Tuesday, 12 May 2020

Zee Marathi - Tujhyat Jeev Rangla

मिळालेला वेळ सकारात्मक गोष्टी करण्यासाठी घालवा - अक्षया देवधर

कोरोनच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग हे लॉकडाऊनमध्ये आहेलॉकडाऊनच्या काळात टीव्ही मालिकांचं चित्रीकरणही ठप्प आहेआणि आपले आवडते कलाकारही आपापल्या घरात बंद आहेतपण मिळालेला वेळ हा सत्कारणी लावा असं  'तुझ्यात जीव रंगलाया लोकप्रिय मालिकेतल्या पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर म्हणतेय.
अक्षया पुण्यात तिच्या घरी कुटुंबियांसोबत आहेतिच्या लॉकडाऊन मधील रूटीनबद्दल सांगताना ती म्हणाली,  "हातात मिळत असलेला वेळ सकारात्मक कामांसाठी घालवायचा प्रयत्न करतेकंटाळानकारात्मक विचार येऊ नयेत यासाठी ते गरजेचं आहेमी कधी चित्र काढेन असं मला वाटलं नव्हतं पण लॉकडाऊन मध्ये मी बऱ्यापैकी चित्रकला शिकलेयतसंच आईकडून अनेक पदार्थ देखील शिकतेयआम्ही दोघी मिळून किचनमध्ये काहीना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतोययाशिवाय मी वाचनटीव्हीसिनेमे बघणे यात सध्या वेळ घालवतेय."
अक्षयाचे आई-वडील दोघेही सरकारी सेवेत असल्याने कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही त्यांना कामासाठी बाहेर पडावं लागतं. "मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली अभिनेत्री आहेमाझे आई-वडील सरकारी सेवेत आहेतदोघेही अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांना या संकटकाळात कामासाठी बाहेर पडावंच लागतं," असं अक्षयानं सांगितलं.

No comments:

Post a Comment