हे प्रगत तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदा आणले गेले असून याचा वापर करून खांद्यांची आर्थ्रोप्लास्टी अभूतपूर्व अचूकतेने आणि कस्टमायजेशनसह करणे आता शक्य आह
मुंबई, 30 एप्रिल, 2024: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने खांद्यांच्या रिप्लेसमेंट सर्जरीसाठी व्हर्च्युअल इम्प्लांट पोझिशनिंगसह (VIP) आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिम हे क्रांतिकारी तंत्रज्ञान भारतात आणले आहे. व्हीआयपी सिस्टिमचा उपयोग करून रिव्हर्स टोटल शोल्डर रिप्लेसमेंटच्या लाईव्ह प्रदर्शनात हे नवे तंत्रज्ञान दाखवण्यात आले. व्हीआयपीसह आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिम ऑर्थोपेडिक्समध्ये उचलण्यात आलेले एक खूप मोठे पाऊल आहे, जे अधिक अचूकता, वेगवान रिकव्हरी आणि रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळवून देते.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आपल्या अतिशय उत्तम स्पोर्ट्स मेडिसिन सेवांसाठी प्रसिद्ध आहे. रुग्णांच्या वैयक्तिक गरजांनुसार उपचार योजना आणि प्रगत तंत्रज्ञानासह नवनवीन सेवासुविधा सादर करण्यासाठी हे रुग्णालय ओळखले जाते. व्हर्च्युअल इम्प्लांटचे नवे तंत्रज्ञान आल्यामुळे आता रुग्णालयाची स्पोर्ट्स मेडिसिन टीम रुग्णांची देखरेख आणि त्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या परिणामांना अतुलनीय मापदंडांपर्यंत पोहोचवण्यात आघाडीवर पोहोचली आहे.
आर्थरायटिस किंवा जखम झाल्यास खांद्याच्या सांध्यांमध्ये होणाऱ्या गंभीर समस्यांमध्ये वेदना कमी करण्यात आणि खांद्याचे कार्य पुन्हा सुरु करण्यासाठी रिप्लेसमेंट सर्जरी केली जाते. याच्या पारंपारिक पद्धतींमध्ये कधी-कधी इम्प्लांटचे अचूक प्लेसमेंट आणि प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट शारीरिक रचनेनुसार इम्प्लांट स्वीकारले जाण्यात अडचणी येऊ शकतात. व्हीआयपीसह आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिममध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि अतिशय विचारपूर्वक आखलेल्या योजनेसह या अडचणी दूर केल्या जाऊ शकतात. खांद्याच्या सर्जरीमध्ये हे एक क्रांतिकारी परिवर्तन आहे, जे सर्जन आणि रुग्ण दोघांनाही लाभदायक आहे.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईचे स्पोर्ट्स आर्थोपेडिक्स, आर्थ्रोस्कोपी आणि ट्रॉमा विभागाचे कन्सल्टन्ट (युनिट लीड) डॉ श्रेयश गज्जर यांनी या सिस्टिमचा उपयोग करून पहिली सर्जरी केली. या सर्जरीचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, "व्हीआयपीसह आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिम खांद्याच्या आर्थ्रोप्लास्टीमध्ये एक खूप मोठे परिवर्तन आहे. हे तंत्रज्ञान सर्जनना सर्जरीमध्ये अचूकता व अनुकूलन आणण्यासाठी सक्षम बनवते, त्यामुळे रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळतात. सर्जरीच्या आधी अतिशय विचारपूर्वक केलेल्या योजनेमार्फत आम्ही अचूकतेने सर्जरी करू शकतो आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जिकल तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. यामध्ये रुग्णाच्या शरीरावर खूपच लहान चिरा देऊन सर्जरी केली जाऊ शकते, पेशींचे नुकसान खूपच कमी होते, रिकव्हरी अजून वेगाने होते. रुग्णांच्या खांद्यांच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते आणि रुग्ण आपली रोजची कामे पुन्हा करू शकतात. आमच्या पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळतात आणि रुग्णांच्या विशिष्ट वैयक्तिक गरजांना प्राथमिकता दिली जाते."
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईचे सीईओ आणि कार्यकारी संचालक डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, "आम्हाला खूप आनंद होत आहे की आमचे हॉस्पिटल आधुनिक आर्थ्रोपेडिक्समध्ये सर्वात आघाडीवर आहे आणि भारतात हे अभूतपूर्व तंत्रज्ञान सर्वात पहिल्यांदा सादर करण्याचा मान आम्ही मिळवला आहे. व्हीआयपीसह आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिम आमच्या रुग्णांना सर्वोत्तम दर्जाची देखरेख आणि सर्वात प्रगत उपचार पर्याय प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे. हे तंत्रज्ञान खांद्याच्या रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये क्रांती आणून खांद्याच्या सांध्यांच्या समस्यांनी त्रस्त अगणित लोकांच्या जीवनात उल्लेखनीय सुधारणा घडवून आणू शकते. व्हीआयपीसह आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिम यशस्वीपणे लॉन्च करून कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणण्यात आघाडीचे रुग्णालय म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे."
सर्जन सर्जरीच्या आधी व्हीआयपी तंत्रज्ञानाचा उपयोग करून इम्प्लांट प्लेसमेंटची योजना बनवतात. या तंत्रज्ञानामध्ये एक व्हर्च्युअल शोल्डर मॉडेल बनवले जाते, यामध्ये प्रत्येक रुग्णाच्या विशेष गरजांनुसार अतुलनीय अचूकता सुनिश्चित केली जाते. त्यामुळे गुंतागुंत कमी होते आणि कमीत कमी चिरा देऊन सर्जरी केल्यामुळे रुग्णाची रिकव्हरी देखील अधिक वेगाने होते. रुग्णाचे खांदे अधिक लवकर पूर्ववत काम करू लागतात, त्यामुळे त्यांचे समाधान व आनंद वाढतो, ते आपली रोजची कामे करण्यात अधिक लवकर सक्षम होतात.
हे प्रगत तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदा आणले गेले असून याचा वापर करून खांद्यांची आर्थ्रोप्लास्टी अभूतपूर्व अचूकतेने आणि कस्टमायजेशनसह करणे आता शक्य आहे

No comments:
Post a Comment