Thursday, 7 May 2020

Zee Talkies | Talkies Premiere League - Anda Cha Funda | झी टॉकीज सादर करत आहे अतूट मैत्रीचा गोडवा "अंड्या चा फंडा"

 झी टॉकीज वर सुरु असलेल्या "टॉकीज प्रीमियर लीग" ने प्रेक्षकांना टीव्ही समोर खिळवुन  ठेवले आहे.   लॉकडाउन मध्ये प्रत्येक रविवारी वेग वेगळ्या सुपरहिट चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे. लहान मुले ,वृद्ध, सगळेच टॉकीज प्रीमियर लीग चा आस्वाद घेत आहेत. या रविवारी झी टॉकीज सादर करत आहे "अंड्या आणि फंड्या" या जिवलग मित्रांची धमाल गोष्ट.  
एकाच वर्गात शिकत असलेल्या अंड्या (अथर्व बेडेकर ) आणि फंड्या (शुभम परब ) या दोन खास मित्रांची हि गोष्ट आहे. अंड्या हा श्रीमंत घरातला ,हुशार तर फंड्या हा गरीब घरातला पण मस्तीखोर. पण तरीही दोघांची मैत्री अतूट. फंड्याला नेहमी त्याच्या स्वप्नात विविध गोष्टी दिसायच्या आणि तो त्या गोष्टी अंड्या ला सांगायचा, आणि अंड्या त्या स्वप्नांची सुरेख चित्र काढायचा.शाळेच्या सुट्टी मध्ये फंड्या कोकणात जातो . मात्र तो परततो एका वेगळ्याच अवतारात ज्या मध्ये तो फक्त अंड्या ला दिसतो .  फंड्या अंड्या ला सांगतो कि त्याच्या काही इच्छा आहेत आणि त्या फक्त तोच पूर्ण करू शकतो आणि ते हि थेट  कोकणात. अंड्या कोकणात जाण्याचा  हट्ट आई कडे  करतो, मात्र त्याला त्याची आई  साफ नकार देते . पण अंड्याच्या शाळेचा कॅम्प कोकणात जाणार असल्याने त्याला कोकणात जाण्याची एक संधी मिळते. फंड्या आधी पासूनच कोकणात हजर असतो. तेथे त्यांना वासंती (मृणाल जाधव ) हि मैत्रीण भेटते आणि तेथे ते एका अनोख्या रहस्या पर्यंत येऊन पोहचतात.
संतोष शेट्टी यांची कथा आणि दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलेलं आहे. तर चित्रपटाची पटकथा अंबर हडप, श्रीपाद जोशी आणि गणेश पंडित यांनी लिहलेली आहे. अरुण नलावडे, सुशांत शेलार, अनिल नगरकर, माधवी जुवेकर, प्रमोद पवार, आदी कलाकारांची योग्य साथ चित्रपटाला मिळालेली आहे. कोकणात गेलेला फंड्या  नेमक्या कोणत्या रूपात परत येतो ..? अंड्या  त्याच्या जिवलग  मित्राच्या म्हणजेच फंड्याच्या सर्व  इच्छा पूर्ण करेल का..? या दोघांची कोकणात झालेली मैत्रीण वासंती या सगळ्यात या जोडीला नेमकी कशी मदत करते ..? असे असंख्य प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला हवी असतील तर पाहायला विसरुनका या रविवारी म्हणजेच १० मे रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता "अंड्या चा फंडा"  फक्त आपल्या झी टॉकीज वर.  

No comments:

Post a Comment