Showing posts with label ‘What’s up लग्न’. Show all posts
Showing posts with label ‘What’s up लग्न’. Show all posts

Monday, 13 July 2020

‘What’s up लग्न’ ‘अॅमेझॉन प्राइम’वरही हिट

सोशल मिडीयाच्या जगात रममाण असलेल्या आजच्या तरुण जोडप्यांना अतिशय मार्मिक संदेश देण्यात यशस्वी ठरलेला  ‘What’s up लग्न हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ वरही हिट ठरतोय. अल्पावधीतच जगभरातून ६ लाखाहून अधिक व्ह्यूज या चित्रपटाने मिळवले आहेत. आजच्या तरुणाईची मानसिकतालग्न संस्काराविषयीचे मतत्या विषयीचे विचार अतिशय तरलतेने मांडण्याचा प्रयत्न ‘What’s up लग्न चित्रपटातून केला असूनप्रेक्षकांना तो खूपच भावत आहे. अॅमेझॉन प्राइम’ वर प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
वैभव तत्ववादीप्रार्थना बेहरेविक्रम गोखलेवंदना गुप्तेविद्याधर जोशीस्नेहा रायकरअश्विनी कुलकर्णी,  विनी जगताप आदी मराठीतील नामवंत कलाकारांसोबत सुनील बर्वेसविता मालपेकर आणि जयवंत वाडकर पाहुण्या कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. फिनक्राफ्ट मीडिया अँड एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांचे असून प्रस्तुती ‘व्हिडीओ पॅलेस’ यांची आहे. 

Monday, 30 September 2019

सोनी मराठीवर ‘What’s up लग्न’ दुपारी १.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. प्रक्षेपण

आजच्या तरुणाईची मानसिकतालग्न संस्काराविषयीचे मतत्या विषयीचे विचार अतिशय तरलतेने मांडत नातेसंबंधांमधील अनुबंध उलगडून दाखवणाऱ्या ‘What’s up लग्न हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावला  होता. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर येत्या रविवारी ६ ऑक्टोबरला सोनी मराठीवर दुपारी १.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. पाहता येणार आहे.
वैभव प्रार्थनाची भन्नाट केमिस्ट्रीचित्रपटाचा फ्रेश लुकहलकी-फुलकी प्रेमकथानयनरम्य लोकेशन्स आणि आजच्या काळात सर्व जोडप्यांना लागू पडेल असा मार्मिक संदेश या सगळ्या युएसपीमुळे विश्वास जोशी दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे.
वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत विक्रम गोखलेवंदना गुप्तेविद्याधर जोशीस्नेहा रायकरअश्विनी कुलकर्णीविनी जगताप आदी मराठीतील नामवंत कलाकारांसोबत सुनील बर्वेसविता मालपेकर आणि जयवंत वाडकर पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत.
 ‘फिनक्राफ्ट मीडिया’ अँड एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. ने ‘What’s up लग्न चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस यांची आहे. प्रेमाचा अनुबंध उलगडणाऱ्या ‘What’s up लग्न चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरचा आस्वाद नक्की घ्या. सोनी मराठीवर रविवारी ६ ऑक्टोबरला दुपारी १.०० वा. व सायंकाळी ७.०० वा.