Thursday, 11 November 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 38 ! दादूसना गमवावं लागणार ... जयला अश्रु अनवार !

मुंबई ११ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना देण्यात येणारे टास्क दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत जाणार आहेत, असे दिसून येतं आहे. पहिले मीरा आणि आता दादूस यांना देखील एक गोष्ट गमवावी लागणार आहे. आता दादूस त्या गोष्टीचा त्याग करण्यास तयार होतील ? कोणासाठी त्याग करणार दादूस ? हे समजेल आजच्या भागामध्ये.  

बिग बॉस दादूस यांना सांगणार आहेत, कॅप्टन पदाच्या उमेदवारला समर्थन देण्यासाठी आपल्याला एक गोष्ट गमवावी लागणार आहे आणि ती गोष्ट आहे आपले केस. दादूस, जय खूप भावुक झाले. जयला अश्रु अनावर झाले. दादूसना देखील रडू कोसळले. दादूस म्हणाले,  खरंतर पहिल्या दिवसापासून या घरामध्ये मला प्रत्येकाने प्रेम दिले आहे. आपल्याला एक वरिष्ठ मंडळी समजून मला प्रत्येकाने प्रेम दिलं. मी आज या ठिकाणी खासकरून जय विषयी सांगू इच्छितो की, त्याने या घरात वडीलस्थानी मला बसवलं आहे, प्रत्येकवेळेस त्याने तो मानसन्मान मला दिला आहे...”

बघूया दादूस त्यांना सांगितलेली गोष्ट करू शकतील का? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

No comments:

Post a Comment