Thursday, 8 July 2021

'हिडन' मध्ये दडलंय काय? याचं रहस्य १६ जुलैला 'पिंग पॉंग' ओटीटीवर!


प्रतिक्षाकुतूहलउत्सुकता शमवित 'हिडनवेबसिरीजचा ट्रेलर लॉंच!

अब जो भी होगा 'हिडनहोगा…१६ जुलैला 'पिंग पॉंगओटीटीवर!

 

'पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रालि.'च्या 'पिंग पॉंगओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हिडन’  या  नव्या भव्य हिंदी वेबसिरीजच्या ट्रेलरचे दिमाखात प्रदर्शन करण्यात आलेयेत्या १६ जुलै रोजी 'हिडनही मेगा वेबसिरीज 'पिंग पॉंगओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेप्रतिक्षाकुतूहलउत्सुकता शमवित आज 'हिडनमधील कलाकारतंत्रज्ञांच्या यांसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील आलिशान ' क्लबयेथे 'हिडन'ची उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या या ट्रेलरचे बहारदार प्रदर्शन करण्यात आले. 'गहन रहस्यांची उत्कंठा अधिक गहन'  करणाऱ्या या ट्रेलरबद्दल कमालीचे कुतूहल तयार झाले असून १६ जुलैला अनेक 'हिडनअसलेल्या रहस्यांची 'पिंग पॉंगओटीटी प्लॅटफॉर्मवर उकल होणार आहे.

'हिडनही  भागांची आणि  सीझन असलेली मेगा वेब सीरिज आहे, 'हिडनही  काल्पनिक कथा आहेया वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहिल्यानंतरच यातील रहस्य नेमकं काय आहे त्याचा प्रेक्षकांना उलगडा होणार आहेही एक डार्कशेड असलेली मुंबई शहरातील गोष्ट आहेहिडन मधील सर्व व्यक्तिरेखा काल्पनिक असून गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी आहेगुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील वेगवान घटना प्रेक्षकांना गुंतवून ठेवतीलपोलिसगुन्हेड्रग्जखूनरहस्य यांचे वेगवान चित्र हिडन मध्ये पहायला मिळणार आहेयेत्या १६ जुलै रोजी ही भव्य वेबसिरीज पिंग पॉंग एंटरटेन्मेन्ट या नव्या ओटीटी चॅनेलवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहे.

एका रात्री प्रदीप राजे (एसीपी क्राइम ब्रँचयांना त्यांचा विश्वासू खबरी (हलका)  मध्यरात्री अडीचच्या सुमारास तुरूंगात एकाचा खून होणार आहेअशी माहिती देतोएसीपी राजे ही गोष्ट गांभीर्याने घेतातआयुक्त यशवंत नाईक यांना याबाबत पूर्व कल्पना देतातसमय दीक्षित या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अज्ञात मारेकऱ्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्याला वाचविण्यासाठी राजे आपल्या तीन विश्वासू अधिकाऱ्यांसोबत (संदीपप्रभाकर आणि उमरयोजना आखतातपोलिस आयुक्त (यशवंत नाईक), यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याने पोलिस अधिकारी राजे वैयक्तिकरित्या या बाबीकडे लक्ष देतातधक्कादायक बाब म्हणजे समय तुरूंगात आहे आणि "मारेकरीम्हणून जन्मठेपेची शिक्षा भोगतोयत्याचा जिवलग मित्र मनन शाह याच्या हत्येचा त्याच्यावर आरोप येतोसमय खरोखर गुन्हेगार आहे कि निर्दोष ? त्याला राजे वाचवू शकणार कात्याच्या भूतकाळात असे काय घडले ज्यामुळे त्याच्यावर असे आरोप आले आहेत ?नेमकं वास्तव काय आहेअनेक 'हिडनगोष्टींची उकल होण्यासाठी हिडन पहावीच लागेल..

महाराष्ट्रातील प्रसिद्ध उदयोजक जीवन बबनराव जाधव यांनी 'पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ द्वारे 'पिंग पॉंग हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म खास जगभरातील भारतीय प्रेक्षकांसाठी लॉंच केला आहे. या ओटीटीवर अत्यंत वेगळ्या आणि आकर्षक नव्या वेबसिरीज, वेब मुव्हीज, बॉलिवूड, हॉलिवूड मुव्हीज तसेच इतर एंटरटेन्मेन्ट शोज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. 'हिडन' वेबसिरीज बाबत बोलताना या वाहिनीचे सर्वेसवा सीएमडी जीवन बबनराव जाधव म्हणाले, "भाषेला, भावनांना आणि विषयांना मर्यादा नसतात आणि म्हणूनच 'पिंगपॉंग एंटरटेनमेंट' ओटीटी ऍप चालू करायचं ते जास्तीत जास्त भाषांमधून जास्तीत जास्त कन्टेन्ट घेऊन लोकांपर्यंत पोहोचावं ह्या हेतूने... लोकांना आवडणारा कन्टेन्ट हा भाषेमुळे मर्यादित नसावा, ज्या प्रेक्षकाला ज्या पद्धतीचा कन्टेन्ट हवा तो आम्ही उपलब्ध करून दिला आहे आणि ह्या पुढील काळातही देऊ. उत्तम संहिता, कलाकार, तंत्रज्ञ घेऊन सतत नवनवीन कन्टेन्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू आणि त्याला फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगातून प्रेक्षक पसंती मिळेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. 'पिंग पॉंग एंटरटेनमेंट' अँपवर प्रस्तुत होणाऱ्या HIDDEN ह्या बिग बजेट वेबसिरीसचे ७ भाग १६ जुलै पासून  प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत आणि महत्वाची बाब म्हणजे आम्ही ह्या ७ एपिसोडच शूट हे अवघ्या १५ दिवसात वैविध्य ठिकाणी जाऊन केलं आहे आणि ते पण करोना काळात... ज्या वेळी शूटिंगचे नियम शिथिल केले होते त्यावेळी. ह्या वेबसिरीससाठी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ  ह्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हि कलाकृती केली आहे आणि ती प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल अशी मला खात्री आहे"

'पिंग पॉंग'चे चॅनेल हेड चेत्न डीके म्हणाले "आजच्या जीवनात जगण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या म्हणजे रोटीकपडामकान और मोबाईल... आज जगात बहुतांश लोकांकडे स्मार्ट फोन आहेत आणि त्यातूनच आपण लोकांना उत्तमोत्तम कन्टेन्ट देऊ शकतो ह्या भावनेने आम्ही 'पिंग पॉंग एंटरटेनमेंट'ची सुरुवात केलीज्यावेळी HIDDEN हा कन्सेप्ट माझ्या समोर आला त्यावेळी आम्ही त्याला ताबडतोब फायनल केला कारण त्याचा उत्तम कथापटकथा आणि संवाद... मागील १५ वर्षांचा अनुभव पणाला लावून मी हि संहिता करण्याचे ठरवले कारण हि संहिता सर्वच वयोगटातल्या लोकांना आवडेलखिळवून ठेवेल अशी आहेजशी आम्ही संहिता ऐकली होती तशीच हुबेहूब चित्रित झाली असून त्याबद्दल निर्मातेदिग्दर्शककलाकार आणि तंत्रज्ञ ह्या सर्वांचे मनापासून अभिनंदन!!! येत्या काळात नवनवीन संहिता घेऊन त्याचे प्रयोजन करूनत्याचे प्रभावी मार्केटिंग करून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत आणि प्रेक्षकांना ते पसंतीस उतरावे असा आमचा मानस आहे."

'हिडनमध्ये नेमकं काय 'हिडनआहे याविषयी लेखक दिग्दर्शक विशाल सावंत म्हणाले, "हिडन बाबत सर्वच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहेयेत्या १६ जुलैला ही उत्सुकता अधिकच गहिरी होईल आणि नेमकं हिडनमध्ये काय हिडन आहे याविषयी चर्चा सुरु होईलत्यांच्या साऱ्या प्रश्नांची उकल होण्यासाठी प्रेक्षकांनी या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहणं गरजेचं आहेमुंबई शहरातील डार्कशेड हिडन मध्ये दिसेल.  गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील वेगवान घटना प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील."

'पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रालि.''साठी विशाल पीसलेचा आणि महेश पटेल यांनी 'हिडन'ची निर्मिती केली असून विशाल सावंत यांनी या वेबसिरीजचे लेखन दिग्दर्शन केले आहेकमल सिंग यांचे छायांकन असून रसीद खान यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. 'हिडनमध्ये संतोष जुवेकरसंजय सोनूदक्ष अजित सिंगजीत सिंगमनवीर चौधरीरजत वर्मारोहित परशुराम आणि संदीप पाठक यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

ओरिजनल मनोरंजनाचा अमर्याद आनंद मिळविण्यासाठी आपल्याला 'गुगलप्ले स्टोअरकिंवा 'ॲपस्टोअरवरजाऊन 'पिंग पोंगहे ॲप डाऊनलोड करावे लागेल किंवा https://pingpongentertainment.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करणे खूपच सोपे आहे.

हिंदी वेबसीरीज "HIDDEN" च्या  ट्रेलरची लिंक

वेबसाइट: https://pingpongentertainment.com/

प्लेस्टोर: https://play.google.com/store/apps/details?id=com.pingpongenteriversity.ott

युट्युब : https://youtu.be/Sgrok9FSi38

फेसबुक: https://www.facebook.com/pingpong.ott

इंस्टाग्राम: https://www.instagram.com/pingpongenteriversity/

No comments:

Post a Comment