Friday, 12 March 2021

& TV | Ek Mahanayak B R Ambedkar | निर्दोष भीम कसे ठरले दोषी!

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'मध्‍ये भीमरावांच्‍या (आयुध भानुशाली) जीवनात आव्‍हानांचे वादळ निर्माण होते, जेथे त्‍यांचे वडिल (जगन्‍नाथ निवंगुणे) त्‍यांची सावत्र-आई जिजाबाईसोबत (स्‍नेहा मंगल) निघून जातात. कुटुंबाचा सांभाळ, शिक्षण व कामाची जबाबदारी पडलेल्‍या भीमरावांना आणखी एका आव्‍हानाचा सामना करावा लागला. जेव्‍हा त्‍यांना समजते की हरिसेठचा मुलगा सूरज त्‍यांच्‍यासोबत गैरवर्तणूक करत आहे तेव्‍हा ते त्‍याच्‍याविरोधात आवाज उठवतात, ज्‍याचे अनपेक्षित परिणाम होतात. नाट्यमय घटनांमध्‍ये सूरज सर्व गोष्‍टींचा दोष भीमरावांवर टाकतो, तो त्‍यांनाच त्‍यांच्‍या वडिलांपासून वेगळे होण्‍यास जबाबदार मानतो. शेवटी तो त्‍यांना आत्‍महत्‍या करण्‍यास प्रवृत्त करतो. भीमराव या स्थितीवर मात करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होतील का की आळ आणलेल्या दोषाचा त्‍यांच्‍यावर विपरित परिणाम होईल? जगन्‍नाथ निवंगुणे म्‍हणाले, ''अवघड स्थिती व्‍यक्‍तीला अधिक शक्तिशाली बनवतात आणि हे सर्वांची काळजी घेण्‍याचा, तसेच जबाबदा-या पार पाडण्‍याचा प्रयत्‍न करत असलेल्‍या भीमरावांच्‍या बाबतीत दिसून येईल. गैरसमजाला वाईट वळण मिळत असताना वडिल-मुलगा वेगळे होण्‍याच्‍या दोषाचा भीमरावांवर परिणाम होईल का? ते नेहमीच समर्थक व मार्गदर्शक राहिलेले त्‍यांचे वडिल रामजीशिवाय कशाप्रकारे या स्थितीचा सामना करतील?'' मालिका 'एक महानायक – डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' या असाधारण व्‍यक्‍तीची यापूर्वी कधीच सांगण्‍यात न आलेली जीवनगाथा, त्‍यांची आंदोलन वृत्ती आणि ते संघटित भारताचे कशाप्रकारे अग्रदूत बनले ते सादर करत आहे. स्‍मृती शिंदे यांच्‍या सोबो फिल्‍म्‍सची निर्मिती असलेली ही मालिका बाबासाहेब आणि त्‍यांचा वयाच्‍या पाचव्‍या वर्षांपासूनचा प्रवास ते भारतीय संविधानाचे शिल्‍पकार बनण्‍यापर्यंत प्रवास सांगणारी प्रेरक कथा आहे.

अधिक जाणण्‍यासाठी पाहत राहा 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

No comments:

Post a Comment