चित्रपटाचा शानदार  प्रीमियर सोहळा  नुकताच मान्यवरांच्या  उपस्थितीत संपन्न  झाला. चित्रपटातील कलाकारांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील  अनेक  मान्यवरांनी या प्रिमियर सोहळ्याला हजेरी लावली. यात किशोरी शहाणे, सीमा देशमुख, राधिका हर्षे, गायत्री दातार, भाग्यश्री लिमये, निथा शेट्टी, पौर्णिमा डे, गौरी किरण  या  अभिनेंत्रीसोबत  दिग्दर्शक ओम राऊत, स्वप्ना  वाघमारे-जोशी, अभिजीत देशपांडे, विश्वास जोशी, शशांक उदापूरकर, वैभव चिंचाळकर, लेखक विश्वास पाटील, गायिका जान्हवी प्रभू अरोरा आदि मान्यवर उपस्थित होते.
यातील प्रश्न आपल्याला गुंतवून ठेवतात. आपल्याकडून काही घडलं आहे  हे  दाखवून देणारा मानसिक संघर्ष शेवटपर्यंत  उत्तम पद्धतीने मांडला असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितीत मान्यवरांनी  यावेळी  दिल्या. रहस्यमयी कथेला लाभलेली  गूढ संगीताची अचूक साथ चित्रपटगृहात आपल्याला 'भयभीत' करून सोडते असं सांगत, आजवर मराठीत आलेला उत्तम भयपट अशा शब्दात उपस्थितीत मान्यवरांनी चित्रपटाचे कौतुक  केले आहे.  कलाकारांच्या अप्रतिम अभिनयासोबतच दर्जेदार निर्मितीमूल्यांचा वापर आणि वेगात घडणाऱ्या घटना हे देखील 'भयभीत'चं वैशिष्ट्य आहे
आईच्या अचानक झालेल्या मृत्यनंतर मानसिक धक्का बसलेल्या श्रेयाच्या वागणुकीत रहस्यमयी बदल या एकाच धाग्याभोवती  या  चित्रपटाचे नाट्य रचले आहे.  दिपक नायडू दिग्दर्शित ‘भयभीत’  चित्रपटात  सुबोध भावे, पूर्वा गोखले, गिरीजा जोशी, मधू शर्मा, मृणाल जाधव, यतीन कार्यकर आदि कलावंतांच्या भूमिका आहेत. अभय सिन्हा, ‘अॅक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि ‘ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ यांची  प्रस्तुती असलेल्या या  चित्रपटाची निर्मिती शंकर रोहरा, दिपक नारायणी यांची आहे. अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

Monday, 24 February 2020

‘भयभीत’ २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात रंगणार ‘भयभीत’ करणारा गुंतागुंतीचा खेळ

गूढ भास आणि अनाकलनीय गोष्टींची अनामिक भीती कायम मनाला असते. या भीतीमागे काही गुपितंही दडलेली असतात. काहींसाठी ते भास असतात काहींसाठी भासापलीकडे बरंच काही. याच भास-आभासाचा अनुभव अनेकांना आलेला असतो ज्यातून तयार होतात काही अगम्य आणि गूढ गोष्टी. आयुष्यात घडणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणारे गूढ   याचा अनपेक्षित अनुभव देणारा ‘भयभीत’ हा चित्रपट २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभय सिन्हा, ‘अॅक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि ‘ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ यांची  प्रस्तुती असलेल्या ‘भयभीत’ चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक नायडू यांचे असून निर्मिती शंकर रोहरा ,दिपक नारायणी यांची आहे.
आईच्या अचानक झालेल्या मृत्यनंतर मानसिक धक्का बसणाऱ्या श्रेयाच्या वागणुकीत रहस्यमयी बदल व्हायला सुरूवात होते. श्रेयाला होणाऱ्या भासामागे नक्की काय गूढ दडलंय? याचा शोध घेताना प्रत्येक टप्प्यावर नवीन 'खेळ' सुरु होतो. केवळ शक्यतांचा अंदाज बांधून होणाऱ्या भासाची त्या भासामागे असणा-या व्यक्तीची उकल होते न होते, असं वाटत असतानाच काहीतरी आणखी अतर्क्य गूढ रहस्य समोर येऊन उभं ठाकतं आणि वेगळा खेळ रंगतो. भ्रम-विभ्रमामागे नक्की काय वास्तव आहे? याचा भयानक गुंतागुंतीचा रंगणारा खेळ म्हणजे ‘भयभीत’ हा चित्रपट.
सुबोध भावे, पूर्वा गोखले, गिरीजा जोशी, मधू शर्मा, मृणाल जाधव, यतीन कार्यकर आदि कलावंत असणार आहेत. 'भयभीत'  चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे व पूर्वा गोखेले बऱ्याच वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. मराठी सिनेमांसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी मृणाल जाधव ही चुणचुणीत बालकलाकार या चित्रपटात आहे. भोजपूरी चित्रपटात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मधू शर्मा ही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. रहस्यमय घटना आणि मानवी नातेसंबंध याद्वारे कथानकात निर्माण करण्यात आलेली या सिनेमातील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.
अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कलादिग्दर्शन एकनाथ राणे तर साऊंड डिझायनर सतीश पुजारी आहेत. गीतकार मंदार चोळकर असून संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी नकाश अझीज यांनी सांभाळली आहे. अर्जित सिंग व मीनल जैन–सिंग यांनी चित्रपटातील गीते स्वरबद्ध केली आहेत. कथा एस.ए तर पटकथा आणि संवाद दिनेश जगताप यांचे आहेत. छायांकनाची जबाबदारी वासू यांनी सांभाळली असून नृत्यदिग्दर्शन किरण गिरी यांचे आहे. अॅक्शन शकिल शैकिल यांची आहे. कार्यकारी निर्माता अनिल सिंग आहेत.