Wednesday 29 April 2020

‘हार्वेस्ट द फार्म्स’: ‘निंजाकार्ट’चे ग्राहकांना आवाहन



मुंबई,  30 एप्रिल २०२० : सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील लाखो शेतकरी संकटात सापडले असताना भारतातील ताज्या कृषीउत्पन्नाच्या वितरणातील सर्वात मोठी साखळी असलेल्या ‘निंजाकार्ट’ कंपनीने ‘हार्वेस्ट द फार्म्स’ (शेतात करा कापणी) हा उपक्रम सुरु केला आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्याना मदत करण्याच्या उद्दिष्टाने हा उपक्रम दाखल केला गेला आहे. सध्याच्या या अभूतपूर्व अशा परिस्थितीत लाखो टन शेतमाल हा शेतात सडतो आहे. या मालाची कापणी करणेही शेतकऱ्याला शक्य झालेले नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी आता आपला माल हा  ‘निंजाकार्ट’द्वारे ग्राहकांना थेट विकू शकतात. शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांसाठी ही ‘विन-विन’ अशी परिस्थिती आहे कारण शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी आयता ग्राहक मिळेल आणि ग्राहकांना ताजा शेतमाल कमी भावात मिळेल. ‘निंजाकार्ट’ची देशभरातील ताज्या वस्तूंची वितरण साखळी ही शेतमाल अगदी कमी नफा मिळवत शेताच्या बांधावरून ग्राहकांपर्यंत पोहोचवेल.
‘हार्वेस्ट द फार्म्स’ हा उपक्रम स्थानिक किरणा दुकानांबरोबर सहकार्य करार करत दाखल केला जाणार आहे. ही उत्पादने झोमॅटो, स्वीगी आणि डून्झो यांच्या माध्यमातून बेंगळूरू, मुंबई, दिल्ली-एनसीआर, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे येथे उपलब्ध असतील.  ग्राहक ‘झोमॅटो मार्केट’, ‘स्वीगी ग्रोसरी’ किंवा ‘डून्झो फ्रुट्स अँड व्हेजीटेबल’ विभागांमध्ये जात ‘निंजाकार्ट’शी सहकार्य करार असलेल्या दुकानांचा शोध घेवू शकतात. ताजी फळे आणि भाज्यांची निवड करत त्यांची ऑर्डर देवू शकतात. ग्राहकांच्या सोयीसाठी ‘निंजाकार्ट’ने स्थानिक किरणा दुकानांबरोबर भागीदारी करार केले आहेत.
‘हार्वेस्ट द फार्म्स’ या उपक्रमाबद्दल बोलताना ‘निंजाकार्ट’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री थिरूकुमारन नागराजन म्हणाले, “समाजाला सकारात्मक फायदा मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर ‘निंजाकार्ट’ने नेहमीच भर दिला आहे. सध्याच्या अभूतपूर्व आणि अनिश्चिततेच्या काळात वितरण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असताना आपण शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाकडे कानाडोळा करू शकत नाही आणि उभ्या पिकाचे नुकसान होवू देवू शकत नाही. ”
भारतातील ताज्या शेतमालाच्या वितरणातील सर्वात मोठी वितरण साखळी आणि शहरांमधील सर्वसमावेशक असे नेटवर्क यांच्या माध्यमातून आमच्या क्षमतांचा वापर करत आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची कापणी करणे शक्य करून देवू. शिवाय ग्राहकांना हा माल थेट खरेदी करण्याची सुविधा प्राप्त करून देवू. त्यामाध्यमातून शेतमालाचे नुकसान टळेल आणि शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल. ‘हार्वेस्ट द फार्म्स’च्या माध्यमातून ‘निंजाकार्ट’च्या जाळ्याचा वापर करत ग्राहकांबरोबर भागीदारी करत बळीराजाचे हित साधणे आम्हाला शक्य होणार आहे. हा उपक्रम स्थानिक किराणा मालाची दुकाने यांचे सहकार्य आणि झोमॅटो, स्वीगी आणि डून्झो यांनी तत्काळ दिलेल्या प्रतिसादाशिवाय शक्य झाला नसता. त्यांच्या सहकार्यातून हे साध्य झाले आणि ग्राहकांचे हित साध्य करता आले.”
बेंगळूरू येथील ‘फ्रेश बास्केट ग्रोसरी स्टोर’चे मालक राजप्पा म्हणाले, “‘निंजाकार्ट’च्या या नाविन्यपूर्ण अशा उपक्रकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल आणि त्याचवेळी ग्राहकांना स्वस्तःत शेतमाल मिळू शकेल. ‘हार्वेस्ट द फार्म्स’च्या माध्यमातून राबविलेला हा उपक्रम त्याचमुळे स्तुत्य असा आहे. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘निंजाकार्ट’बरोबर केलेल्या भागीदारीचा आम्हाला रास्त असा अभिमान आहे.
‘स्वीगी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक सुंदर म्हणाले, “लॉकडाऊनच्या या अभूतपूर्व अशा काळात वितरण साखळीवर जो विपरीत परिणाम झाला आहे, त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्याला  बसला आहे. ‘निंजाकार्ट’बरोबर ‘हार्वेस्ट द फार्म्स’साठी आम्ही जो सहकार्य करार केला आहे, त्याचा उपयोग शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी होईल. ‘निंजाकार्ट’च्या तंत्रज्ञानाद्वारे वितरण साखळी व्यासपीठाच्या माध्यमातून ताजा शेतमाल शेतकऱ्यांच्या थेट बांधावरून ग्राहकांना घरापर्यंत उपलब्ध होईल. स्वीगीच्या ‘ग्रोसरी’ टॅबवर क्लिक करून प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांना ही सेवा मिळेल.”
संपूर्ण देशात फळे आणि भाज्यांना या काळात फार मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याचे आपण अनुभवले आहे. त्यामुळे वितरक आणि शेतकरी यांचा ग्राहकांशी थेट मेळ घालून देणे गरजेचे होते. सध्या जी वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे, ती पूर्वपदावर आणणे खूप गरजेचे आहे. त्यातून शेतकरी बंधूना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘निंजाकार्ट’ने हा जो उपक्रम राबविला आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना या अनिश्चितेच्या काळात शेतकऱ्यांना पाठबळ देणे आणि सशक्त करणे शक्य झाले आहे. ‘डून्झो’च्या पायाभूत सुविधा आणि गरजेनुसार सेवा देण्याची क्षमता यांमुळे या भागीदारीतून ‘हार्वेस्ट द फार्म्स’अंतर्गत शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवणे शक्य होणार आहे. त्यातून उपक्रमाला पाठबळ मिळेल आणि शेतकऱ्यांना मदत होईल,” असे उद्गार ‘डून्झो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक श्री कबीर बिस्वास यांनी काढले.
“देशातील या महामारीच्या काळात ज्यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे, अशांना मदत करण्यासाठी आम्ही विविध मार्गांच्या शोधात होतो. ‘निंजाकार्ट’चा ‘हार्वेस्ट द फार्म्स’ हा असा उपक्रम आहे जो ही बाब साध्य करतो. ‘निंजाकार्ट’बरोबर करत असलेल्या भागीदारीचा आम्हाला आनंद आहे, कारण त्या माध्यमातून आम्ही आमचे तंत्रकौशल्य, ग्राहकपाया आणि जमिनीवरील वितरण जाळे यांचा वापर करत झोमॅटो मार्केटवरुन थेट शेतकऱ्याच्या बांधावरून ग्राहकांपर्यंत ताजा माल पोहोचवत आहोत,” असे उद्गार झोमॅटोच्या अन्न वितरण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित सर्दणा यांनी काढले.
या उपक्रमांतर्गत ‘निंजाकार्ट’ त्यांच्या साखळीतील शेतकऱ्यांकडील अशा भाज्यांचा शोध घेईल ज्यांचे उत्पादन अधिक झाले आहे आणि ज्या भाज्यांची कापणी झालेली नाही.  ते या शेतकऱ्यांकडून या भाज्या विकत घेतील आणि त्यातून त्यांना गुंतवणुकीतील होणारा तोटा टाळण्यास मदत केली जाईल. हा शेतीमाल मग ग्राहकांना स्वस्त किमतीत विकला जाईल आणि  त्याद्वारे मागणीवृद्धी साधण्यास मदत होईल. ‘हार्वेस्ट द फार्म्स’ या उप्क्रमाखाली जो शेतीमाल उपलब्ध आहे, त्यांत टोमॅटो, कोबी, भोपळी मिरची, फ्लॉवर, केळी, कलिंगड आणि टरबूज आदींचा समावेश आहे.
‘निंजाकार्ट’ने लोकांनाही असे आवाहन केले आहे की, एखादा शेतकरी त्याचा माल विकू शकत नसेल तर अशा शेतकऱ्याची माहिती त्यांनी कंपनीला द्यावी. ते ‘निंजाकार्ट’ला care@ninjacart.com वर लिहू शकतात किंवा या शेतकऱ्यासाठी असलेल्या 080-4711-2110  या हेल्पलाईनवर मिस्ड कॉल देवू शकतात. त्याशिवाय ट्विटरवर त्यांना टॅग करू शकतात. शेतकऱ्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध करून देण्यासाठी त्याद्वारे मदत होवू शकते. 
‘निंजाकार्ट’ विषयी :
‘निंजाकार्ट’ ही भारतातील ताज्या मालाच्या वितरणाची सर्वात मोठी साखळी आहे. जगातील सर्वात मोठी वितरण साखळी समस्या सोडविण्याच्यादृष्टीने ‘निंजाकार्ट’ने नाविन्यपूर्ण अशा तंत्रज्ञानाचा वापर केला असून त्या माध्यमातून संपूर्ण भारतातून शेतकऱ्यांचा भाजी आणि फळे आदी शेतमाल त्यांच्या बांधावरून उचलला जातो. हा माल १२ तासांच्या आत देशातील महत्वाच्या शहरांमधील किरकोळ विक्रेते आणि व्यावसायिक यांच्यापर्यंत पोहोचवला जातो. फळे आणि भाजी आपल्या ताटापर्यंत पोहोचण्याची जी पद्धत आहे ती बदलण्याचे ‘निंजाकार्ट’चे ध्येय आहे. त्याचवेळी उत्पादक, व्यावसायिक आणि ग्राहक यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणावर अमुलाग्र बदल घडवून आणणे हे उद्दिष्टही साध्य केले जाते. अधिक माहितीसाठी संपर्क - www.ninjacart.com

No comments:

Post a Comment