Showing posts with label ' युवा डान्सिंग क्वीन'. Show all posts
Showing posts with label ' युवा डान्सिंग क्वीन'. Show all posts

Tuesday, 10 December 2019

शिकारी आणि काळेधंदे मधील अभिनेत्री नेहा खान आता ' युवा डान्सिंग क्वीन' च्या मंचावर !!

 अभिनेत्री नेहा खान हे नाव सध्या माहित नसेल अशी फारच थोडीथोडकी मंडळी महाराष्ट्र्रात असावी .कारणही तेवढंच तगडं आहे . बॉलिवूड चे बोल्डनेस आणि हॉटनेस मराठी चित्रपटसृष्टीला दाखवणारी शिकारी फेम अभिनेत्री नेहा खान ही तिच्या  चित्रपटामुळे  महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली . प्रेक्षक बॉलिवूड मध्ये दाखवले जाणारे बोल्ड सिनेमे पाहू शकतात तर आपल्या भाषेतील सुद्धा पाहू शकतील आणि असा सिनेमा भरपूर प्रेक्षक ही जमवू शकेल असा विचारही आधी कोणी केला नव्हता .  मात्र नेहा खान नावाचं एक झंझावाती सौंदर्याने आणि अभिनयाने भरलेलं वादळ  शिकारी या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला दिलं आणि मराठी तरुण प्रेक्षकांनी ते अंगवळणी ही करून घेतलं.  . 
झी युवावर ११ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या आणि बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता दिसणाऱ्या  ' युवा डान्सिंग क्वीन'  या सेलेब्रिटी डान्सिंग  रिऍलिटी कार्यक्रमाद्वारे अभिनेत्री नेहा खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी ती  शिकार करणार आहे तिच्या नृत्यातील अदांनी. अभिनय तर ती उत्तम करतेच , तिच्या सौंदर्याचा महाराष्टात भरपूर फॅन फॉलोवरही आहे . आता ती डान्स या माध्यमाद्वारे प्रेक्षकांना ती किती टॅलेंटेड आहे  ह्याचं ही दर्शन देणार  आहे . सध्या ती डान्स चे वेगवेगळे फॉर्म्स च्या रिहर्सल रोज १२-१२ तास करत आहे . ज्यात कॉन्टेम्पररी आणि फोक डान्स यावर ती भरपूर फोकस करत आहे .
युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमातील एंट्री बद्दल नेहा ला विचारले असता ती म्हणाली , मला या सेलेब्रिटी डान्स कार्यक्रमात आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे मला खरंच आनंद होत आहे . शिकारी हा सिनेमा आणि काळे धंदे ह्या वेब सिरीज मधून मी युथ च्या हृदयात नक्कीच बसले आहे पण आता मला सर्व वयोगटातील लोकांपर्यंत पोहोचायचं आहे .आणि मला वाटत माझं नृत्य हे माझं स्वप्न पूर्ण करेल .या युवा डान्सिंग क्वीन मुळे  मी माझ्या या सर्व फॅन्स च्या हृदयावर राज्य करिन  आणि ही ट्रॉफी सुद्धा जिंकीन अशी मला आशा आहे . 

Monday, 9 December 2019

राणा दा च्या नंदिता वाहिनी आता ' युवा डान्सिंग क्वीन' चा स्टेज गाजिवनार !!


छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री काडगांवकर अल्पावधीत घराघरात प्रसिद्ध झाली. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणारी ही नंदिता वहिनी म्हणजेच धनश्री काडगांवकर हीने सगळ्यांचे विशेष लक्ष वळवून घेतले . तिने या मालिकेत अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यानेही प्रेक्षकांना भुरळ घातली . सध्या या मालिकेतील तिचा ट्रॅक संपला असला तरी ती आता एका नव्या रूपात झी युवावर येणाऱ्या सेलिब्रिटी डान्स रिऍलिटी शो मध्ये झळकणार आहे . युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम ११ डिसेंबर पासून बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता झी युवावर पहायला मिळेल .
धनश्री काडगांवकर  ह्या अभिनेत्रीने नंदिता वहिनी हे पात्र एवढे उत्तम रंगवले की लोकांना त्या पात्राचा राग येऊ लागला . अर्थात हीच तिच्या कामाची पोचपावती आहे . मात्र या मालिकेतील तिचा लुक हा अगदीच घरेलू होता.. फक्त साडी,केसांना तेल अश्या रूपातील धनश्री आता मात्र पूर्णपणे स्वतःचा मेकओव्हरकरून एका वेगळ्याच रूपात  युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमातून प्रेक्षकांना दिसणार आहे . सौंदर्य आणि नृत्य या दोन्हीं कलांनी धनश्री खऱ्या अर्थाने ता ' युवा डान्सिंग क्वीन'  चा स्टेज गाजिवनार .या कार्यक्रमात तिच्याबरोबर नावाजलेल्या अनेक सेलेब्रिटी डान्सर पहायला मिळतील आणि त्यांच्यात एक जंगी चुरस सुद्धा रंगेल. सौंदर्य आणि अदाकारी ने ठासून भरलेल्या या सौंदर्यवती जेव्हा 'युवा डान्सिंग क्वीन' च्या रंगमंचावर थिरकणार त्यामुळे आता ऐन थंडीत रंग चढणार, महाराष्ट्राचं टेंपरेचर वाढणार.
'युवा डान्सिंग क्वीन' बद्दल विचारले असता धनश्रीने सांगितले,"एक्सप्रेशन देणं हा माझा विशेष गुण आहे. लोकनृत्य मी केलं आहे पण वेस्टर्न डान्स मी जराही नाही केलय. आधी मला डान्स करायला खूप आवडायचं , मी भरतनाट्यम सुद्धा शिकलेली आहे , पण माझी मालिका व इतर गोष्टीमुळे मला अजिबातच डान्स करायला मिळाला नाही . बऱ्याच वर्षात मी डान्स केलेला नाही आणि त्यामुळे मला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर डान्स करायची खरं तर भीती वाटतेय . पण पुन्हा एकदा प्रत्येक आर्टिस्ट ला तो झोन ब्रेक करण गरजेचं आहे .. त्यामुळे झी युवा ने ही मला मोठी संधी दिली आहे त्यासाठी मी नक्कीच भरपूर मेहनत घेईन.' 
या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अद्वैत दादरकर असून हिरकणी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शो चे परीक्षण करणार आहेत.