झी युवावरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या भरगोस प्रतिसादामुळे मालिकेने नुकताच ३५० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतंच या मालिकेच्या चित्रीकरणासाठी नचिकेत म्हणजेच अभिनेता निखिल दामले याने एक दिव्य पार पाडलं, ते म्हणजे डबल सीट घेऊन सायकल चालवण्याचं. एका सीनच्या चित्रीकरणासाठी नचिकेतला सईला सायकलवर बसवून डबलसीट घेऊन जायचं असतं. त्या सीनच्या शूटिंगसाठी नचिकेतने फावल्या वेळात डबलसीट घेऊन सायकल चालवायचा सराव केला आणि शेवटी त्या सिनच चित्रीकरण पूर्ण झालं.
पण निखिलला डबलसीट घेऊन सायकल नीट चालवता येत नाही हे कळल्यावर सईची म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णीची प्रतिक्रिया काय होती हे सांगताना गौरी म्हणाली, "जेव्हा मला कळलं कि निखिल डबलसीट घेण्यासाठी सराव करतोय तेव्हा मला खात्री होती कि हा व्यवस्थित शिकेल आणि सिन व्यवस्थित पूर्ण करेल. त्याचा सराव बघून मी निश्चिन्त होते. आपला आपल्या सहकलाकारावर विश्वास असेल तर आपण एखादा सिन अजून उत्तम प्रकारे करू शकतो. जर मीच घाबरली असती तर निखिल देखील कुठेतरी तो सिन करताना डगमगला असता. पण हि सायकलची सफर खूपच मजेदार होती आणि हसत खेळात या सिनच चित्रीकरण पूर्ण केलं. अखेरीस निखिलला डबलसीट जमली असं मी म्हणेन."
No comments:
Post a Comment