Thursday 25 March 2021

&TV | जातिवाद व बिकट परिस्थितीदरम्‍यान अडकले भीमराव

रामजी (जगन्‍नाथ निवंगुणे) जिजाबाईसोबत (स्‍नेहा मंगल) साता-याला निघून गेल्‍यानंतर भीमराव (आयुध भानुशाली) व त्‍यांच्‍या भांवडांवर कुटुंबाची काळजी घेण्‍याची जबाबदारी पडली आहे. जिजाबाई रामजी सकपाळ व भीमराव यांच्‍यामध्‍ये फूट निर्माण करते, ज्‍यामुळे दोघांमध्‍ये गैरसमज निर्माण होतात. भीमराव व कुटुंबाला प्रचंड आर्थिक व भावनिक तणावाचा सामना करावा लागतो. पण भीमराव अशा स्थितीमध्‍ये देखील खंबीरपणे उभे राहतात आणि आनंदसोबत नवीन नोकरीचा शोध घेण्‍यास सुरूवात करतात.

पण, बालाला वाईट संगत लागते आणि तो चोरी करण्‍यास सुरूवात करतो. आपल्‍या तत्त्वाशी बांधील राहत भीमराव बालाला तुरूंगामध्‍ये पाठवण्‍याचा धाडसी व योग्‍य निर्णय घेतात. यादरम्‍यान तुलसा आजारी पडते, आनंद पुन्‍हा जुनी नोकरीच करू लागतो आणि भीमराव कामासाठी वणवण फिरतात. त्‍याचवेळी गोरेगावमध्‍ये रामजी खालच्‍या जातीचे असल्‍याचे समजल्‍यानंतर लोक त्‍यांचा अपमान करतात, त्‍यांच्‍यावर हल्‍ला करता आणि समाजामधून बाहेर काढून टाकतात. या एपिसोडसोबत बोलताना रामजी सकपाळची भूमिका साकारणारे जगन्‍नाथ निवंगुणे म्‍हणाले, ''भीमरावांना प्रचंड परीक्षा व दु:खाचा सामना करावा लागतो. त्‍यांच्‍या जीवनाला नवीन कलाटणी मिळते आणि तेथूनच नवीन मार्ग सापडतो. आईचे निधन आणि वडिलांनी त्‍याग केल्‍यानंतर भीमरावांसमोर खडतर प्रवास आहे. ही स्थिती, भूक, आर्थिक व भावनिक तणावांवर मात करण्‍यासोबत त्‍यांच्‍यावर त्‍यांच्‍या भावंडांची व शिक्षणाची जबाबदारी पडते. कोणाचाही आधार नसताना भीमराव कशापक्रारे त्‍यांच्‍या जीवनाला आकार देतील आणि या खडतर स्थितीवर मात करतील?''

अधिक जाणण्‍यासाठी पहा 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर

No comments:

Post a Comment