मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या शुक्रवारीप्रदर्शित झालेल्या 'घात' चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अत्यंत मनोवेधक आणिथरारक मांडणी, नेत्रसुखद लोकेशन्स आणि चित्ताकर्षक छायाचित्रण, उत्कंठावर्धक संगीतआणि उत्कृष्ठ कथाबीज हे सारं एकाच चित्रपटात म्हणजे सोने पे सुहागा! अस्सल अभिनय आणित्यातील बिनचे कलावंत......! असं सबकुछ असलेला हा चित्रपट साऱ्या विश्वात कुतूहल निर्माणकरण्यात यशस्वी झाला आहे. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, पुणे,सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर अश्या शहरामध्ये या चित्रपटाला वाढता प्रतिसादलाभतोय. चित्रपटाला मिळत असलेलं यश समाधान देत असून खास विदर्भात चित्रित झालेल्या या चित्रपटाची तुलना प्रेक्षक हॉलिवूडच्या चित्रपटांशी करीत आहेत. नागपूर येथील एका शोला चित्रपटात भूमिका केलेली विदर्भातील कलावंतांनी अचानक उपस्थिती दर्शविली आणि रसिकांच्याआनंदाला उधाण आले. चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका जिवंत करणाऱ्या या कलावंतांना पाहून प्रेक्षक अगदी भारावून गेले होते. काहींनी हा चित्रपट मराठीतला शोले असल्याचे सांगितले तर काहींनी थेट हॉलिवूडच्या चित्रपटांसोबत तुलना करून कलावंतांचे कौतुक केले.
आपल्या मुंबई पुण्यात चित्रपटांतील कलावंत नेहमीच प्रेक्षकांना भेटत असतात, त्यांच्याशी संवाद साधत असतात, छायाचित्रे - सेल्फी घेत असतात, परंतु मराठवाडा विदर्भात असं अभावानेच घडताना दिसते. मात्र विदर्भातील दुर्गम ठिकाणी चित्रीकरण करण्याचा धाडसी विचार दिग्दर्शक छत्रपाल निनावेंनी नुसता केलाच नाही तर तो तडीसही नेला. प्रेक्षकांना जे द्यायचे ते उत्तमच असावे या विचाराने, कुठलीही तडजोड न करता या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्यांनी थेट गडचिरोलीचे घनदाट जंगल निवडलं. आपल्या गोष्टीसाठी हवं ते शोधून, अनेक अडथळे पार करून त्यांनी गडचिरोली - छत्तीसगडच्या दुर्गम भागात अनेक दिवस संपूर्ण चित्रपटाच्या युनिटसोबत अगदी दुर्गम भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचे धाडस केले आणि त्यात ते यशस्वीही झाले...त्यांनी या चित्रपटासाठी निवडलेला घनदाट नक्षली जंगलाचा बॅगड्रॉप आणि त्यासाठी सर्वांनी जीवावर उदार होऊन घेतलेल्या मेहनतीचे कौतुक प्रेक्षक चित्रपट पाहून करतात ते समाधान लेखक दिग्दर्शक, कलावंत निर्माते यांच्या चेहऱ्यावर लकाकत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र या चित्रपटाची विशेष चर्चा होत असून चित्रपटाला वाढता प्रतिसाद मिळत आहे.
माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला येतो. माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक, पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा रंगत जातो. शिलादित्य बोरा यांची ''प्लॅटून वन', मनीष मुंद्रा यांची 'दृश्यम फिल्म्स' आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘घात’ सिनेमात मराठीतील अत्यंत संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची आडारकर, जनार्दन कदम आणि धनंजय मांडवकर यांंच्या मुख्य भुमिका आहेत. त्यांच्यासह या चित्रपटात स्थानिक कलाकार संग्रामसिह ठाकूर, विकास मुडकी, काजल रंगारी, राहुल गावंडे, अजय लोणारे, विनोद राऊत, गिरीधर फताळे, निरज धानी, महेंद्र मस्के, गणेश देशमुख, अदित्य बुलकुंदे, रतन सोमवारे, पवन ठाकरे, शैलेश पाटील, अतुल खंदारे यांच्याही लक्षवेधी भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment