Sunday, 24 October 2021

अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सोडवणार स्टोरीटेलची ‘केस नंबर ००२’


स्टोरीटेलवर दिग्गज साहित्यिकांसोबतच नव्यादमाच्या प्रतिभावंतांनाही विशेष स्थान दिले जात आहे. आपल्या मातृभाषेतील नवनवे साहित्य ऑडिओबुक्सद्वारे सातत्याने  स्टोरीटेलवर निर्माण होत असून रसिकांचा प्रतिसादही अभूतपूर्व असा मिळत आहे. लेखिका सायली केदार यांच्या केस नंबर ००१ च्या पहिल्या सिझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर या मालिकेचा दुसरा सिझन प्रख्यात अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या आवाजात स्टोरीटेल मराठीवर प्रदर्शित होत आहे.

'केस नंबर ००२' विषयी लेखिका सायली केदार सांगतात "केस नंबरचा पहिला सिझन लिहिताना त्यावर मी आणि माझ्या पब्लिशर सई तांबेनी बरंच काम केलं होतं. श्रोत्यांना कसं खिळवून ठेवता येईल हे प्रत्येक एपिसोडमध्ये काटेकोरपणे बघत होतो. सिरीज रिलीज झाली तेव्हा आम्ही केलेल्या कामाबद्दल समाधानी होतो पण कसा response येईल याबद्दल खूप उत्सुकता होती. मात्र सिरीज भरपूर तास ऐकली गेली आणि comments चा, मेसेजेचा आणि emails चा पाऊस पडला. लोकांना ती गोष्ट खूपच आवडली आणि ती अगदी अनपेक्षितपणे बराच काळ best sellers मध्ये झळकली. अर्थातच दुसरा सिझन लिहीताना माझ्या स्वतःकडून आणि लोकांच्या या सिरीजकडून, त्या पात्रांकडून बऱ्याच अपेक्षा होत्या आणि आहेत. मुख्य पात्र इन्सपेक्टर निरंजन प्रभु हेच असल्याने आणि त्याची तपासाची, कामाची पद्धत तीच असल्यानी थोडा nostalgia सुद्धा सिझन २ मध्ये आहे. स्टोरीटेलच्या टीमबरोबर काम करणं ही खूपच enjoyable गोष्ट. आम्हाला काम करताना जशी मजा आली तशीच श्रोत्यांनाही ऐकताना मजा यावी येईल."

गीतांजली कुलकर्णी यांनी या सीरिजला आवाज दिला आहे, त्यांच्या या अनुभवाबद्दल त्या म्हणाल्या "‘केस नंबर ००२’ चा अनुभव यासाठी चांगला होता कारण की सई आणि सायली दोघीही खूप मन लावून काम करतात. आम्ही एकत्र मिळून खूप चर्चा केल्या, त्या खूप इनपुट्स देतात, त्यामुळे असं नाही वाटत कि तिथे आपण फक्त आहोत तिथं. आपल्याला मदत करायला खूप लोकं असतात. आणि छोट्या छोट्या गोष्टींकडेसुद्धा लक्ष देतात. हे पात्र तसंच साउंड नाही ना होत आहे, वेगळं वाटतंय ना? तर त्यामुळे काम करताना जे सुरुवातीला अस्पेशिअली गरज असते. कि आपल्याला एक्झॅक्टली पात्राचा आवाज त्याच्या टेम्प्रामेंटप्रमाणे त्याचं बोलणं ठरवायचं असतं. तेव्हा मदत झाली खूप सईची आणि सायलीची. आणि नंतर अर्थातच तुम्हाला अंदाज येतो आणि मग तुम्ही फाईंडआऊट करता कि कसं असेल हे पात्र आणि तुम्ही करत जाता. हे एक टीम वर्क आहे. केस नंबर ००२ मधील थरार, भीती, प्रेम प्रसंग, असे अनेक प्रसंग आणि त्यातील भाव रेकॉर्ड करताना मला फार मजा आली. ऑडिओबुक रेकॉर्डिंगची प्रोसेसच मला मेडिटेटिंग वाटते"

'केस नंबर ००२' या सीरिजमध्ये निरंजन प्रभू हा एक साधा अप्पर मिडला क्लास, सर्वसामान्य माणसू. अर्थार्जनासाठी आणि आवड यासाठी प्रत्येकच माणसू काही न काही काम करत असतो. तसंच निरंजन त्याच्या पॅशनसाठी पोलिस खात्यात आला. पण वर्दी म्हणजे कणखर आणि तटस्थ असा ग्रह आणि अपेक्षा असली तरीही माणसू म्हटलं की emotions आले, family आली. दोन्ही बाजू सांभाळणं आलं. पण घरच्या जबाबदाऱ्यांना ओझं न मानता त्यांचा केस समजनू घेण्यासाठी उपयोग करणाऱ्या निरंजनकडे एका रात्री एक माणसू बायकोची मिसिगं कंप्लेंट घेऊन येतो. बायको गायब होऊन काहीच तास व्हायच्या आत. तिची वाट बघण्याआधी याला ती गायब झाल्याची खात्री आहे. निरंजन त्या सणकी नवऱ्याची केस घेतो आणि त्याच्या बायकोचा, अपर्णाचा मृत्यू होतो. या केस नं ००२ चा तपास करताना निरंजनला नेमकं कोणतं सत्य कळतं? एकामागून एक संशयित आणि साक्षीदार संपत जाताना ही केस सोडविण्यात निरंजन यशस्वी होतो का? पहिल्याच केसच्या यशानंतर वाढलेल्या अपेक्षा पुऱ्या करताना निरंजनची होणारी तारेवरची कसरत आणि गुन्हेगाराची हाताबाहेरची सूडवृत्ती दाखवणारी ही  रहस्यमय ‘केस नंबर ००२’ अनेक गुपितांसोबत रसिकांची उत्कंठा ताणत त्यांना सहज गुंतवरून सोडते.

इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, गुजराती आणि कन्नड या ११भारतीय भाषांमध्ये एकूण २ लाखांहून अधिक ऑडिओबुक आणि ईबुक्स प्रकाशित करणारी स्टोरीटेल ही आघाडीची संस्था आहे. ऑडिओबुक्स साहित्य निर्मितीतून एकापेक्षा एक दर्जेदार साहित्यकृती प्रभावशाली ठरत असून वैचारिक आणि संवेदनशील समाज निर्मितीत 'स्टोरीटेल' विशेष भूमिका बजावत आहे. मराठीतील हजारो सर्वोत्तम पुस्तके कुठेही कधीही ऐकण्याचे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी आपल्याला स्टोरीटेल ‘गुगल प्ले स्टोअर’ http://bit.ly/2rriZaU आणि ‘iOS अॅप स्टोअर’ https://apple.co/2zUcGkG दोन्हीवर उपलब्ध आहे

प्रोमो लिंक

https://www.facebook.com/storytelmarathi/videos/157510726589923

https://www.youtube.com/watch?v=pgPoY37_ekw

No comments:

Post a Comment