Friday, 29 April 2022

Saksham-2022 - सक्षम-२०२२

¯  सक्षम-2022 (संरक्षण क्षमता महोत्सव) is an important national program initiated by Government of India for energy security, sustainable development and environment protection of our country. 

¯  The ultimate goal of the program is to curb wasteful expenditure on fossil fuel, reduce the growing burden on foreign exchequer and protect the environment from the adverse effect of Green House Gases emanating from burning of fossil fuels.

¯  Petroleum Conservation Research Association (PCRA), under the aegis of Ministry of Petroleum and Natural Gas and State Level coordinators of Oil Industry take up various initiatives with the active involvement and support from the concerned State Government to spread mass awareness.

¯  Petroleum Conservation Research Association (PCRA) has been in the forefront to create mass awareness towards conservation of petroleum products, promoting fuel-efficient equipment and helping the government in proposing policies and strategies for petroleum conservation.

¯  From 11th April 2022 to 30th April 2022, सक्षम-2022 (संरक्षण क्षमता महोत्सव) has been organized all over the country with the slogan “Azadi ka Amrit Mahotsav through Green & Clean Energy” all over the world.

¯  As a part of this, Oil Industry organized a Valedictory function on 29th April, 2022 at 11:00 am in the presence of Hon'ble Shri Chhagan Bhujbal, Minister for Food and Civil Supplies, Consumer Affairs.

¯  Shri Shriram Bhavsar, Arjuana Awardee also graced the occasion as Guest of Honour.

¯  Street plays was performed by college students on the need for fuel saving.

¯  Various activities conducted during the month such as group conversation / debate for school children, graffiti competition in college, fuel efficient driving competition, article writing, press conference / press release, jingles on TV / radio and talk show etc.

¯  During Saksham-2022, about 16 types / 1225 activities were organized in the state of Maharashtra.

¯  The winners of the group talk / debate competition for school and college students for fuel and oil conservation rewarded for their outstanding contributions at the auspicious hand off Hon’ble minister.

¯  Teacher and journalists were also felicitated at the auspicious hand off Guest of Honor.


नैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने करणे काळाची गरज  : अन्न,नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि.२९: कच्च्या तेलाचा कमी होत चाललेला साठा, इंधन खरेदीसाठीचे परावलंबित्व आणि वाढते तापमान या सर्व पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली असून इंधनाचा वापर काटकसरीने करणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

               येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने सक्षम-२०२२ (संरक्षण क्षमता महोत्सव) या महोत्सवाचा सांगता संमारंभ पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात अन्न,नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ बोलत होते.यावेळी या कार्यक्रमाला अर्जुन पारितोषिक पुरस्कार प्राप्त श्रीराम भावसार,भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक पी.के.रामनाथन, ॲन्ड एम गेलचे कार्यकारी संचालक शालीग्राम मोवर, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) चे पश्चीम विभागाचे संचालक शशीकांत पाटील,प्रादेशिक संचालक अजित धाक्रस,इंडियन ऑइल सीजीएम सुब्रात कार,हिंदुस्तान पेट्रोलियमचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण राव,राज्य समन्वये संतोष निवेंदकर यावेळी उपस्थित होते.

             मंत्री छगन भुजबळ म्हणाले, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सक्षम महोत्सवामार्फत इंधन बचतीचे जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.या उपक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीला इंधन बचतीचे महत्व कळेल. आज जागतिक पातळीवर इंधनामुळे युध्द होत आहेत याचे जागतिक बाजारपेठेवर त्याचे परिणाम होत आहेत  त्यामुळे इंधन बचतीच्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे असे मत  मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

         इंधन बचत जनजागृतीपर वादविवाद  स्पर्धातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण      

      हिंदी वादविवाद स्पर्धेत अंजूमन खैरूल इस्लाम उर्दू गर्ल्स हायस्कूल कुर्ला च्या शेख अरफा अब्दुर रेहमान,खान फातिमा जाहिर यांनी गोल्डन ट्रॉफी प्राप्त केली,कुलाबा म्युन्सिपल सेंकडरी स्कूल आयेशा शेख,मोनू वाल्मिकी यांनी गोल्डन ट्रॉफी प्राप्त केली.मराठी वादविवाद स्पर्धेत इंडियन एज्युकेशन सोसायटी भांडून या विद्यालयातील स्वाहा कांबळी,स्वधा कांबळी यांनी सिल्वर ट्रॉफी प्राप्त केली.विद्यानिधी व्हीपी मराठी मिडीयम स्कूल जुहू प्रणिता येडगे,धनश्री गिरे यांनी गोल्डन ट्रॉफी प्राप्त केली.इंग्रजी वादविवाद स्पर्धेत के.आर.कोटकर सेंकडरी ॲण्ड हायर सेकेंडरी विद्यालय डोंबिवली विधी चोठानी,वैष्णवी चौगुले यांनी सिल्वर  ट्रॉफी प्राप्त केली.महिला समिती ज्यु.कॉलेज ठाकुर्ली प्रथमेश सोमवंशी,तनय मोरे यांनी गोल्डन ट्राफी प्राप्त केली.यावेळी शिक्षक तसेच जनजागृतीपर लेख लिहीणारे लोकशाहीचे सुबोध रणशिवरे, जनमाध्यमचे सुशील कुमार, जनपथ समाचारचे दुलाल देबनाथ दोपहर का सामनाचे आनंद तिवारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.इंधन बचत काळाची गरज ही प्रशांत मनोरे लिखीत पथनाट्य सादर करण्यात आले.यावेळी इंधन बचतीची शपथही देण्यात आली.

No comments:

Post a Comment