आषाढी एकादशीला झी टॉकीजवरून कीर्तनकारांशी साधा लाईव्ह संवाद
आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते, पंढरपूरात दाखल झालेल्या भक्तांची मांदियाळी, चंद्रभागेचा काठ, प्रदर्शिणा मार्ग, दर्शन बारीत भाबड्या भक्तांची आस. पण सध्याच्या काळात लॉकडाऊनमुळे भक्तजनांना पंढरीची वारी करणं शक्य नसल्यामुळे झी टॉकीज वाहिनी त्यांच्यासाठी हा उत्सवच घरी घेऊन येणार आहे. झी टॉकीज "बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल" एक सांगीतिक नजराणा वाहिनीवर रात्री ८.३० वाजता सादर करणार आहे. पण त्याचसोबत आषाढी एकादशीची सकाळ प्रेक्षकांसाठी मंगलमय बनवण्यासाठी झी टॉकीजच्या फेसबुक पेजवर १० नामवंत कीर्तनकार लाईव्ह येणार आहे. या कठीण काळात पांडुरंगाशी एकरूप होत, सकारात्मक राहण्याची प्रेरणा आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची एक अनोखी संधी "झी टॉकीज" प्रेक्षकांना देते आहे.
पहिल्यांदाच महाराष्ट्रातील १० सुप्रसिद्ध कीर्तनकार अशा प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामध्ये ह.भ.प. भगवती महाराज सातारकर, ह.भ.प. पुरषोत्तम दादा महाराज पाटील, ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील, ह.भ.प. जलाल महाराज सय्यद, ह.भ.प. तुकाराम महाराज मुडे, ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे, ह.भ.प. प्रशांत महाराज ताकोते, ह.भ.प. चारुदत्त महाराज आफळे, ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, ह.भ.प. समाधान महाराज शर्मा या कीर्तनकारांचा समावेश असणार आहे. गायिका कार्तिकी गायकवाड आणि अभिनेत्री दीप्ती भागवत देखील फेसबुक पेजद्वारे लाईव्ह प्रेक्षकांच्या भेटीस येतील. सकाळी ९ वाजल्यापासून सलग ६ तास हे कीर्तनकार हरी नामाचा गाजर, श्रद्धा, सकारात्मकता, समानता, नाती, शिक्षण, प्रगती, सुखी संसाराचे सूत्र, आरोग्य, मनःशांती अशा वेगवेगळ्या विषयांवर फेसबुकद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यासाठी यंदा पंढरीच्या वारीला नाही तर झी टॉकीजच्या फेसबुक पेजला भेट द्या आणि घर बसल्या भक्तिरसामध्ये तल्लीन व्हा.
No comments:
Post a Comment