Sunday, 13 October 2024

बिर्ला ओपस पेंट्सने आपल्या ‘नए जमाने का नया पेंट’ या नवीन अभियानासाठी विकी कौशल आणि रश्मिका मंदानाला नेमले


~या अभियानात दर्शविण्यात आले आहे की बिर्ला ओपस पेंट हा सर्वात युवा पेंट आहे जो आजच्या आधुनिक ग्राहकांच्या गरजा ओळखतो आणि आपल्या अप्रतिम उत्पादनांद्वारे त्या गरजा पूर्ण करणे जाणतो~

मुंबई 11 ऑक्टोबर 2024: या वर्षाच्या सुरुवातीला डेकोरेटिव्ह पेंट्स क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम उद्योगांतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने आता ‘नए जमाने का नया पेंट’ म्हणजेच नवीन काळासाठी नवीन पेंट हे अभियान नुकतेच सुरू केले आहे. लिओ बर्नेट इंडियाच्या संकल्पनेतून जन्मलेल्या या फिल्ममध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदाना हे भारतातील सध्याचे दोन मोठे आणि लोकप्रिय कलाकार, ब्रॅंड अम्बॅसडर या नात्याने या ब्रॅंडच्या अनोख्या आणि विशेष गुणांविषयी आणि गुणवत्तेविषयी बोलताना दिसतात. त्या दोघांव्यतिरिक्त या फिल्ममध्ये नीना गुप्ता आणि सौरभ शुक्ला हे दोन ज्येष्ठ अभिनेते देखील आहे. आगळीवेगळी संकल्पना, मोठे कलाकार आणि सुंदर मांडणी यामधून बिर्ला ओपस पेंट्स ‘नवीन’ आणि ‘आकर्षक’ असल्याचे भारपूर्वक सांगितले आहे.
हे अभियान हिंदी आणि सर्व मोठ्या प्रादेशिक भाषांमधून चालवण्यात येणार आहे आणि टीव्ही, डिजिटल, OOH, प्रिंट आणि रेडियो अशा सर्व माध्यमातून त्याचा प्रचार करण्यात येणार आहे, जेणेकरून लोकांना या उत्पादनाविषयी माहिती मिळेल आणि त्यांना हे उत्पादन वापरावेसे वाटेल.
या अभियानाविषयी टिप्पणी करताना बिर्ला ओपस पेंट्सचे सीईओ श्री. रक्षित हरगवे म्हणाले, “या सणासुदीच्या मोसमात लॉन्च होत असलेल्या आमच्या ‘नए जमाने का नया पेंट’ या अभियानातून एका जबरदस्त कलाकार संचाच्या माध्यमातून आम्ही आमच्या उत्पादनाची वैशिष्ट्ये दाखवणार आहोत. या अभियानात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची युवा ऊर्जा आणि सौरभ शुक्ला व नीना गुप्ता यांचा कालातीत मोहकपणा एकवटला आहे. आम्हाला आत्मविश्वास वाटतो की आमची कल्पकता आणि प्रेरक दृष्टिकोन दर्शविणारे हे अभियान उपभोक्त्यांना आपलेसे वाटेल!”
बॉलीवूड सुपरस्टार विकी कौशलने नमूद केले, “बिर्ला ओपस पेंट्स परिवारात सहभागी होताना मी रोमांचित झालो आहे. आणि या अभियानातून उपभोक्त्यांच्या जीवनात उत्साह आणि रंग भरण्यासाठी मी आतुर आहे. हे अभियान खूप वेगळ्या पद्धतीने आणि कलात्मकतेने या फिल्म्समधून साकार केले आहे. सौरभ शुक्ला या वरिष्ठ अभिनेत्यासोबत या जाहिरातीचे शूटिंग करताना मला खूपच मजा आली. शूटिंग करताना त्यांचे इंप्रोव्हाईझेशन बघणे ही एक पर्वणी होती!”
पॅन इंडिया स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणाली, “मला वाटते बदलत्या काळानुरूप आपणही बदलले पाहिजे. माझ्या या विचारांचे प्रतिबिंब बिर्ला ओपस पेंट्सच्या नवीन अभियानात उमटलेले दिसते की, ‘तुम्हाला असलेल्या माहितीच्या आधारे पर्याय निवडा, सामान्य चलन पाहून नाही!’ अम्बॅसडर म्हणून बिर्ला ओपसशी संलग्न होताना मला आनंद वाटत आहे. आणि नीनाजींसोबत ही जाहिरात करण्याचा अनुभव फार छान होता. बिर्ला ओपस पेंट्सशी माझे हे नाते अधिकाधिक दृढ होत जाईल अशी मला आशा आहे.”
या अभियानाविषयी बोलताना लिओ बर्नेट – साऊथ एशियाचे अध्यक्ष राजदीपक दास म्हणाले, “आपण अशा जगात राहात आहोत, जे सतत आपली घरे, गरजा आणि आपले दृष्टिकोन यात बदल करत आहे, त्यांना नवीन आकार देत आहे. मोठमोठे कलाकार असलेली आमची फिल्म एक असा खेळकर दृष्टिकोन देते की, जुन्या पद्धतीचे पेंट्स जुन्या जमान्यात चालत होते, पण आता पेंट्सची नवीन पिढी आली आहे आणि हे पेंट्स भारताच्या सतत बदलत्या गरजा भागवण्यासाठी बारकाईने, विचारपूर्वक बनवण्यात आले आहेत.”
संकल्पना: नए जमाने का नया पेंट म्हणजेच नवीन काळासाठी नवीन पेंट
  
फिल्मची लिंक:
रश्मिका मंदानाची इंटिरियर लक्झरी फिल्म –  https://www.youtube.com/watch?v=eWFGnrDJH5k
विकी कौशलची इंटिरियर इकॉनॉमी फिल्म - https://www.youtube.com/watch?v=Qt4IvLEYN0k

एजन्सी श्रेय:
क्लायन्ट: बिर्ला ओपस पेंट्स
क्रिएटिव्ह एजन्सी: लिओ बर्नेट इंडिया
प्रॉडक्शन हाऊस: क्रोम पिक्चर्स



***
About Birla Opus Paints: 
Birla Opus Paints, housed under Grasim Industries, Aditya Birla Group’s flagship firm, offers Decorative Painting Solutions to consumers in India. Launched in 2024, Birla Opus Paints has a complete portfolio featuring a range of superior products across categories like interiors, exteriors, waterproofing, enamel paints, wood finishes, and wallpapers. With six manufacturing plants spread across India, Birla Opus Paints is well positioned to be amongst the market leaders in the decorative paints category. The brand aims to inspire people to turn their surrounding spaces into their very own masterpiece.


***

No comments:

Post a Comment