Wednesday 21 August 2024

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईला नवभारत हेल्थकेयर अवॉर्ड्स २०२४ मध्ये मिळाला सर्वोत्कृष्ट मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल पुरस्कार

किलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईला नवभारत हेल्थकेयर अवॉर्ड्स २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रुग्णांचा आमच्यावरील विश्वास आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे. या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय आम्ही आमचे डॉक्टर्सनर्सेस आणि सहायक कर्मचारी यांच्यासह संपूर्ण टीमच्या अतुलनीय कार्यनिष्ठेला देऊ इच्छितो. रुग्णांना जागतिक दर्जाच्या देखभाल सेवासुविधा प्रदान करण्यासाठी आमची संपूर्ण टीम करुणा व आदर भाव बाळगूनअथक काम करत असते.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईचे संचालक डॉ बिपीन चेवले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ते म्हणाले, "या पुरस्काराने आमच्या कामाचा सन्मान केला आहेइतकेच नव्हे तर आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम संभव देखभाल मिळाली पाहिजे ही आमची बांधिलकीची भावना देखील यामधून अधोरेखित करण्यात आली आहे. अपेक्षापूर्ती करण्याबरोबरीनेच अपेक्षांच्या वरचढ कामगिरी करून दाखवणारीसहानुभूतीपूर्वक आणि नावीन्याने प्रेरित असलेली देखभाल पुरवण्याप्रती आमची वचनबद्धता या पुरस्काराने बळकट केली आहे. आम्ही हा पुरस्कार आमच्या रुग्णांना समर्पित करू इच्छितोते आमच्यावर विश्वास ठेवतातम्हणूनच आम्हाला उपचारांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत राहते."

No comments:

Post a Comment