Wednesday 26 April 2023

अविनाश नारकर यांच्या धीरगंभीर आवाजात 'झोंबी: एक बाल्य हरवले बालकांड' आणि इतर मजेदार गोष्टी

 पुलंच्या तीस कथा ऐका स्टोरिटेलच्या ऑडिओ बुक्समध्ये!

आपल्याला पुल देशपांडेंबद्दल माहिती आहेत्यांच्याविषयी प्रेमआवड आणि आस्था आहे. कोट्याधीश पुल म्हणून ते प्रसिद्ध आहेत कारण त्यांच्या शाब्दिक विनोद आणि त्यांच्या अनेक कोट्या या प्रसिद्ध आहेत. साधारण एप्रिल महिना हा सुट्ट्यांचा असतोमोकळा असतो आणि सांस्कृतिक वातावरणदेखील सुरु झालेले असेते. एप्रिल मे मध्ये अनेक उपक्रम होत असतात. त्यातूनच संपूर्ण महिनाभर चालेल असा उपक्रम करावा करण्याचे 'स्टोरीटेल'ने ठरविले. त्यानुसार 'एप्रिल पुलही संकल्पना राबवली जात आहे.

पुल देशपांडे हे अख्या विश्वातील मराठी रसिकांचे लाडके व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या साहित्याने अबालवृद्धांना वेड लावलेलं आहे. सहज सध्या प्रसंगांतूनव्यक्तिचित्रांतून विनोद निर्मिती करून पुलंनी सर्वांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यांच्या अनेक लोकप्रिय कथा मातब्बर नामवंत कलावंतांच्या आवाजात स्टोरिटेलवर ऐकताना रसिकांना खळखळून हास्यानंद मिळत आहे. 'एप्रिल पुलया संकल्पनेला रसिकांनाच भन्नाट प्रतिसाद लाभत असून दर काही दिवसानी प्रकाशित होणारे नवे 'ऑडिओ बुक्सऐकण्यासाठी त्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे जाणवत आहे.

'एप्रिल पुलमध्ये स्टोरीटेलने रिलीज केलेल्या ऑडिओ बुक्समध्ये 'गुण गाईन आवडी', 'गणगोत', 'मैत्र', 'खिल्ली', 'उरलं सुरलं', 'चार शब्द', पूर्वारंग या पुस्तकांचा समावेश आहे. लोकप्रिय जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरअविनाश नारकरअजय पुरकरचिन्मय मांडलेकरआस्ताद काळेसौरभ गोगटेनचिकेत देवस्थळीसंदीप खरे यांनी पुलंच्या लोकप्रिय साहित्यकृतींना आपल्या आवाजाचा नवा साज स्टोरिटेल मराठीचे व्यासपीठ निवडले आहे. या दिग्गजांच्या आवाजात पुलंच्या लोकप्रिय पुस्तकांतील कथांचे तीसहून अधिक 'ऑडिओ बुक्स’ स्टोरिटेल रिलीज करीत आहे. येत्या आठवड्यात अभिनेते अविनाश नारकर यांच्या आवाजात 'चार शब्दमधील 'झोंबी: एक बाल्य हरवले बालकांड', त्यासोबतच 'पूर्वारंगमधील कथा ऐकता येणार आहेत.

एप्रिल पुल मधील ऑडिओ बुक्स ऐकण्यासाठी

https://www.storytel.com/in/en/authors/53909-Pu-La-Deshpande

https://www.storytel.com/in/en/books/char-shabd-zombi-2379325

https://www.storytel.com/in/en/books/char-shabd-mama-aani-tyanchi-gajali-2379398

No comments:

Post a Comment