Friday, 22 May 2020

मनोरंजन व माहिती पुरविण्यात ‘झी एंटरटेनमेंट’ आघाडीवर


लॉकडाऊन दरम्यान नवीन कार्यक्रमांच्या निर्मितीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार
मुंबई, २२ मे  २०२०:– प्रसारमाध्यम व करमणूक या क्षेत्रात दिग्गज असलेल्या झी एन्टरटेन्मेंट एंटरप्रायझेस लि. (झी) या कंपनीने सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही आपल्या ग्राहकांना नवीन सामग्री व कार्यक्रम देण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाचा उत्तम प्रकारे उपयोग करून या उद्योगात आपले अग्रस्थान बळकट केले आहे. भारतातील करमणुकीच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ‘झी’ने पुन्हा एकदा आपली तयारी आणि उद्योगाच्या पुढे राहण्याची क्षमता दर्शविली आहे. आपल्या वाहिन्या व इतर माध्यमांतून दर्शकांचे मनोरंजन करण्यावर व त्यांना सुयोग्य माहिती पुरवण्यावर या कंपनीने भर दिला आहे. कंपनीने तंत्रज्ञानाचा लाभ उठवित वेगाने व परस्पर सहयोगाने, सर्जनशील नावीन्यपूर्णतेचा पाया घालून कार्यक्रमांचे सादरीकरण केले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या टाळेबंदीच्या काळात दुरून काम करून मोबाईल व व्यावसायिक कॅमेर्‍यांच्या सहाय्याने व्हिडिओ आणि ऑडिओ निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर केला व प्रसारण, डिजिटल आणि सामाजिक माध्यमांकरीता कार्यक्रम निर्माण केले.
अनेक प्रदेश व तेथील विविध भाषा यांचा आधार घेऊन ‘झी’ ने दूरचित्रवाणीसाठी नवीन कार्यक्रम तयार केले. प्रथमतः, ‘झी’ने १० राज्यांमधील संगीत क्षेत्रातील सर्व दिग्गजांना एकत्र आणण्याचे ठरविले. यामध्ये लोकप्रिय कलावंत, संगीत क्षेत्रातील दिग्गज, ‘सारेगमप’ कार्यक्रमातील सर्वोत्कृष्ट गायक व परीक्षक यांना घेऊन ‘सारेगमप’ चे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी विशेष मैफल जमविली जाणार आहे. ‘एक देश एक राग’ या नावाचा हा तब्बल २५ तासांचा कार्यक्रम गिव्हइंडिया या संस्थेच्या ‘कोविड रिस्पॉन्स फंड’ साठी निधी जमविण्याकरीता आयोजित करण्यात आला आहे. टिव्ही व डिजिटल माध्यम यांचा एकत्रित  उपक्रम २३ मे रोजी २५ तासांच्या ‘डिजिटल लाइव्ह-अथॉन’च्या स्वरुपात, त्याचबरोबर २४ मे रोजी ‘मेगा फिनाले टिव्ही कन्सर्ट’ च्या रुपात झी व अन्य वाहिन्यांवर सादर होईल.
कंपनीने हाती घेतलेल्या या विलक्षण उपक्रमांबद्दल बोलताना, ‘झी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित गोएंका म्हणाले, “झी’ ने नेहमीच या उद्योगात नवे कल आणले आहेत. तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून टाळेबंदीच्या काळातही आमच्या ग्राहकांना मनोरंजनाची सामग्री व्यवस्थित पुरविल्याबद्दल मला आमच्या कर्मचारीवर्गाचा अभिमान आहे. आम्ही आमच्या दर्शकांसाठी नवीन मार्ग शोधून नवनवे, समृद्ध आणि आकर्षक कार्यक्रम निर्माण करण्याचे काम यापुढेही सुरू ठेवू. आमच्या ग्राहकांना सुयोग्य माहिती व मनोरंजनाचा लाभ मिळत राहावा, याकरीता आता या उद्योगाला सर्वसाधारण स्थितीची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आली आहे.”
डिजिटल आघाडीवर, ‘झी-’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असामान्य स्वरुपाचे मनोरंजनाचे कार्यक्रम रसिकांसाठी अखंडपणे सादर करण्यात येत आहेत. मे अखेरीपर्यंत यावर आणखी ५ कार्यक्रम / चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यातील काही मुख्य कार्यक्रमांचे चित्रीकरण कलाकारांच्या घरांतून, त्यांच्या सुरक्षिततेचे भान ठेवून करण्यात आले. यामध्ये ‘भल्ला कॉलिंग भल्ला’, ‘नेव्हर किस यूवर बेस्ट फ्रेंड’ (टाळेबंदी विशेष), ‘कालचक्र’ आदींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ‘घूमकेतू’ हा चित्रपट २२ मे रोजी सादर होण्यास सज्ज आहे. २९ मे रोजी ‘काली २’ (रहस्यमय) व जून मध्ये ‘कहने को हमसफर है ३’ (प्रणयरम्य नाट्य) आणि ‘द कॅसिनो’ (रहस्यमय) हे दोन्ही कार्यक्रम सादर होतील. 
यावेळी पंडित जसराज, रोनू मजूमदार, सेल्वा गणेस, हिमेश रेशमिया, शान, उदित नारायण आदी कलाकार ‘सारेगमप’चे लोकप्रिय झालेले शीर्षकगीत १० भाषांमध्ये सादर होतील. दर्शकांच्या आवडीनुसार, ‘झी’ने काही घटना-आधारीत कार्यक्रमही आयोजित केले आहेत. यातील ‘लॉकडाऊन डायरीज्’ हा मजेशीर ‘गेम-चॅट शो’ आहे. ‘झी मराठीवर’ही तीन कार्यक्रम येणार आहेत. ‘वेध भविष्याचा’ हा आध्यात्मिक स्वरुपाचा गप्पांचा कार्यक्रम, ‘घरच्या घरी होम मिनिस्टर’ हा ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमावर आधारीत शो, तसेच ‘घरात बसले सारे’ हा रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा विनोदी कार्यक्रम यांचा त्यात समावेश असेल. ‘झी सार्थक’ या वाहिनीतर्फे ‘लॉकडाऊन चॅलेंज’ हा अनोखा कल्पित कार्यक्रम होईल, यामध्ये आघाडीच्या लोकप्रिय व्यक्तींचे टाळेबंदीच्या काळातील आयुष्य दाखविण्यात येईल. ‘झी सार्थक’तर्फे ‘मु तमे लॉकडाऊन’ हा दोन तासांचा एक चित्रपट जून मध्ये दाखविला जाईल. या दोन्ही कार्यक्रमांची सामग्री संबंधित व्यक्तींनी मोबाईलच्या माध्यमातून चित्रीत केली आहे.

No comments:

Post a Comment