Showing posts with label Majhya Navaryachi Bayko. Show all posts
Showing posts with label Majhya Navaryachi Bayko. Show all posts

Monday, 23 March 2020

Zee Marathi - Majhya Navaryachi Bayko

गुरूला धडा शिकवून शनाया आणि राधिका उभारणार विजयाची गुढी
गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतंअसं म्हणत जवळपास  वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायकोही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेयया मालिकेने ११०० भाग पूर्ण केले आणि आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.
या मालिकेने एक विलक्षण वळण घेतलं आहेनुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिल्या प्रमाणे माया गुरूच्या सांगण्यावरून राधिकाला ब्लॅकमेल करतेयपण शनायामुळे राधिकाला गुरूचा सगळा प्लॅन कळतोशनाया राधिका एकमेकेंची माफी मागतात आणि एकत्र येऊन गुरूला धडा शिकवायचं ठरवतातत्यानुसार दोघीपण आता गुरूच्या प्रेत्येक छोट्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेतमायाला आपल्या बाजूने करून गुरूला चांगलाच धडा शिकवायचा असा राधिकाचा प्लॅन आहेगुडीपाडव्याच्या दिवसापासून राधिका आणि शनाया गुरूला हरवण्याचा दिशेने एक एक पाऊल उचलणार आहेतया दोघी गुरूला कशी अद्दल घडवणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा गुडी पाडवा विशेष भाग फक्त झी मराठीवर.