एण्ड टीव्ही प्रेक्षकांसाठी लक्षवेधक साप्ताहिक क्राइम मालिका 'मौका-ए-वारदात' सादर करण्यास सज्ज आहे. ही मालिका प्रेक्षकांना 'वास्तव' कल्पनेपेक्षाही वेगळे असते यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल. लक्षवेधक गुन्हेगारी कथांना सादर करत भोजपुरी सुपरस्टार व लोकांमध्ये लोकप्रिय असलेला टेलिव्हिजन अभिनेता रवी किशन काही धक्कादायक गुन्ह्यांची झलक दाखवताना दिसेल. गप्पागोष्टींदरम्यान लोकप्रिय अभिनेत्याने मालिका आणि त्याच्या भूमिकेबाबत सांगितले.
१. मालिकेमधील तुझ्या भूमिकेबाबत सांग. तू मालिकेशी कशाप्रकारे संलग्न झालास आणि तुला या भूमिकेला होकार देण्यास कोणत्या गोष्टीने प्रवृत्त केले?
मी अकल्पनीय गुन्हे, त्यामधील गांभीर्य व विलक्षणतेच्या काही थरारक कथा सादर करणार आहे. विविध शैलींवर अनेक मालिका सादर करण्यात आल्या आहेत, पण माझ्या मते 'मौका-ए-वारदात' इतरांपेक्षा वेगळी मालिका आहे. ही एक अशी मालिका आहे, जी मला मनापासून तिचा भाग होण्यास प्रेरित करते. सविस्तरपणे संकल्पना समजल्यानंतर मला समजले की मालिका विश्वासापलीकडील अकल्पनीय व अविश्वसनीय गुन्ह्यांच्या कथांना दाखवेल. गुन्हेगाराच्या नजरेतून अशक्य शक्य आहे आणि लोकांना ते समजले पाहिजे. या कथा प्रेक्षकांना मालिका पाहण्यास भाग पाडतील.
२. 'मौका-ए-वारदात' भारतीय टेलिव्हिजनवरील इतर विविध गुन्हेगारी-आधारित मालिकांपेक्षा किती वेगळी आहे? ही साप्ताहिक की वीकेण्ड मालिका असणार आहे?
आज भारतीय टेलिव्हिजनवर अनेक गुन्हेगारी कन्टेन्ट उपलब्ध आहेत. पण, एण्ड टीव्हीवरील मालिका 'मौका-ए-वारदात' अद्वितीय व अत्यंत अनोखी आहे. रोजचे एपिसोड्स सर्वात विलक्षण, अकल्पनीय व अविश्वसनीय गुन्हेगारी कथांना दाखवतील. या कथा प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न निर्माण करतील – 'हे असे कसे झाले?' ही मालिका एक संकलन आहे, ज्यामध्ये वास्तविक घटनांमधून प्रेरित सर्वात रोमांचक व रहस्यमय गुन्हेगारी कथांचा समावेश आहे. ज्यामधून प्रेक्षकांना सर्वात अनपेक्षित घटनांसह रोमांचपूर्ण अनुभव मिळेल.
३. तुझ्या मते या मालिकेची खासियत काय आहे? प्रेक्षकांना या मालिकेमधून कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारी कथा पाहायला मिळतील?
अविश्वसनीय, अकल्पनीय गुन्हे सादर करण्यासोबत या मालिकेमध्ये महिला प्रमुख पात्र देखील या असाधारण गुन्ह्यांमागील रहस्य उलगडण्यामध्ये सहाय्यक भूमिका बजावताना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक मालिकेमधून ट्विस्टेड गुन्हेगारी रहस्यांची अपेक्षा करू शकतात.
४. गुन्हेगारी-शैलीने नेहमीच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षून घेतले आहे. तुमच्या मते, यामागील कारण काय असू शकते?
गुन्हेगारी संबंधित मालिका भारतीय प्रेक्षकांच्या आवडीच्या राहिल्या आहेत आणि पुढे देखील राहतील. भारतीय प्रेक्षकांची रहस्यमय व विलक्षण गुन्हेगारी कथा व रहस्यांप्रती आवड भारतीय टेलिव्हिजनवरील विविध गुन्हेगारी-आधारित कथानकांचा आधार राहिली आहे. क्राइम फिक्शन साहस व रहस्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. ते अत्यंत रोमांचपूर्ण मनोरंजन देते. क्राइम फिक्शनशी निगडित गुन्हेगारी मानसिकता देखील या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की, एखादी व्यक्ती गुन्हा
का करते किंवा गुन्हेगाराची बुद्धी कशाप्रकारे काम करते आणि असा गंभीर गुन्हा करण्यासाठी त्यांना कोणती गोष्ट प्रवृत्त करते.
५. भोजपुरी सुपरस्टार असल्यामुळे तुझ्या मते हिंदी व प्रादेशिक कन्टेन्टदरम्यान काय फरक आहे?
माझ्या अनुभवानुसार प्रादेशिक व हिंदी कन्टेन्टमध्ये समानता असली तरी ते त्यांच्यापरीने अद्वितीय आहेत. भाषा या उत्तम अध्ययन अनुभव देण्यासोबत उत्साहपूर्ण आहेत. एखादी व्यक्ती भाषाशैलीवर प्रभुत्व मिळवण्यासोबत त्या व्यक्तीला ऑफर करण्यात येणा-या विभिन्न कन्टेन्टवर काम करण्यास देखील मिळते. मी दोन्ही क्षेत्रांमध्ये माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. पण, मी भोजपुरी प्रेक्षकांशी अधिककरून जुडलेलो आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या भाषेमध्ये अभिनय करताना असे वाटते की 'माँ के हाथ का खाना', ज्यामधून मी भोजपुरी सुपरस्टार असल्याचे स्वीकारण्यास मला आत्मविश्वास मिळतो.
६. तू प्रेक्षक/वाचकांना काय संदेश देशील?
प्रेक्षकांना माझा एकच संदेश आहे की दक्ष राहा, जागरूक राहा आणि घडू शकणा-या गुन्ह्याच्या कोणत्याही सूचकांवर लक्ष ठेवा. तुमच्या स्वत:च्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य द्या. गुन्हेगार दिसून येत नाही किंवा त्याप्रमाणे वागत नाही. म्हणून आसपास घडणा-या गोष्टींबाबत लक्ष ठेवणे आणि तुमच्या मुलांना योग्य व अयोग्यामागील फरक समजावणे, जागरूक राहण्यास शिकवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावध व दक्ष राहण्यास शिकवणे महत्त्वाचे आहे. हा एक संयुक्त प्रयत्न आहे. शेवटी, विश्वातील कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक महत्त्वाचे आहे.
No comments:
Post a Comment