शनिवारी १५ एप्रिल रोजी गिरगावकरांसाठी संगीत मेजवानी!!
प्रवेश सर्वांना विनामूल्य!
अक्षय तृतीये निमित्त शनिवार, १५ एप्रिल रोजी ‘सूर ताल’, विलेपार्ले पूर्व आणि ब्राह्मण सभा, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सांज ये गोकुळी’ ही बहारदार मराठी गाण्यांची सुरेल मैफिल अभिरुचीसंपन्न मराठमोळ्या गिरगावकरांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
मुंबईतील 'सूर-ताल' ही संस्था गेली अनेक वर्ष विविध सामाजिक उपक्रमांसोबतच संगीतकलेची उपासना करीत आहे. संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि नवोदित कलावंतांसाठी 'सुर ताल'ची स्थापना करण्यात आली असून अनेक नवोदितांसाठी ते हक्काचं व्यासपीठ बनलं आहे. अगदी करोना काळात सुद्धा 'ऑनलाईन'च्या माध्यमातूनही 'सूर-ताल'ने रसिकांचे मनोरंजन केले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या गाण्यांची सदाबहार मैफिल 'सूर-ताल'ने आयोजित करून गिरगांवकरांची पसंती मिळविली होती. या कार्यक्रमात मराठी गाण्यांची मैफिल आयोजित करण्याची विनंती 'सूर-ताल'च्या आयोजकांना करण्यात आली होती. त्यानुसार ‘सांज ये गोकुळी’ ही बहारदार लोकप्रिय मराठी गाण्यांची सुरेल मैफिल खास गिरगावाकरांसाठी आयोजित करण्यात आल्याचे आयोजक महेश कालेकर, भूषण शितुत यांनी म्हटले आहे.
सूर ताल, विलेपार्ले पूर्व आणि ब्राह्मण सभा, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सांज ये गोकुळी’ ही मैफिल शनिवार, १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ ते ८.३० या वेळेत, ब्राह्मण सभा, राजा राममोहन रोड, गिरगाव, मुंबई-४ आयोजित करण्यात आली असून, प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश दिला जाणार आहे. गायिका अमृता, प्रगती, विनायक, महेश आणि धनंजय हे गायक या संगीत मैफिलीत आपल्या सुमधुर आवाजाने रंग भरणार आहेत.
No comments:
Post a Comment