मुंबई ६ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस आदेश देत आहेत, बिग बॉस सांगू इच्छितात असे आपण ऐकतो. पण जयने जरा काहीतरी वेगळेच केले आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही गोष्टी सदस्यांना दिल्या जातात आणि काही गोष्टींपासून त्यांना वंचित राहावे लागते. कधी कधी बिग बॉस त्यांना या गोष्टी मिळविण्याची संधी देखील देतात. पण जयने न राहून बिग बॉस यांनाच ऑर्डर दिली आहे. बिग बॉस माझ्यासाठी एक लोणच्याची बाटली पाठवून द्या, जर तुम्ही आमच्यावर प्रेम करता तर”. तृप्तीताई म्हाणल्या “सारखं आपलं तुम्ही आमच्या प्रेम करत असाल तर हे पाठवून द्या, ते पाठवून द्या... गायत्री म्हणाली, “त्यांच्या ठरलेल्या गोष्टींपैकी ते पाठवतील ते प्रेम असेल तर बाकी काही नवीन पाठवणार नाहीत. जय, स्नेहा, गायत्री, सूरेखाताई, तृप्तीताई, मीरा सगळेच बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. कोणाला चाईनीज खायचं आहे तर कोणाला लोणच तर कोणाला वेज ट्रिपल शेजवान फ्राइड राइस खायचा आहे तर कोणाला चिकन तर कोणाला मंचुरियन तर कोणाला पनीर चिली. यांच्या डिमांडकडे बघून असं वाटत आहे सदस्य विसरले आहेत ते बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रेस्टोरंट मध्ये नाही. पुढे जयचं म्हणणं होतं अजून जास्त प्रेम करत असाल तर लस्सी पाठवा. एक नाही संपत तर दुसरी डिमांड तयार होती. असो ! इच्छा व्यक्त करूनच त्यांना जरा बरं वाटलं असावं असं म्हणायला हरकत नाही ! असे आणि अजून मजेदार किस्से, व्हिडिओ, एक्स्ट्रा मसाला तुम्ही बघू शकता VOOT वर कधीही. आणि बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment