Friday 12 April 2024

रश्मिका सांगतेय फील गुड विथ फियामा आणि माईंड्स फाऊन्डेशन सोबत


नवीन फोमो, फन ऑफ मिसिंग आऊट ! - आयटीसी फियामा मेंटल वेलबीईंग सर्व्हेचा निष्कर्श

  • फन ऑफ मिसिंग आऊट : ६७ टक्के भारतीय जेन-झी ने बदलला फोमो आणि मानसिक आरोग्याच्या संदर्भातील दृष्टिकोन
  • तणाव आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी ८६ टक्के भारतीयांनी केली संगीताची निवड
  • तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी ८६ टक्के भारतीयांनी केली योग,ध्यानधारणा आणि व्यायामाची निवड
  • आनंद मिळवण्यासाठी ७५ टक्के जेन-झी भारतीयांनी पाहिली पिक मी अप सिरी

राष्ट्रीय  एप्रिल २०२४  भारतात मानसिक आरोग्या विषयीचा लोकांचा दृष्टिकोन वेगाने बदलत असून याबाबत जागरुकता ही वाढत आहे, त्याच बरोबर या समस्ये विषयी असलेला सामाजिक दृष्टिकोनही बदलत आहे.  फील गुड विथ फियामा मेंटल वेल बिईंग सर्व्हे २०२३ च्या माध्यमातून जेन-झीने आनंदी मानसिकता जोपासण्यासाठी आणि आनंदाचा अनुभव घेण्यासाठी काय उपाय केले या विषयावर प्रकाश टाकण्यात आला.  नेल्सनआयक्यू ने हे सर्वेक्षण केले होते आणि यातून अधिकतर जेन झी आणि मिलेनियल्स कशा प्रकारे आपली वागणूक आणि तणाव याविषयी माहिती घेऊन आनंदी आणि शांत राहण्यासाठी काय करतात याची माहिती घेण्यात आली.

सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रमांच्या ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ च्या अगदी विरुध्द जेन झी फोमो विषयी नवीन दृष्टिकोन म्हणजेच ‘फन ऑफ मिसिंग आऊट’ असा दृष्टिकोन ठेवतात.  दृष्टिकोनातील हा बदल प्रत्येक व्यक्तीला नवीन सीमारेषा आखणेतंदुरुस्तीला प्राधान्य देणे आणि तुम्हाला ज्या गोष्टींनी आनंद आणि पूर्णत्व मिळते हे दर्शवते.  सर्वेक्षणातून असे दिसून येते की तणाव आणि काळजी असूनही ५१ टक्के भारतीयांच्या मते समाजमाध्यमांचा सकारात्मक परिणाम होऊन  ते ऑनलाईन काऊन्सेलिंगचा पर्याय निवडू शकतात. योगाध्यानधारणा आणि व्यायाम या गोष्टींचा उपयोग ८६ टक्के भारतीय करतात ज्यामुळे त्यांच्या तणावावर ते मात करु शकतात यातून असे दिसून येते की त्यांनी मानसिक आरोग्याचा समतोल ठेवण्यासाठी शारीरीक कामाची निवड केली आहे. ७५ टक्के भारतीय जेन झी हे आनंदी राहण्यासाठी पिक मी अप सिरीज किंवा आनंदी ठेवणारा चित्रपट पाहतात.

माईंड्स फाऊन्डेशन चे संस्थापक आणि सीईओ डॉ. रघू अप्पासनी यांनी सांगितले “ आजच्या व्यस्त अशा जीवनात आनंद मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांना काय थांबवत आहे ते जाणून घेणे आणि ते कोणत्या अंतर्गत आणि बाह्य गोष्टींवर काम करतात हे जाणून घेणे.  फियामा ने माईंड्स फाऊन्डेशनच्या सहकार्याने सवलतीच्या दरात व्हर्च्युअल थेरपी उपलब्ध करुन दिली आहे. या थेरपी सेशन्स चे डिझाईन हे जीवनात अधिक समाधान आणि वैयक्तिक बदल घडवण्यासाठी करण्यात आले असून यामुळे लोकांना त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते.”

मानसिक आरोग्याच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून कंटेटचे प्रसारण करण्यासाठी महत्त्वाचा विषय बनला असून फील गुड विथ फियामा मेंटल वेलबिईंग सर्व्हे सुध्दा मानसिक आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकत आहे.  ७९ टक्के लोकांच्या मते मानसिक समस्यां विषयी चित्रपटांतून दर्शवल्या जाणार्‍या गोष्टीही सकारात्मक आहेत आणि ८१ टक्के लोकांना असेही वाटते की सेलिब्रिटीज सुध्दा मानसिक आरोग्या विषयी सकारात्मक परिणाम घडवत असतात.

आयटीसी लिमिटेड च्या पर्सनल केअर प्रॉडक्ट्स बिझनेसचे डिव्हिजनल चीफ एक्झिक्युटिव्ह समीर सत्पती यांनी सांगितले “ भावभावना या मनुष्याच्या अस्तित्वाचा एक भाग आहे आणि आनंद शोधणे हा त्याचा अविभाज्य भाग आहे.  याच भावनेला बळकटी ही फन ऑफ मिसिंग आऊट या नवीन दृष्टिकोनातून प्राप्त होत असून फिल गुड विथ फियामा मेंटल वेलबीईंग सर्व्हे मुळे प्राप्त होते.  मानसिक आरोग्य हा आपल्या मानसिकभावनात्मक आणि सामाजिक आरोग्याचा एक अविभाज्य भाग आहे.  आयटीसी फियामा नेहमीच भारतातील मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक संभाषण करण्यासाठी वचनबध्दता दर्शवली आहे.”

आयटीसी फियामा ची ब्रॅन्ड ॲम्बेसेडर रश्मिका मंदाना म्हणते “  आजच्या वेगवान जगात आपले मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवणे खूपच आवश्यक असते कारण आपण खूपच तणावाचा सामना करत असतो.  माझ्या रोजच्या जीवनात खूपच त्रासदायक वेळ आणि प्रवास सुरु असतात पण माझा असा विश्वास आहे की प्रत्येक क्षण जगावा आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही आनंद घ्यावाअगदी छोट्या चांगल्या गोष्टी कराव्यात यासाठी के ड्रामा किंवा ॲनिमे मध्ये रमावे.  माझ्या मते आपण जे करतो त्या आनंदी गोष्टींमुळे तुमचा तणाव वेगाने नाहीसा होतो.  आयटीसी फियामा बरोबर सहकार्य करतांना मी आनंदी आहे आणि त्यांनी प्रत्येक तणावपूर्ण गोष्टींना नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न हाती घेतले आहेत व आज ते जे मानसिक आरोग्या विषयी काम करत आहेत ते उल्लेखनीय आहे.”

आयटीसी फियामा ने दि माईंड्स फाऊन्डेशन च्या सहकार्याने पहिल्यांदाच व्हर्च्युअल क्लिनिकची सुरुवात केली आहे.  या व्हर्च्युअल क्लिनिक चे डिझाईन हे नोंदणीकृत अशा व्यावसायिक लोकांकडून करण्यात आले असून त्यामुळे  मानसिक आरोग्यावर यातून उपचार उपलब्ध केले जातात.  हा एक योग्य मंच आहे ज्या माध्यमातून समस्या किंवा प्रचलित असलेल्या मिथकांची भिती न बाळगता ऑनलाईन मंचाच्या माध्यमातून उपचार प्राप्त करणे शक्य होते. माईंड्स फाऊन्डेशन ने व्हर्च्युअल क्लिनिक साठी तज्ञ अशा थेरपिस्टची टीम एकत्र केली असून त्या माध्यमातून स्वत:ची गोपनियता ठेऊन तज्ञांकडून सल्लाउपचार आणि समूपदेशन दिले जाते.

परवडणार्‍या दरात माईंड्स फाऊन्डेशन च्या तज्ञ थेरपिस्ट्स कडून सल्ला प्राप्त करण्यासाठी  here  येथे क्लिक करुन नोंदणी करा.

*आयटीसी फील गुड विथ फियामा मेंटल वेलबिईंग सर्व्हे २०२३ चे आयोजन हे १६-४५ वर्ष वयोगटातील ८०० पुरुष आणि महिलां मध्ये करण्यात आले होते. या व्यक्ती दिल्लीमुंबईकोलकाता आणि बंगळूरु या शहरातील होत्या.  सर्वेक्षणाचे आयोजन सप्टेंबर २०२३ मध्ये नेल्सनआयक्यू द्वारे करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment