कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे, या कठीण काळात संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी, काही कठोर नियमांचे पालन आपल्याला करावे लागत आहे. सेलिब्रिटी मंडळीदेखील याला अपवाद नाहीत. मागचे अनेक दिवस महिने आपण सगळेच जण, घरात बसून आहोत. धमाकेदार गाण्यांच्या तालावर पाय थिरकवण्याची संधी मिळत नसलेल्या युवा डान्सिंग क्वीन्स सुद्धा, आता घरी बसून कंटाळल्या आहेत. हा कंटाळा झटकून टाकण्याचा आणि चाहत्यांशी संवाद साधण्याचा एक जबरदस्त उपाय 'युवा डान्सिंग क्वीन'च्या टीमने शोधून काढला आहे. 'झी युवा'वरील या स्पर्धेचा कोरिओग्राफर ओंकार शिंदे आणि काही स्पर्धकांचा एक झकास डान्स विडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
ओंकार शिंदेसह धनश्री काडगावकर, पूर्वा शिंदे, नेहा खान , अंकिता भगत , कृतिका गायकवाड , गिरीजा प्रभू,अपेक्षा लोंढे , क्षमा देशपांडे , आयुषी भावे आणि गायत्री दातार या स्पर्धकांनी 'झिंगाट' या गाण्यावर ठेका धरला आहे. धमाकेदार गाण्यावर थिरकत, या डान्सिंग क्वीन्स ने त्यांचा दिनक्रम दाखवण्याचा एक छानसा प्रयत्न केला आहे. आपली नृत्याची हौस या डान्स विडिओ द्वारे या सुंदर मुलींनी पूर्ण करून घेतली आहे. अनेक दिवसांनी डान्समध्ये 'झिंगाट' होऊन त्यांनी आपला आळस झटकून टाकल्याचं पाहायला मिळत आहे. लाडक्या डान्सर्स डान्सर्सनी पुन्हा ठेका धरलेल्या असल्यामुळे चाहत्यांना हा विडिओ खूपच आवडलेला आहे.
या विडिओबद्दल बोलताना कोरिओग्राफर ओंकार म्हणतो;
"कोरोनामुळे सगळीकडे नकारात्मक वातावरण झालेलं दिसत होतं. पण, हा कंटाळा, मरगळ कुठेतरी झटकून टाकावी असं माझ्या मनात होतं. 'युवा डान्सिंग क्वीन' हा सगळ्यांच्याच आवडता कार्यक्रम आहे. चाहत्यांना फायनलची खूप उत्सुकता आहे. लॉकडाऊनमुळे सगळंच थांबलं असल्यामुळे फायनल कधी होईल कोण विजेती होईल हे आता सांगता येणार नाही , तरीही आमच्या चाहत्यांसाठी काहीतरी खास घेऊन येण्याची इच्छा मला होती. 'झिंगाट' हे गाणं मूड बदलून टाकण्यासाठी उत्तम होतं, म्हणून त्याच गाण्याची आम्ही निवड केली. वेगळं, खास असं काहीतरी चाहत्यांसाठी घेऊन यायचं होतं. त्यामुळे सगळ्यांचाच साधारण दिनक्रम डोळ्यासमोर ठेऊन, तो या विडिओमधून मांडता येईल अशी कल्पना सुचली आणि सर्वानी ती प्रत्यक्षात सुद्धा आणली. युवा डान्सिंग क्वीन्स स्पर्धकांचा हा झिंगाट विडिओ तुम्हाला आवडेल याची आम्हाला खात्री आहे '
Sport News Update Now click >>>
ReplyDeleteSPORT News
SPORT News
SPORT News
SPORT News
SPORT News