Wednesday 24 March 2021

- झी युवा वरील 'तुझं माझं जमतंय' मालिकेचा युवा दिग्दर्शक मंदार कुलकर्णी प्रत्येक एपिसोडमध्ये आणतोय रंगत

 

झी युवा वाहिनी वरील 'तुझं माझं जमतंय' ही मालिका अनेक कारणांसाठी प्रसिद्ध होत आहे... प्रसिद्धी पेक्षाही असं म्हणता येईल की ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या मालिकेविषयी आपलेपणा प्रत्येकाच्या मनात आहे. मालिका पडद्यावर उत्तम दिसण्यासाठी प्रत्येकजण विशेष मेहनत घेत असतो. कलाकार त्यांच्या - त्यांच्या परीने मेहनत घेतातच पण ज्याला आपण 'कॅप्टन ऑफ दी शिप' म्हणतो असा दिग्दर्शकाचा देखील महत्त्वाचा वाटा यात असतो. मालिका उत्तमप्रकारे दिग्दर्शकाने मांडली की मालिका सुपरहिट झालीच समजा

उद्योजक, चित्रपट निर्माते नरेंद्र फिरोदिया यांना आदर्श मानणारे अहमदनगर फिल्म कंपनीचे निर्माते स्वप्निल मुनोत यांची निर्मिती असलेल्या 'तुझं माझं जमतंय' मालिकेचे पूर्ण झालेले १०० हून अधिक भाग, सोशल मीडियावर त्याची होणारी चर्चा यावरून हे स्पष्ट झालंय की या मालिकेने प्रेक्षकांना जिंकलय. ही मालिका हलकीफुलकी फॅमिली ड्रामा असलेली आहे मुळात तरुणांना आवडेल अशी कथा आहे आणि ही कथा प्रत्येकाला आवडतेय कारण तरुण दिग्दर्शक मंदार कुलकर्णी या मालिकेचं दिग्दर्शन सध्याच्या पिढीला आवडेल याचा विचार करून करतोय
एक दिग्दर्शक म्हणून मंदार कुलकर्णीचं मालिकेविषयी मत अगदी स्पष्ट आहे त्याच्या मते, "मालिकेत सर्व गोष्टी असल्या पाहिजे, जसे की फॅमिली ड्रामा, ट्रॅजेडी, रोमान्स. मालिका जास्त न लांबवता शॉर्ट, सिम्पल आणि स्वीट असावी."
'तुझं माझं जमतंय'ही मालिका आपल्या युवा पिढीला आवडेल अशी आहे तर त्याचं सादरीकरण, दिग्दर्शन पण त्याच पद्धतीने व्हावं असं निर्माते स्वप्निल मुनोत यांना वाटत होतं आणि मंदार कुलकर्णीची दिग्दर्शक पदी निवड झाली असता त्यांची इच्छा पूर्ण झाली हे दिसून येतं आणि याचाच फायदा असा झाला की महाराष्ट्रातील प्रेक्षक विशेष करून तरुण वर्ग या मालिकेवर मनापासून प्रेम करत आहेत.

No comments:

Post a Comment