Wednesday, 20 May 2020

ट्युलिप्स कोविड-१९ स्वॅब विकसित करणारी भारतातील पहिली कंपनी


कोविड-१९ निदानाला चालना देण्यासाठी स्वॅबचे साप्ताहिक उत्पादन ५ दशलक्ष पर्यंत वाढवणार
मुंबई, 20 मे 2020: देशभर कोरोनाव्हायरस चाचणीसाठी गरज वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सुपार्श्व स्वॅब्स (ट्युलिप्स), या भारतातील पर्सनल हायजिन कन्झ्युमर उत्पादनांमध्ये नावीन्य आणण्यात आघाडीवर असणाऱ्या आणि ट्युलिप्स या झपाट्याने वाढत्या लोकप्रिय ब्रँडची मालकी असणाऱ्या कंपनीने कोविड-१९ चाचणीला चालना देण्याच्या हेतूने, सध्या प्रत्येक आठवड्याला केले जाणारे दोन दशलक्षहून अधिक कोविड-१९ स्वॅबचे उत्पादन मे २०२० अखेरीपर्यंत दर आठवड्याला पाच दशलक्षहून अधिक स्वॅबपर्यंत वाढवले जाणार आहे.
भारतातील कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १००००० हून अधिक झाली असून व मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ३००० पेक्षा वाढली असून, तज्ज्ञांच्या मते, या विषाणूवर मात करण्यासाठी आणि त्याचे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी आपण ठोस कृती करायला हवी. किफायतशीर स्वॅबमुळे प्रतिबंधात्मक चाचणीचे प्रमाण वाढेल व त्यामुळे या साथीचा सामना करणे शक्य होईल, तसेच ही साथ रोखण्यासाठी व परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सध्या असलेली प्रचंड मागणी झटपट पूर्ण करता येऊ शकेल.
सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये, कोविड-१९ संघर्षामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या नेझल व थ्रोट स्वॅबच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करणे, तसेच पुरवठ्यासाठी अन्य देशांवरील अवलंबित्व कमी करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. आयात केलेल्या थ्रोट स्वॅबपेक्षा देशात निर्मिती केलेल्या स्वॅबची किंमत एक-दशांश कमी असल्याने, कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असल्याने कंपनीने किफायतशीर स्वॅबची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
“देशातील लॉकडाउनचे निर्बंध कमी करायचे असतील व अर्थव्यवस्था पुन्हा सक्रिय करायची असेल तर कोविड-१९चा सामना करण्याच्या दृष्टीने भारतामध्ये चाचण्यांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी दर आठवड्याला ७ – १० दशलक्षहून अधिक स्वॅबची गरज भासू शकते. काही बाबतीतील निर्बंध शिथिल केल्यावर या विषाणूचे संक्रमण वेगाने होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी अब्जाहून अधिक भारतीय लोकसंख्येची कोविड-१९ चाचणी करायचे नियोजन असेल तर स्वॅबची ही संख्या लक्षणीय आहे”, असे असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीचे (AiMeD) फोरम समन्वयक राजीव नाथ यांनी स्पष्ट केले.
कोविड-१९ विरोधी सुरू असलेल्या संघर्षासाठी देशात आज मोठ्या संख्येने स्वॅबची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोविड-19चा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेमध्ये बदल करणे गरजेचे आहे. कोरोनाव्हायरसंबंधी चाचणी करण्यासाठी लक्षणीय मागणी असताना, तसेच या विषाणूची चाचणी करण्याची क्षमता न वाढवताच देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सक्रिय करणे हे जोखमीचे ठरू शकते अशी सूचना वैद्यकीय तज्ज्ञांनी केली असताना कंपनीने हा निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्वॅबची एक सर्वात मोठी उत्पादक असणारी ट्युलिपची प्रॉडक्ट लाइन सध्या नावीन्यपूर्ण कॉटन उत्पादने व वाइप्स यातील जगातील एक सर्वोत्तम आहे आणि त्यामध्ये ४०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment