झी मराठीवर नात्यांना नवी उमेद देणाऱ्या ३ वेब सिरीजच प्रसारण
लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मालिकांचे जुने भाग, जुन्या काही मालिकांचं पुनःप्रक्षेपण आणि पूर्वीचे पुरस्कार सोहळे यांचं प्रक्षेपण सध्या वाहिन्यांवर होत आहे. पण झी मराठी वाहिनी या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी काहीतरी नवीन सादर करणार आहे. नात्यानं नवी उमेद देणाऱ्या काही वेबसिरीज झी मराठीवर प्रसारित होणार आहेत. खाकी वर्दीतील आनंदी माणसाची गोष्ट 'पांडू' या सिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीस येईल, जोडप्याच्या नात्यातला गोडवा असलेली एक गोड कथा प्रिया बापट आणि उमेश कामत 'आणि काय हवं..?' या वेबशोमधून प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत. निपुण धर्माधिकारी याची ‘वन्स अ इयर' हि वेब सिरीज प्रेमातल्या अविस्मरणीय क्षणांचा प्रवास प्रेक्षकांना घडवेल. या सर्व नवीन कथा सोमवार २७ एप्रिल पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
याबद्दल बोलताना झी मराठी वाहिनीचे व्यवसायप्रमुख निलेश मयेकर म्हणाले, "वेगळा प्रयोग करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या प्रयोगाला प्रेक्षकांची पसंती मिळाली तर भविष्यात लघुपट प्रसारित करण्याचा पर्यायही वाहिनीकडे आहे."
No comments:
Post a Comment