Friday, 26 March 2021

Zee TV actors revive their nostalgic Holi memories

 

झी टीव्हीच्या कलाकारांनी जागविल्या होळीच्या आपल्या जुन्या स्मृती!

ब्रह्मराक्षस-2’मध्ये कालिंदी आणि चांदनीची भूमिका रंगविणारी निक्की शर्मा म्हणते, मी होळीचा सण इतरांपेक्षा अगदी वेगळ्या पध्दतीने आणि खूपच शांततेत साजरा करते. मी होळी माझ्या कुटुंबियांबरोबर घरीच साजरी करते आणि त्यादिवशी आम्ही घरी खूप पक्वान्ने बनवितो. दुसर््यांवर आणि स्वत:वर रंग उडवायला आणि पाण्याची नासाडी करायला मला आवडत नाही. त्यामुळे मी होळी माझ्या घरातच साजरी करते. माझ्या घरची होळीचा सण हा एक निवांत कार्यक्रम असतो आणि देवांच्या पूजेने त्याचा प्रारंभ होतो. त्यानंतर मी माझ्या सर्व कुटुंबियांच्या माथ्यावर टिळा लावते. पण यंदा जवळपास सहा-सात वर्षांनी मी प्रथमच आमच्या मालिकेच्या सेटवर होळी साजरी करणार आहे. ‘ब्रह्मराक्षस-2’ मालिकेसाठी आम्ही होळीच्या प्रसंगाचं चित्रीकरण करीत होतो. मला दुसर््यांवर आणि स्वत:वर रंग उडवायला जरी आवडत नसलं, तरी या प्रसंगात माझ्या सहकलाकारांबरोबर होळीचे रंग खेळताना मला खूप मजा वाटली. ते चित्रीकरण करताना आपण काम करीत आहोत, असं वाटतच नव्हतं. आम्ही सेटवर मस्त धमाल करीत होतो. यासारखी होळी साजरी करणं यंदा आपल्याला जमेल असं वाटत नसलं, तरी यंदाही लोकांनी होळी आपल्या घरातच साजरी करावी, असं आवाहन मी करीन. यंदाची होळी सर्वांना सुरक्षित जावो, हीच सर्वांना शुभेच्छा.”

तेरी मेरी इक जिंदरीमध्ये गुलशनची भूमिका साकारणारा मनीष वर्मा म्हणाला, मी दिल्लीत माझ्या मित्रांबरोबर साजरी केलेली होळी याच माझ्या या सणाच्या सर्वात आनंददायक आठवणी आहेत. दिल्लीत माझा सहा मित्रांचा एक गट आहे. दरवर्षी मार्चमध्ये होळी साजरी करण्याच्या कल्पनेने आम्हाला फेब्रुवारीपासूनच उत्साह वाटायला लागत असे. तो काळ आणि ते क्षण हे खरंच संस्मरणीय होते. पण आता चित्रीकरणाच्या प्रदीर्घ वेळापत्रकामुळे आम्हाला एकमेकांबरोबर इतका वेळ देता येत नाही. मीसुध्दा तेरी मेरी इक जिंदरीच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यंदा शक्य झालं तर मला या मित्रांबरोबर होळी साजरी करायला नक्कीच आवडेल. पण सध्या देशात कोरोनाचा संसर्गाचं प्रमाण आणि रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने मी ही गोष्ट टाळीन. यंदा लोकांनीही घराबाहेर पडणं आणि एकमेकांना रंग लावणं टाळावं, असं मी आवाहन करीन. हा धमालमस्ती करण्याचा सण आहे आणि आपण ही धमाल फुलांचा वापर करून करू शकतो. कुछ डिफरन्ट भी हो जाएगा. सर्वांना होळीच्या शुभेच्छा!
तुझसे है राबतामध्ये कल्याणीची भूमिका रंगविणारी रीम शेख म्हणते, आमच्या तुझसे है राबता मालिकेच्या चित्रीकरणास प्रारंभ झाल्यापासून गेली दोन वर्षं आम्ही सर्व कलाकारांनी सेटवरच होळीचा सण साजरा केला आहे. अलीकडे कथानकात झालेल्या बदलामुळे तसंच बदललेल्या परिस्थितीमुळे आम्हाला सेटवर होळी खेळणं शक्य होणार नाही, याचा मला खेद वाटतो. मुंबईतील कोरोनाच्या फैलावाची परिस्थिती पाहता यंदाही होळीचा सण साधेपणानेच साजरा केला जाईल, असं वाटतं. मीसुध्दा माझ्या निकटच्या लोकांबरोबरच तो साजरा करीन. पण एके दिवशी मला आमच्या मालिकेतील सर्व कलाकारांबरोबर होळी खेळायची असून ती मालिकेच्या सेटवर नव्हे, तर दुसरीकडे कुठेतरी. आशावादातूनच हा सण साजरा करण्याचा नवा मार्ग सापडेल. सर्वांना होळीच्या शुभेच्छा!

कुरबान हुआमध्ये नीलची भूमिका रंगविणारा राजवीर सिंह म्हणाला, माझ्या सर्व सुखद आठवणींमध्ये होळीच्या सणाची आठवण असून ती तीन वर्षांपूर्वीची आहे. त्या वर्षी माझी आई आणि बहीण हे माझ्या पुतण्यांसह मुंबईत होळी साजरी करण्यासाठी प्रथमच आले होते. मुंबईतील होळी ही आमच्या गावातील होळीपेक्षा वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. इथे लोक तुमची नम्रपणे परवानगी घेऊन मगच तुम्हाला रंग लावतात. पण तिकडे आम्ही रंगांबरोबरच इतरही काही तुमच्या अंगाला फासतो. मला आठवतंय आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही होळी खेळत होतो. त्या दिवशी मी माझ्या आईला घेऊन तिच्या आवडत्या हलवायाच्या दुकानातही मिठाई खरेदीला गेलो होतो. तो माझ्या जीवनातील खास दिवस होता, कारण माझ्या आईला वाटत होतं की मुंबईत होळी हा कंटाळवाणा प्रकार असेल. पण रस्त्यारस्त्यावर डीजे आणि टोळक्यांनी होळी खेळताना पाहून त्यांना फार आश्चर्य वाटलं. मलाही अशा प्रकारे होळी खेळायला निश्चितच आवडेल, पण यंदाही होळीचा सण जरा मंदच असेल. अर्थात आम्ही आमच्या घरी आणि सेटवरही पूजा करणार आहोत. ही होळी सर्वांना आनंदाची आणि सुरक्षेची जावो!

कुरबान हुआमध्ये चाहतची भूमिका रंगविणारी प्रतिभा रांता म्हणते, माझ्या मते होळी आपल्या सर्वांच्या जीवनात एक आनंद आणते. कारण त्या दिवशी आपल्या भोवती इतके लोक असतात, संगीत असतं, रंग उधळले जातात. होळीच्या सुमारास वातावरणात आशा आणि आनंद भरलेला जाणवतो. मी जेव्हा शिमल्यात होते, तेव्हा माझ्या घरासमोरच एक मैदान होतं आणि आम्ही सर्वजण तिथेच होळी खेळत असू. त्यादिवशी आम्ही आमच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांना रंग लावीत असू. विशेषत: त्यांना जे घराबाहेर पडू शकत नसत. मला स्वत:ला पाण्याने भिजायला आवडत नसलं, तरी माझे मित्रमैत्रिणी मला त्या दिवशी सोडत नसत. ते माझ्यावर अंडीही फेकत. पण ते सर्व मजेत चालत असे. माझ्या मनात आता त्या होळीच्या आठवणी उभ्या राहतात. पण यंदा मोठ्या प्रमाणावर होळी साजरी केली, तर आपल्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. तेव्हा कुरबान हुआच्या सर्व प्रेक्षकांनी यंदा घरीच होळी साजरी करावी आणि स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी, हीच शुभेच्छा!

हमारीवाली गुड न्यूजमध्ये आदित्यची भूमिका साकारणारा राघव तिवारी म्हणाला, मी हल्ली होळी खेळण्याचं आणि रंग उडविण्याचं टाळतो कारण मला सायनसचा त्रास सुरू झाला आहे. थंड पाणी आणि रंगामुळे त्या त्रासात भरच पडते. पण लहान असताना आम्ही नेहमीच होळी खेळत असू. आम्ही तेव्हा पाण्याचे फुगे बनवीत असू आणि येणार््या-जाणार््याच्या अंगावर ते फेकत असू. ते लोक त्यामुळे वैतागून जात आणि त्यांना तसे पाहून आम्हाला खूप मजा वाटत असे. आम्ही तेव्हा एका सोसायटीत राहात असू आणि तिथे संमिश्र संस्कृती होती. आम्ही सर्व जण काही ना काही पदार्थ घरून करून आणीत असू आणि नंतर तो एकत्र बसून खात असू. त्या काळी होळीचा सण म्हणजे नुसती धमालमस्ती असे. आता कोविदमुळे परिस्थिती बदलली आहे. लोकांना भेटणं सध्या टाळलं जात आहे. यंदाही होळी साधेपणानेच साजरी केली जाईल, असं दिसतंय. पण आमच्या हमारीवाली गुड न्यूजच्या सेटवर आम्ही एकत्र लंच करून होळी साजरी करू.”

ब्रह्मराक्षस-2’मध्ये युग सूर्यवंशीची भूमिका रंगविणारा अर्पित रांका म्हणतो, मला विचाराल, तर निधीशी लग्न झाल्यानंतर आम्ही साजरा केलेला होळीचा सण ही माझी होळीची सर्वात सुंदर आठवण आहे. मला एकमेकांवर रंग उधळायला फारसं आवडत नाही, कारण बरेचदा लोक कृत्रिम रंग वापरतात आणि त्यातील घटकांचा मला त्रास होतो. पण लहानपणी आम्ही गुलालाने होळी खेळत असू. गेल्यावर्षीची होळीही तशी संस्मरणीय होती. तेव्हा होळीसाठी आम्ही माझ्या गावी गेलो होतो आणि नंतर लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून पडलो होतो. यंदाही कोविदचे वाढते रुग्ण पाहता, यंदा होळीत आपण सर्वांनीच थोडी जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यासाठी आपण घरातच सुरक्षित राहू. माझ्या सर्व चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा!

अपना टाइम भी आएगामध्ये महाराणी राजेश्वरीची भूमिका रंगविणारी तनाझ इराणी म्हणते, मी जरी पारशी असले, तरी मी होळी, दिवाळी, ख्रिस्तमस वगैरे सर्व सण साजरे करते. मला आजही तो प्रसंग आठवतो आहे : काही वर्षांपूर्वी आम्ही एका वाहिनीच्या होळी पार्टीला गेलो होतो. तिथे रंगाने भरलेल्या पाण्याचा हौद होता आणि त्यात मला माझ्या मित्र-मैत्रिणींनी ढकलून दिलं होतं. मला अनपेक्षितपणे असं ढकलून दिल्याने मला तेव्हा खूप राग आला होता. तेव्हा आम्ही बरेच तरूण होतो. पण आज जेव्हा मी त्याचा विचार करते, तेव्हा मला हसू आवरत नाही. गेली काही वर्षं मी आमच्या पारशी कॉलनीतील मित्र-मैत्रिणींबरोबर होळी साजरी करते कारण ती गोष्ट तशी खूपच सुरक्षित आहे. आता माझी मुलं खूपच लहान असल्याने यंदाही आम्ही तसंच करू. शिवाय मुंबईतील वाढत्या कोविद रुग्णांच्या संख्येमुळे चिंताही वाढत आहे. मी सर्वांना इतकंच सांगेन की सुरक्षित रंगांनी होळी खेळा, पण कोरोनाची साथ अजून सुरू आहे, हे विसरू नका. सर्वांनीच जरा सावधगिरी बाळगली, तर चांगलं होईल. तेव्हा होळी मजेत, पण सावधगिरी बाळगून खेळा.”

अपना टाइम भी आएगामध्ये वीरची भूमिका साकारणारा फहमान सांगतो, सोशल डिस्टन्सिंगचा नियम कठोरपणे पाळणार असल्याने यंदा आमची होळी काहीशी वेगळी असेल. गतवर्षीची होळी खूपच संस्मरणीय होती कारण होळी संपल्यावर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा आम्ही सर्वांनी खूपच धमाल केली होती. पण त्यानंतर जे घडलं, ते माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं आहे. दोन-चार वर्षांपूर्वीही आमच्या राहत्या इमारतीतील आम्ही सर्वजण बिल्डिंगमध्ये खाली जमून एकत्र होळी खेळत असू. तेव्हा आम्हाला खूप मजा येत असे. माझ्यासाठी ते सर्व दिवस खास आहेत. यंदा मात्र होळीच्या दिवशी आम्ही फार काही करू असं वाटत नाही. त्या दिवशी चित्रीकरणाला सुटी असल्याने मी माझ्या घरच्यांसोबतच राहीन. माझ्या सर्व प्रेक्षकांना मी इतकंच सांगेन की सर्वांनी सुरक्षा घ्या आणि सुरक्षितपणे होळी खेळा.”

तुझसे है राबतामध्ये अनुप्रियाची भूमिका रंगविणारी पूर्वा गोखले म्हणते, होळीबद्दल माझी आवडती आठवण म्हणजे मी लहान असताना आमच्या सोसायटीत माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळलेली होळी. तेव्हा या सणाबद्दल केव्हढा उत्साह असायचा! आमच्या सोसायटीत एक हौद होता आणि त्यात आम्ही मुलं दिवसभर डुंबत असायचो. त्या दिवशी माझी भावंडंही आमच्याकडे यायची आणि आई त्या दिवशी पुरणपोळ्या करायची. मराठी कुटुंबात तशी प्रथाच होती. होळीच्या आगदल्या दिवसासाठी आम्ही जमतील तिथून जुन्या मोडक्या झाडांच्या फांद्या गोळा करीत असू आणि रात्री सोसायटीतील सर्व लोक होळीभोवती जमा होत असत. या सर्व छोट्या गोष्टी आम्ही तेव्हा करीत असू आणि अशा तर््हेने आम्हाला हा सण फारच आवडत असे.  यंदा आपण सर्वांनी रंग लावताना काळजी घेण्याची विशेष गरज आहे कारण कोरोनाची लढाई अजून सुरूच आहे. त्यामुळे आता आणखीन रोगांना आणि विषाणूंना निमंत्रण देण्याची गरज नाही. त्यामुळे आपण सर्वांनी यंदा सुरक्षित होळी साजरी करण्यावर भर दिला पाहिजे आणि लोकांवर पाण्याचे फुगे किंवा रंग फेकून मारणं हे तसंही वाईटच आहे, असं मला वाटतं.”

Manish Verma who plays the character of Gulshan in Zee TV’s Teri Meri Ikk Jindri said “My most fond Holi memories are from the moments spent with my friends in Delhi. I have a group of six friends in Delhi. Every year, we would get so excited in the month of February as we would get to celebrate Holi together in March. Those times and those moment were indeed the most memorable.  But now we usually don’t get a chance to spend those moments again due to our schedules, and especially since I am also occupied shooting with Teri Meri Ikk Jindri If given a chance I would really like to enjoy and spend time with them this year but that’s something I am going to avoid given the number of COVID cases on the rise and I urge all our viewers to avoid stepping outdoors and using harsh colours. It’s the festival to have fun and we can have fun with flowers as well and kuch different bhi hojaega. A very Happy Holi to everyone.”

Reem Shaikh who depicts the role of Kalyani in Tujhse Hain Raabta states, “Ever since our show, Tujhse Hai Raabta started, for nearly two years, the entire cast played and celebrated Holi together. Currently because of track changes and recent developments it’s not possible for all of us to play together and I really miss that. This year also Holi will be very low key considering the COVID situation in Mumbai and I will be celebrating it with my near and dear ones. But I wish to one day play Holi with the all the cast members associated with the show and if not on the set then definitely somewhere else. I hope finds a cheerful way to celebrate this festival and wishing everyone a safe Holi.”

Pratibha Ranta who plays the role of Chahat in Qurbaan Hua states, “I feel Holi is a festival which brings immense warmth in our lives because there are so many people, colours, music that you almost get a feeling that you know the crowd around you. There’s a very positive atmosphere whenever Holi is around. I remember when I was in Shimla, there was a park right before my house and all of us used to play Holi there. We would also go and visit our relatives to give colors, especially the ones who are old and cannot move out of their house. I never liked getting drenched, but my friends would never leave me, and would drop eggs on me, but that I guess was all fun for us back then. I do miss the celebrations, but we must all realize health hazards associated with celebrating the festival on a large scale this year. Hence I request all the viewers of Qurbaan Hua to stay indoors and have a safe and Happy Holi”

Raghav Tiwari who plays the role of Aditya in Zee TV's Hamariwali Good News mentioned I I usually now avoid playing Holi because I have a problem of Sinus and exposure to cold water and even colors just add’s to the problem. However, during my childhood, I used to celebrate Holi very often. I remember we used to get these balloons and fill them up with water just to drop them at people who passed by. They would get so upset at us and the sight of that was really hilarious. Since I used to stay at a society and it had a mixed culture, we used to have pot luncheons where everybody would get something cooked and all of us would have that. So, it was fun and joy spending Holi, but now ever since the COVID situation, things have changed, and meeting people has somehow taken a backstep. Holi celebrations are lowkey this year too although we do plan to have small lunch celebration on the sets of Hamariwali Good News”

Arpit Ranka who depicts the role of Yug Suryavanshi in Brahmarakshas 2 said “If you ask me, the best memory I can recollect of Holi was after I was married to Nidhi. Honestly, I am not too much a of a fan of Holi especially since people mix a lot of synthetic stuff to colours which somehow doesn’t suit me. However, during my childhood days I used to love playing Holi with gulaal. Last year’s Holi was quite memorable too as we had visited my town for Holi but ended up getting stuck due to the lockdown. Given the current situation of COVID cases this year, I believe, its best for all of us to be a little cautious during Holi and be safe at our homes. I wish all my fans a very happy Holi.”

Tannaz Irani who essays the character of Maharani Rajeshwari in Zee TV's Apna Time Bhi Aayega said, “I’m Parsi but still we celebrate all the festivals, be it Christmas, Diwali or Holi. I still remember this incident; it was years back when we were attending a channel’s Holi party and there was a pool in which I was literally pushed by my best friend. That time I was angry with her because it was so sudden and we were too young, but now that I think about it, I just can’t stop laughing. For the past few years, I’ve been spending Holi at our Parsi colony with friends and family because I feel that is much safer. Even this year we plan to do the same since our kids are too young and we are being really cautious about the increasing COVID cases. My only advice to everyone is to play Holi with safe colors but don’t forget that the pandemic is still there. I urge everyone to be a little careful because safety is the first priority. So, play smart and happy Holi and all the best wishes from me to all of you.”

Fahmaan who plays the character of Veer from Apna Time Bhi Aayega said, “Our holi will be slightly different this year since social distancing is a must. Last year’s Holi was pretty memorable for me because the lockdown was announced right after Holi ended. We had quite a lot of fun at that time, but the aftermath is something which will be instilled in my mind forever. A couple of years back too, I used to have immense fun with my friends and family because at our building all of us would just gather to play with colors. Those days will always remain special for me. This year I don’t think I’ll do much on the day, maybe spend some time with family and friends because it’s a holiday from my shoot on Apna Time Bhi Aayega. To all our viewers, I would say play safe keeping in mind the safety precautions that are unavoidable.

Manoj Chandila who portrays the character of Pappuji from Teri Meri Ikk Jindri said “So, Holi is a festival we all look forward to. But this time around, the situation is not the same as it was previously. So, we should consider spending our Holi within the boundaries of our home just to be safe. I know it is a little disappointing but for everybody’s safety, it is important for us to compromise a little on our enjoyment. Even I am missing those day when I used to spend Holi with my friends and family members, playing and having scrumptuous food, but this time I’ve strictly decided to avoid social gatherings and will be staying at home.”

Neha Marda who depicts the character of Shubhra from Kyun Rishton mein Katti Batti said “Holi is one of the most colorful and beautiful festival we all look forward to. And for me I think it is even more special because it is the only festival where we pay the least attention to how we look. We can take out the worst from our wardrobe and wear it like a queen, knowing that it is going to get ruined anyway. The thing is, if you get to spend the day with your loved ones, your Holi is anyway sorted. I am going to be in Patna this time and will surely be having a gala time with my family, since I’m not meeting any of my friends during Holi. And I would also want all my fans to be at home and request them to keep themselves safe, because a day’s celebration is not worth a thousand lives.”

Srishti Jain who plays the role of Navya in Zee TV's Hamariwali Good News mentioned, "First of all, I would like to wish everyone a very Happy Holi. I know we are amidst a grave pandemic, but Holi is really special for me and I wish everyone stays indoor and safe this year. Talking about my most fond memories of Holi, I would like to point out that I've celebrated with my family and friends every year and we used to enjoy the festival by playing with colour and water as well as eat some amazing food. I also remember, there was one particular year when we were in Jaipur for Holi and we celebrated the festival in this beautiful haveli and ate authentic Rajasthani food. That was the best memory I have Holi and while this year, I plan to be at home, I will be feasting on some good food.

No comments:

Post a Comment