'लाइफ्स गुड व्हेन लाइफ्स शेयर्ड' या संदेशाला बळकटी देऊन, समाजाला एकत्रित करणे आणि तरुणांना जीवनरक्षक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे हा या उपक्रमाचा उद्देश्य
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025 - "लाइफ्स गुड व्हेन लाइफ्स शेयर्ड" या मुख्य संदेशासह सामाजिक जबाबदारी बाबत आपली बचनबद्धता बळकट करण्याकरिता LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया त्यांच्या मेगा रक्तदान मोहिमेची तिसरी आवृत्ती सुरू करत आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट समाजाला विशेषतः तरुणांना एकत्रित करणे आणि 70 शहरांमध्ये 400 रक्तदान शिबिरे आयोजित करणे हा आहे.
2019 आणि 2023 या वर्षात, LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने सुमारे [188 शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केलेत, ज्यामुळे 17,700 हून अधिक नोंदणी झाल्या. या यशावर आधारित, 2025 ची मोहीम 30,000 नोंदणी मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवून या मोहिमेचा प्रभाव आणखी वाढवण्यासाठी कंपनी प्रयत्नरत आहे. प्रत्येक शिबिरात रक्तदात्यांना आवश्यक वैद्यकीय तपासणी, अल्पोपहार आणि प्रशंसा प्रमाणपत्रे दिली जातील, ज्यामुळे त्यांनी एक अखंड आणि उत्साहवर्धक दान केल्याची आठवण त्यांच्याकडे राहू शकेल. [केअर टुडे फंड, युनायटेड वे मुंबई आणि साक्ष्म भारती फाउंडेशन सारख्या विश्वासार्ह भागीदारांच्या सहकार्याने LG भारतात ऐच्छिक रक्तदानाची संस्कृती मजबूत करण्याचे उद्दिष्ट घेऊन चालते.
"या उपक्रमाबद्दल बोलताना LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे एमडी हाँग जू जिओन म्हणाले, "आम्ही अर्थपूर्ण सहभागाने CSR कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत. मेगा रक्तदान मोहिमेची ही तिसरी आवृत्ती लोकांसाठी जीवनाचे कल्याण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. आमचे उद्दिष्ट ' लाइफ्स गुड व्हेन लाइफ्स शेयर्ड’ या आमच्या मुख्य संदेशाशी सुसंगत राहून समाजाला सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि या उद्देश्यासाठी जागरूकता पसरविण्यासाठी एकत्रित करणे आहे."
प्रत्यक्ष रक्तदान शिबिरे घेण्यासोबत LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया देशभरात रेडिओ आणि डिजिटल माध्यमांद्वारे नागरिक जनजागृती मोहीम राबवेल. रक्तदानाचे महत्त्व आणि फायदे यांबद्दल लोकांना जागरूक करणे हा या जनजागृती मोहिमेचा उद्देश आहे.
सहभाग अधिक सुलभ आणि उपलब्ध करण्यासाठी, LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया मेगा रक्तदान मोहिमेसाठी एक समर्पित मायक्रोसाइट - [https://lg-india.com/blood-
या उपक्रमाद्वारे, LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया समाजाला दान करण्यास मदत करण्यासाठी आणि त्याचा परतावा सुद्धा देण्यासाठी तसेच "लाइफ्स गुड व्हेन लाइफ्स शेयर्ड" या विश्वासाला पाठिंबा देत आहे.
मोहीम, आगामी शिबिरे आणि सहभागी कसे व्हावे याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://lg-india.com/blood-
No comments:
Post a Comment