Saturday 23 December 2023

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक 'POEM' प्रक्रियेच्या साहाय्याने गिळताना त्रास होत असलेल्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले जात आहेत


  • पेरोरल एंडोस्कोपिक मायोटॉमी किंवा POEM ॲकलेसिया यासारख्या एसोफॅगसमध्ये स्नायू विकारांनी त्रस्त लोकांसाठी एक नवीन उपचार पर्याय आहे.
  • सामान्य अनेस्थेशिया देऊन केली जाणारी POEM ही अतिशय कमीत कमी इन्व्हेसिव्ह प्रक्रिया आहे आणि यामध्ये शरीरावर दिसून येतील असे व्रण राहत नाही. 

नवी मुंबई23 डिसेंबर2023:  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईने दोन दुर्मिळ केसेसची माहिती दिली आहेज्यामध्ये गिळताना त्रास होण्याच्या समस्येवर आधुनिक पेरोरल एंडोस्कोपिक मायोटॉमी प्रक्रियेचा उपयोग करून यशस्वीपणे उपचार केले गेलेयापैकी एक ४१ वर्षांचे श्री अशोक यांना गेल्या दहा वर्षांपासून जेवताना छातीमध्ये त्रास होत होतादुसरी केस श्रीमती सिराज देवी या ७० वर्षांच्या महिलेला गेल्या पाच वर्षांपासून गिळताना त्रास होत होताखूप जुना खोकला होतासतत होणाऱ्या एस्पिरेशन न्यूमोनियामुळे फुफ्फुसांचे फायब्रोसिस झाले होतेअन्ननलिकेवर परिणाम करणारी एक स्थितीॲकलेसिया कार्डियाचे निदान करण्यात आल्यावर रुग्णांवर खूपच कमी इन्व्हेसिव्ह असलेली POEM प्रक्रिया करण्यात आली.  त्यामुळे लक्षणांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा दिसून आलीतिसऱ्या दिवशी त्यांना घरी पाठवण्यात आलेमल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोनामुळे या दोन्ही रुग्णांना बरे होण्यात मदत मिळाल्याचे या दोन्ही केसेसमधून दिसून येते

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये कन्सल्टन्ट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ दीपक भंगाळे यांनी सांगितले"ॲकलेसिया अशी स्थिती आहेज्यामध्ये आपण खाल्लेले अन्न पोटापर्यंत घेऊन जाणारी अन्नप्रणाली नीट आकुंचन पावत नाहीत्यामुळे अन्न पोटापर्यंत नेणे कठीण होऊन बसतेत्याशिवाय अन्नप्रणालीच्या खालच्या भागातील एक स्नायू एसोफेजियल स्फिन्क्टर नीट रिलॅक्स होऊ शकत नाहीत्यामुळे अन्न गिळणे कठीण होतेत्यामुळे खोकला येतो किंवा श्वास अडकतोतसेच अन्न नलिकेमध्ये अडकू शकतेहळूहळू रुग्णाचे वजन कमी होत जातेपोषण कमतरतेमुळे जीवन गुणवत्ता देखील खालावते."

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागामध्ये उपलब्ध करवून देण्यात आलेली POEM एक मेडिकल प्रक्रिया आहेजिचा उपयोग करून गिळण्यामध्ये होत असलेल्या त्रासावर उपचार केले जातातPOEM प्रक्रिया सर्वात पहिल्यांदा २००८ साली जपानमध्ये आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये युकेमध्ये केली गेलीतेव्हापासून या आधुनिक प्रक्रियेचा उपयोग ॲकलेसियासारख्या एसोफेजियल मोटीलिटी समस्यांच्या उपचारांसाठी केला गेला आहेशरीरावर कोणतेही बाह्य घाव  करता ही प्रक्रिया केली जाते आणि यासाठी साधारणपणे ६० ते ९० मिनिटे लागतातयासाठी सामान्य अनेस्थेशिया दिला जातोअमेरिकन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइन्टेस्टायनल एंडोस्कोपीने याला सुरक्षित  प्रभावी उपचार पर्याय म्हणून मान्यता दिली आहे.

पहिल्या केसमध्ये ४१ वर्षांचे श्री अशोक यांना दुसरा काहीच आजार नव्हतागेल्या दहा वर्षांपासून जेवताना छातीमध्ये त्रास होत होताकोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये येण्याच्या आधी अनेक डॉक्टरांकडून तपासण्या करून घेतल्या होत्या आणि त्यातून दिसून आले होते की त्यांचे हृदयाचे आरोग्य नीट आहेजीआय एंडोस्कोपी आणि मॅनोमेट्रिक तपासणीतून त्यांच्या समस्येचे कारण समजले की त्यांना टाईप  ॲकलेसिया कार्डिया आहेया रुग्णाने पारंपरिक पर्यायांऐवजी आधुनिक POEM प्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेतलाप्रक्रियेनंतर लगेचच श्री अशोक यांची दहा वर्षे जुन्या आजारातून सुटका झाली

दुसऱ्या केसमध्ये ७० वर्षांच्या श्रीमती सिराज देवी यांना गेल्या पाच वर्षांपासून गिळताना त्रास होत होताजुनाट खोकला होता आणि पुन्हा पुन्हा होणाऱ्या एस्पिरेशन न्यूमोनियामुळे त्यांच्या फुफ्फुसांमध्ये फायब्रोसिस झाले होतेटाईप  ॲकलेसिया कार्डियाचे निदान करण्यात आले होतेत्यांचे वय आणि फुफ्फुसांमधील गुंतागुंत यामुळे सर्जरीमध्ये खूप जास्त धोका होताम्हणून त्यांच्यावर POEM प्रक्रिया केली गेलीप्रक्रिया यशस्वी झाली आणि गिळताना होणारा त्रास  जुनाट खोकला या दोन्हींपासून त्यांची सुटका झाली.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईचे संचालक  प्रमुख डॉ बिपीन चेवले यांनी सांगितले"POEM प्रक्रिया कमीत कमी इन्व्हेसिव असल्याने खूप धोका असलेल्या रुग्णांसाठीएसोफेजियल मोटीलिटी समस्येवर उपचार म्हणून पारंपरिक सर्जिकल पद्धतींना अतिशय प्रभावी पर्याय म्हणून उपयुक्त ठरतेआम्हाला अभिमान वाटतो कीआम्ही नवी मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील रुग्णांसाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये ही आधुनिक POEM प्रक्रिया सादर केली आहेआमच्या रुग्णांची सर्वोत्तम देखभाल करण्यासाठी नवीन मेडिकल प्रगती आणि मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन वापरण्याप्रती आमची बांधिलकी यामधून दर्शवली जाते."

No comments:

Post a Comment