Showing posts with label Aggbai Sasubai. Show all posts
Showing posts with label Aggbai Sasubai. Show all posts

Thursday, 21 May 2020

Zee Marathi - Aggbai Sasubai

लॉकडाऊनमध्ये ‘अग्गंबाई सासूबाई’ मधील आसावरी जोपासतेय हे छंद
झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका हि अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत. या मालिकेतील सर्वांची लाडकी आसावरी म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ लॉकडाऊनमध्ये घरी कसा वेळ घालवतेय हे जाणून घायची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
लॉकडाऊनमुळे कलाकार देखील घरीच आहेत त्यामुळे त्यांच्या घरातील अशी एक जागा जिथे बसून वेळ कसा जातो हे कळत देखील नाही, अशा जागेबद्दल विचारलं असता अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या, "दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी घराचं नूतनीकरण केलं,तेव्हा मुलाच्या बेडरूममधली गॅलरी मला हवा तशी बांधून घेतली होती. घर १३ व्या मजल्यावर असल्यानं छान हवा येते. इथं बसून कॉफी पिणं आणि गाणी ऐकणं हे दोन माझे आवडते छंद आहेत."

Tuesday, 28 April 2020

Zee Marathi - Aggbai Sasubai

मोकळा वेळ मिळाल्याने मी आनंदी आहे - तेजश्री प्रधान

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका हि अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत. या मालिकेतील शुभ्रा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या काय करतेय हे जाणून घायची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. त्यासाठी तेजश्री सोबत साधलेला हा खास संवाद
१. लॉकडाऊनमुळे मालिकेचं शूटिंग थांबलय आणि इतकी मोठी सुट्टी मिळाली आहे, इतका मोकळा वेळ मिळाल्यावर कसं वाटतंय?
- गेल्या १२ वर्षात मला इतका मोकळा वेळ मिळाला नव्हता. माझं सतत काहीना काही सुरु होतं. त्यामुळे मला बरं वाटतंय. सध्या मी फक्त आराम करतेय. मिळालेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग स्वतःसाठी करून घेतेय. रिकामा वेळ आणि आराम या दोन्ही गोष्टींचा आनंद घेतेय. एरवी रोजच्या अत्यंत व्यग्र दिनक्रमामुळे डाएटकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे आता डाएटकडेही लक्ष देतेय. रोज थोडा वेळ योगा करते आणि बाकी वेळेत नवीन वेब सिरीज आणि चित्रपट बघते.
२. लॉकडाऊनमध्ये घरी राहून तू काय मिस करतेय?
- खरं सांगायचं तर जी विश्रांती मिळाली आहे त्याची मला गरज होती. सक्तीची सुट्टी का होईना, पण मोकळा वेळ मिळाल्याने मी आनंदी आहे. पण घरातून बाहेर जाणं, फिरणं या गोष्टींची आठवण येते.
३. तू सध्या सोशल मीडियापासून दूर आहेस, त्यामागे काय कारण आहे?
- घरात असून देखील सोशल मीडियावर कमी असण्याचं कारण म्हणजे हा वेळ माझा आहे आणि सोशल मीडियावर राहून तो फुकट घालवणे मला पटत नाही. एरवी वेळेअभावी खूप गोष्टी करायच्या राहून गेल्या आणि त्या करायची संधी आता मिळाली आहे. तर त्या संधीचं सोनं करायला हवं. खरं सांगायचं तर सोशल मीडियावर लाईव्ह वगैरे येणं मला फारसं आवडत नाही. एकदा सगळं पूर्ववत झालं कि हे सर्व करायचंच आहे. म्हणून सध्या मी सोशल मीडियापासून जरा लांब आहे.
४. लोकांना तू काय सांगशील?
- सगळ्यांनी प्लिज घरीच थांबा. उगाच बाहेर जाऊ नका. आता जर शिस्त पाळली आणि घरी थांबलो तर लवकर बाहेर जात येईल. पण जर आताच्या घडीला बाहेर गेलो तर पुढे अजून घरीच थांबावं लागेल. 

Monday, 27 April 2020

Zee Marathi - Aggbai Sasubai

'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील आसावरी खऱ्या आयुष्यात देखील आहे सुगरण

करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. त्यामुळे कलाकारांना त्यांची आवड-निवड जपण्यासाठी मोकळा वेळ मिळाला आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका हि अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत.
अभिनेत्री निवेदिता सराफ या देखील त्यांच्या आवडत्या गोष्टी करताना दिसतायेत. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतून त्या आसावरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेत आसावरीला स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आसावरी एक उत्तम सुगरण आहे आणि तिच्यासारखंच निवेदिता यांना देखील स्वयंपाक करायला खूप आवडतो. 'मला जेवण करून खायला घालायला खूप आवडतं, खूप लोक माझ्या घरी माझ्या हातचं जेवून जातात त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा असं मला वाटतं,' असं त्या म्हणतात.
लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत निवेदिता त्यांच्या घरी रोज वेगवेगळे पदार्थ बनवत असततात. त्यांच्या रेसिपीज चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांचं स्वत:चं युट्यूब चॅनेलही असून त्यावर त्यांचे स्वयंपाक करतानाचे अनेक व्हिडिओ आहेत.निवेदिता यांनी नुकताच 'व्हेजिटेबल स्टू' या पदार्थाची रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यांना देखील ही रेसिपी आवडली असून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता.

Sunday, 26 April 2020

Zee Marathi - Aggbai Sasubai

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या टीमला मिस करतोय - आशुतोष पत्की
लॉकडाऊनमध्ये मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे घराघरात बबडय़ा म्हणजेच सोहम या व्यक्तिरेखेची चर्चा असून, या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता आशुतोष पत्की याचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. बबडय़ा म्हणजेच आशुतोष त्याचा वेळ घरी कसा घालवतो याबद्दल आशुतोष सोबत साधलेला हा खास संवाद
१. ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे हे ऐकल्यावर तुझी प्रतिक्रिया काय होती?
-  कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन हा सरकारने आपल्या सेफ्टीसाठी घेतलेला निर्णय आहे आणि तो योग्य आहे. त्यामुळे आपण घरी राहून त्यांना सहकार्य करायला पाहिजे.
२. तू या मोकळ्या वेळेत काय करतोस?
-  मी घरी माझा वेळ माझ्या घरच्यांसोबत घालवतोय. या मोकळय़ा वेळात मी अनेक गोष्टी शिकायचा प्रयत्न करतोय. सध्या मी कूकिंग शिकतोय. वेगवेगळय़ा रेसिपीज मी ट्राय करतोय. घरच्यांना त्यांच्या कामात मदत करतोय, स्वत:च्या हेल्थकडे लक्ष देतोय.
३. तुझं शेड्युल काय आहे सध्या?
- या मोकळ्या वेळेत आपण अनेक छान वेब सिरीज किंवा चित्रपट बघू शकतो. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चित्रपट बघतो. हे माझं क्वारंटाईनचं शेडय़ुल बनलंय.
४. तू ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या टीमला किती मिस करतोय?
‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेची संपूर्ण टीम माझं परिवारच आहे. त्यामुळे मे त्यांना खूप मिस करतोय. सगळे सेटवर माझी खूप काळजी घ्यायचे. निवेदिता ताई माझ्यासाठी खूप छान छान रेसिपीज बनवायच्या. आम्ही सगळे व्हिडीओ कॉलवरून टचमध्ये आहोत. दिवसातून १३ ते १५ तास आम्ही शूटिंग करायचो पण आता या सुट्टीमुळे सगळे निवांत आहेत.
५. तू आता सगळ्यात जास्त काय मिस करतोय?
- मी ट्रॅव्हलिंग मिस करतोय. जर मला इतकी मोठी सुट्टी मिळाली असती तर मी नक्कीच फॉरेन ट्रिपला गेलो असतो. पण आताच्या परिस्थितीत आपण कुठेच बाहेर जाऊ शकत नाही आहोत म्हणूनच मी ट्रॅव्हलिंग मिस करतोय.

Tuesday, 21 April 2020

Zee Marathi - Aggbai Sasubai

सोशल मीडियापासून लांब, पुस्तकांच्या जवळ...

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका हि अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत. या मालिकेतील शुभ्रा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या काय करतेय हे जाणून घायची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. तेजश्री सध्या वाचनात व्यस्त आहे. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या या मोठ्या सुट्टीमध्ये ती अवांतर वाचन करतेय. सोशल मीडियापासून लांब राहून तेजश्री हा वेळ स्वतःसाठी देतेय. सोशल मीडियावर वेळ न दवडता तोच वेळ सत्कारणी लावायचं तेजश्रीने ठरवलंय आणि म्हणूनच ती पुस्तकांच्या प्रेमात रमली आहे. पुस्तकांच्या जवळ गेलेली तेजश्री सोशल मीडियापासून सध्या लांब असल्यामुळे तिचे चाहते मात्र तिला मिस करत आहेत.

Friday, 10 April 2020

Zee Marathi - Aggbai Sasubai

हे आहे बबड्याचं क्वारंटाईनचं शेड्युल

करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. हे कलाकार घरी आपल्या वेळ कसा घालवत आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे घराघरात बबड्या म्हणजेच सोहम या व्यक्तिरेखेची चर्चा असून या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता आशुतोष पत्की याचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. बबड्या म्हणजेच आशुतोष त्याचा वेळ घरी कसा घालवतो याबद्दल बोलताना तो म्हणाला, "हा २१ दिवसांचा लॉकडाऊन म्हणजे सरकारने आपल्या सेफ्टीसाठी घेतलेला निर्णय आहे त्यामुळे आपण घरी राहून त्यांना सहकार्य करायला पाहिजे. मी घरी माझा वेळ माझ्या घरच्यांसोबत घालवतोय. या मोकळ्या वेळात मी अनेक गोष्टी शिकायचा प्रयत्न करतोय. सध्या मी कूकिंग शिकतोय. वेगवेगळ्या रेसिपीज मी ट्राय करतोय. घरच्यांना त्यांच्या कामात मदत करतोय, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देतोय. या वेळेत आपण अनेक छान वेब-सिरीज किंवा चित्रपट बघू शकतो. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चित्रपट बघतो. हे माझं क्वारंटाईनचं शेड्युल बनलंय."