Wednesday, 20 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 23 ! “माझ्यावर आवाज चढवून बोलू नकोसं” – आदिश “मला सांगायचं नाही...” – सोनाली

मुंबई २० ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वादाला सुरूवात झाली की सदस्य थांबायचं नावच नाही घेत. पण, किचन एरियामध्ये स्वयंपाक बनवताना असो वा जेवताना असो भांडण करू नका,वाद करू नका, शक्यतो ते टाळा असे अनेकवेळा सांगून देखील सदस्य काही सुधारायचे नावं घेत नाही. शब्दाला शब्द वाढत जातो आणि वाद अजून अजून वाढतो. असं काहीसं आज आदिश आणि सोनालीच्या बाबतीत होणार आहे. काल सोनालीचं भात वाफण्यावरून तृप्तीताईंशी वाद झाला आणि आज चपाती बनवण्यावरून आदिशसोबत वाद होणार नाही.

सोनालीने विचारले, “बाकीची लोकं उभं राहिली आहेत त्यांच्यासाठी... त्यावर आदिशचं म्हणण आहे, “आता जाऊ देना ती (गायत्री) करते आहे ना...ती लाटते आहे, तिला लाटू दे तिच्या पध्दतीने. त्यावर सोनाली म्हणाली, मी कुठे नाही म्हणाले...  आदिश म्हणाला, मी फक्त सांगतो आहे, म्हणून तुला विचारलं तू पूर्ण लाटणार आहेस का ? आणि इथून वादाला सुरुवात झाली. सोनाली म्हणाली, तू सांगू नकोस मला, मी तुला विचारूनच तिथे उभी राहिली. गायत्री म्हणाली तू मला नाही विचारलं. आदिश त्याचं मत मांडत होता. तेव्हा सोनाली आदिशला म्हणाली, तू हे मागाशीच बोलायचं होतसं, मागाशी बोलास का तू ? तुला माहिती नव्हतं मग मगासपासून काय ऐकतो आहेस तू ? आता बोलतो आहे शेवटी. आणि सोनालीचा आवाज चढला. आदिश म्हणाला, “एक मिनिट आवाज चढवू नकोस माझ्यावर, फुकट आवाज नाही चढवायचा. सोनालीचे म्हणणे आहे मी आवाज नाही चढवत आहे, तू बोलायला लागलास तर मी उत्तरं नाही द्यायचं का ? आणि कुठल्या आवाजात सांगायचं ते तू मला नको सांगूस. माझा आवाज असाच आहे मी असंचं बोलणार... आणि वाद पुढे वाढत गेला. बघूया पुढे काय झालं आजच्या भागामध्ये.

तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment