पुणे, दि. १९ /७/२०२३ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख व्यापारी संघटनांचे पदाधिकारी पहिल्यांदाच पुण्यात एकवटले आणि त्यांच्या संयुक्त सभेत येत्या ऑक्टोबरमध्ये पुण्यातच राज्यस्तरीय व्यापार परिषद घेण्याचा एकमताने ठरले. तसेच *बाजार समिती कायद्यातील अपेक्षित बदल* आणि व्यापाराबाबतच्या इतर जीएसटी , १३८ नेगोशिएबल इंस्ट्रूमेंट एक्ट , बी आई एस , बीपीटी आदी प्रश्नांवर सरकारशी चर्चा करण्यासाठी कोअर कमिटी स्थापण्याचा निर्णय झाला.
दि पूना मर्चंटस् चेंबरने महाराष्ट्रातील प्रमुख शिखर संघटनांची एक संयुक्त सभा आयोजित केली होती. सदर सभेस महाराष्ट्र चेंबर आफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. ललीत गांधी, FAM चे अध्यक्ष मा. श्री. जितेंद्र शाह, कैमिट चे चेअरमन श्री. मोहन गुरनानी, ग्रोमा( GROMA) चे अध्यक्ष श्री. शरद मारु, FAM चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. राजेश शहा, कोल्हापूर चेंबर आफ कॉमर्सचे श्री. वैभव सावर्डेकर, FAM चे महासंचालक श्री. प्रितेश शहा, श्री.. संदीप भंडारी, फ़ाम से उपाध्यक्ष श्री बालचंद्र कटारिया , सेक्रेटरी श्री. किशोर शहा, फ़ाम चे श्री. हेमंत भुट्टा, ग्रोमाचे श्री. भिमजीभाई भानूशाली, श्री. अमृत जैन, तसेच चेंबरचे माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले, दिपक बोरा, अजित सेटिया, उपाध्यक्ष अजित बोरा व चेंबरचे कार्यकारिणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
या सभेमध्ये प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती १९६३ च्या कायद्यामध्ये आत्ताच्या व्यापार पध्दतीनुसार बदल करण्यासंबंधी, तसेच खाद्यान्न वस्तूंच्या व्यापारातील विविध अडचणींसंबंधी चर्चा करण्यात आली. शासनाबरोबर संपर्क करुन चर्चा करण्यासाठी श्री. ललीत गांधी, श्री. जितेंद्र शहा, श्री. राजेंद्र बाठिया, श्री. मोहन गुरनानी व श्री.शरद मारु अशा ५ प्रतिनिधींची मुख्य कमिटी स्थापन करण्यात आली.
तसेच महाराष्ट्रातील ३६ जिह्ल्यातील व्यापारी संघटनांच्या अध्यक्षांची उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापारी यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व व्यापारी यांची भव्य राज्यव्यापी परिषद पुण्यामध्ये घेण्याचे ठरले. या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत सचिव रायकुमार नहार व आभार सहसचिव ईश्वर नहार यांनी केले, अशी माहिती फ़ेडरेशन ऑफ़ एसोसिएशन ऑफ़ महाराष्ट्र चे अध्यक्ष जितेंद्र शाह यांनी दिली.
No comments:
Post a Comment