~ लॉन्ग वेट फॉर डे १ कॅम्पेनमध्ये बाळाचे पहिल्या क्षणापासून रक्षण करण्यात आईची मदत करण्याची जॉन्सन्स बेबीची वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली आहे ~
मुंबई, 15 मे 2024 - बाळाच्या त्वचेच्या देखभालीमध्ये आघाडीचा ब्रँड जॉन्सन्स बेबीने 'द लॉन्ग वेट फॉर डे १' ही डिजिटल फिल्म सादर करून माता व मातृत्वाच्या वाटचालीचा सन्मान केला आहे. मदर्स डेच्या निमित्ताने लॉन्च करण्यात आलेल्या, डीडीबी मुद्राने तयार केलेल्या नवीन फिल्ममध्ये दत्तक, आयव्हीएफ, प्रीटर्म अशा विविध मातृत्वांचा समावेश करण्यात आला असून ही फिल्म प्रत्येक प्रकारच्या मातृत्वाचे समर्थन करण्याची ब्रँडची बांधिलकी अधोरेखित करते.
जॉन्सन्स बेबीच्या #PromisePehlePalSe कॅम्पेनचा पुढील भाग म्हणून सुरु करण्यात आलेल्या 'द लॉन्ग वेट फॉर डे १' मध्ये मातृत्वाचा अनोखा प्रवास सुरु करत असलेल्या नेहा, माया आणि गीत यांच्या हृदयस्पर्शी कथा पाहायला मिळतात. हॉस्पिटलच्या बेडवर बाळाची वाट पाहत असताना, मनात दाटून येणाऱ्या आशाआकांक्षांपासून ते मातृत्वाच्या आजवरच्या प्रवासाच्या फ्लॅशबॅकपर्यंत, ही फिल्म भावभावनांचे हिंदोळे घेणारे आईचे मन चित्रित करते.
आई होता यावे यासाठी नऊ वर्षे प्रयत्न केल्यानंतर नेहा आयव्हीएफमार्फत गरोदर राहते. मातृत्वाच्या प्रवासात अडीअडचणी, आव्हानांचा सामना करावा लागणाऱ्या असंख्य महिलांचा अढळ निर्धार आणि दुर्दम्य आशेचे प्रतिबिंब या फिल्ममध्ये पाहायला मिळते. गीत आपल्या दत्तक बाळाची अतिशय आतुरतेने वाट पाहते आहे, मातृत्वाचा हा अतिशय अनोखा आणि सुंदर प्रकार मन स्पर्शून जातो. मायाची गोष्ट प्रीमॅच्युअर बाळांची काळजी घेणाऱ्या आईचे शारीरिक व मानसिक बळ आणि सोशिकपणा दर्शवते, अपुऱ्या दिवसांच्या बाळाच्या बाबतीत असलेल्या अनिश्चिततांना सोबत घेऊन वाटचाल करणारे हे मातृत्व अचंबित करते.
बाळाचा चेहरा पहिल्यांदा पाहायला मिळेपर्यंतचा प्रत्येक आईचा प्रवास वेगवेगळा आणि अनोखा असतो. पण प्रत्येक आई आपल्या बाळाला त्याचे संपूर्ण संरक्षण करण्याचे वचन देते. बाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून संरक्षण करण्यात जॉन्सन्स बेबी ब्रँड आईची मदत करतो. 'पहले पल से प्रोटेक्शन है हर माँ का और हमारा वादा' या ब्रँडच्या वचनबद्धतेने फिल्मची सांगता होते.
नवीन कॅम्पेनबद्दल केनव्यूचे बिझनेस युनिट हेड - इसेन्शियल हेल्थ अँड स्किन हेल्थ व व्हीपी मार्केटिंग श्री. मनोज गाडगीळ यांनी सांगितले, "प्रत्येक आईचा प्रवास अनोखा आणि खास असतो, पण काहीजणींना मातृत्वासाठी खूप वाट बघावी लागते. बाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापर्यंतची प्रत्येक आईची गोष्ट निराळी असते पण जन्माच्या पहिल्या दिवसापासून बाळाचे रक्षण करण्याचे वचन मात्र प्रत्येक आई देत असते. आम्ही देखील तेच वचन देतो. आमच्या नवीन डिजिटल कॅम्पेनमध्ये आम्ही प्रत्येक आईचे अतुल्य बळ व प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याच्या क्षमतेचा सन्मान करत आहोत, खासकरून अशा माता ज्यांना बाळ होण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. जॉन्सन्स बेबी मातांना व त्यांच्या जीवाहुनही मौल्यवान बाळांना अगदी सुरुवातीपासून साहाय्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. आईवडिलांच्या गेल्या कित्येक पिढ्यांना साथ देणारा ब्रँड म्हणून आम्हाला अभिमान आहे की, प्रत्येक मातृत्वाच्या वाटचालीत आमची विशेष भूमिका आहे, बाळाच्या जन्माच्या पाहिल्यादिवसापासून सर्वोत्तम उत्पादने पुरवून बाळाचे संरक्षण करण्यात आम्ही मदत करत आहोत."
डीडीबी मुद्राचे ग्रुप क्रिएटिव्ह डायरेक्टर्स हर्षदा मेनन आणि सिद्धेश खटावकर म्हणाले, "मातृत्व कधीच साधेसोपे नसते. आम्हाला या फिल्मसाठी मातृत्वाच्या वाटचालीतील अस्सल भावभावना, उत्साह, दुःख आणि आनंद हवे होते. या फिल्ममध्ये तीन मातांच्या गोष्टी इतर अनेकांचे प्रतिनिधित्व करत आहेत."
जॉन्सन्स बेबीने विविध समुदायांमधील १००० पेक्षा जास्त मातांना सहभागी करवून घेऊन #JourneyToDay1 कॅम्पेनच्या माध्यमातून लोकप्रिय राष्ट्रीय, क्षेत्रीय सेलिब्रेटीज आणि इन्फ्ल्यूएंसर्ससोबत मदर्स डे साजरा केला आहे. ब्रँड वेगवेगळ्या मजेशीर स्पर्धा आयोजित करणार आहे, ज्यामध्ये मॅक्रो मॉमी इन्फ्ल्यूएंसर्स एका डूडल बुकमार्फत आपला मातृत्वाचा प्रवास सर्वांसोबत शेयर करतील, इतर मातांना देखील आपल्या मातृत्वाची अनोखी गोष्ट इतरांना सांगण्यासाठी व या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रित करतील.
डिजिटल फिल्मसाठी लिंक: https://youtu.be/GZibW3kqT8c
No comments:
Post a Comment