Caption for Social Media:-
ENGLISH & MARATHI :
On the occasion of Mother's Day, Amruta Khanvilkar conducted #instalive in which she had requested her fans to come to live with their mother. She interacted with people from different backgrounds like, a woman working in the police Dept, mother & daughter who do farming & many other people. It was a fun-filled session in which she also asked some questions to her fans related to their mother to know how much they are familiar with the likes/dislikes of their mother
It was special Mother's Day live interaction by Amruta Khanvilkar with her fans & their mother.
@mediabuzzpr
अभिनेत्री अमृता खानविलकरने 'मदर्स डे' स्पेशल अनोखं डिजीटल सेलिब्रेशन केलं. 'मदर्स डे'च्या निमित्ताने, अमृताने तिच्या आईसोबत फॅन्सशी इंस्टाग्रामवर लाईव्ह गप्पा मारल्या पण यावेळच्या गप्पांचे स्वरुप मात्र जरा वेगळे होते. "आईचा दिवस आहे आणि मी माझ्या आईसोबत आहे, तर मलाही तुमच्या आईसोबत या सुंदर दिवशी गप्पा मारायला आवडेल", असा विचार करुन अमृताने तिच्या फॅन्सच्या आईसोबत लाईव्ह गप्पा मारल्या.
नेहमीप्रमाणे, अमृताने या लाईव्हमध्ये देखील सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फॅन्सच्या शुभेच्छा, त्यांच्याकडून होणारे तिचे कौतुक आणि प्रेम या सर्व गोष्टी मिळवल्या. पण खूप जास्त स्पेशल ठरलं ते म्हणजे अनेक आईंसोबत झालेल्या निरागस गप्पा. यामध्ये माय-लेकी, आई-मुलगा, सासू-सुना, आजी-नातू यांनी सहभाग घेतला होता. अमृताने मुंबई पोलिस महिलेसोबत गप्पा मारल्या, शेतकरी आई आणि मुलीसोबतचा संवाद तर थेट काळजाला भिडला. आपल्या आईच्या आवडी-निवडी बद्दल काही प्रश्न विचारुन अमृताने अगदी हसत-खेळत, समाधानाने तिच्या फॅन्ससोबत 'मदर्स डे' सेलिब्रेट केला.
@mediabuzzpr
No comments:
Post a Comment