कोविड-१९ आणि इतर अनेक डायग्नोस्टिक सुविधा पुरवणार
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२१: भारतातील आघाडीचा व्यवसाय सेवा पुरवणारा, आरोग्य तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म मेडिकाबाजारने कोरियातील आघाडीची पॉईंट ऑफ केयर टेस्टिंग आणि इन-विट्रो डायग्नोस्टिक कंपनी बॉडीटेक मेड आयएनसी सोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. ही भागीदारी अतिशय खास ठरणार असून यामध्ये मेडिकाबाजार आपल्या विशाल नेटवर्कद्वारे बॉडीटेकच्या क्रांतिकारी इन-विट्रो डायग्नोस्टिक सुविधांचे वितरण करेल. या भागीदारीच्या अंतर्गत मेडिकाबाजार बॉडीटेकचे एएफआयएएस १ आणि एएफआयएएस ६ इम्युनोअसे ऍनालायझर्स यासारखे ऑटोमेटेड डेस्कटॉप अनालायझर्स विविध रेंजेन्ट्स आणि डायग्नोस्टिक किट्ससह वितरित करेल. यामुळे कोविड-१९चे निदान करता येईल तसेच हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, हार्मोनल आणि डेंग्यू, रोटा व एडेनोव्हायरस यासारख्या इतर संसर्गांचे देखील निदान करता येईल. याला यूएस एफडीए ५१०(के) मंजुरी मिळाली आहे.
मेडिकाबाजारचे संस्थापक व सीईओ श्री. विवेक तिवारी यांनी सांगितले, "या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही भारताच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये दर्जेदार पॉईंट ऑफ केयर टेस्टिंग सुविधा प्रदान करू शकू आणि अशाप्रकारे देशाच्या परीक्षण व निदान इकोसिस्टिममध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी लक्षणीय योगदान देऊ. कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर आल्यानंतर देखील आपल्याला सर्व प्रकारची काळजी घेणे खूप गरजेचे आहे आणि पॉईंट ऑफ केयर टेस्टिंगमुळे निगराणी, उपचार आणि संसाधनांच्या वाटपासंदर्भात संचालनात्मक निर्णय घेण्यासाठी क्लिनिकल निर्णय वेगाने घेण्यात मदत मिळेल. पॉईंट ऑफ केयर टेस्टिंगमुळे वेळेची बचत होते व त्याचे दीर्घकालीन सामाजिक व आर्थिक लाभ मिळतात. मेडिकाबाजार आणि बॉडीटेकची ही भागीदारी पॅथॉलॉजी सेवांना साहाय्य प्रदान करण्यासाठी आमच्या डायग्नोस्टिक्स पोर्टफोलिओला अधिक मजबूत करेल."
बॉडीटेक मेड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. एएलएन प्रसाद यांनी सांगितले, "एएफआयएएस पॉईंट ऑफ केयर तपासणी ही अशाप्रकारची अनोखी डायग्नोस्टिक सुविधा आहे जी इम्युनॉलॉजिकल तपासणी निकषांची विशाल श्रेणी प्रदान करून, फक्त बोटावर एक लहानसा छेद करून मिळवलेल्या नमुन्याच्या आधारे तपासणी करवून युजर्सना जास्तीत जास्त सुविधा देते. यामुळे डॉक्टरांना क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये टेस्ट्स करता येतात आणि पुराव्यांवर आधारित उपचार देण्याबाबत तातडीने निर्णय घेता येतात, तपासणीचे अहवाल तात्काळ मिळणे ज्यामध्ये अत्यावश्यक असते अशा क्रिटिकल केयर सुविधांमध्ये हे खूप महत्त्वाचे ठरते. भारतात परीक्षण व निदान सुविधांचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झालेले आहे. मेडिकाबाजारसोबत आमच्या भागीदारीच्या माध्यमातून परीक्षण सुविधांचे विकेंद्रीकरण करून देशाच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये या सुविधा पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे. देशातील द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या शहरांमध्ये पसरलेले मेडिकाबाजारचे विशाल नेटवर्क, १.५ लाखांहून अधिक मेडिकल प्रॅक्टिशनर्स आणि ५०,००० पेक्षा जास्त वैद्यकीय आस्थापना यांना एएफआयएएसच्या वेगवान अहवालांचे लाभ मिळतील."
No comments:
Post a Comment