Showing posts with label 'अजिंक्यतारा'. Show all posts
Showing posts with label 'अजिंक्यतारा'. Show all posts

Friday, 29 May 2020

Zee Yuva | 'अजिंक्यतारा' प्रसाद ओकच्या आठवणींना उजाळा!!!


आपल्या सगळ्यांच्या लाडक्या 'सा रे ग म प' या स्पर्धेला यंदा २५ वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने  'एक देश एक राग' हा खास आणि दिमाखदार सोहळा अनुभवण्याची संधी 'झी युवा' वाहिनीवर मिळणार आहे. २५ वर्षांच्या प्रवासात विविध पर्व आपण पाहिली आहेत. 'एक देश एक राग'च्या निमित्ताने 'सा रे ग म प'च्या कुटुंबातील अनेक सदस्य पुन्हा एकत्र आल्यामुळे, आठवणींना उजाळा मिळाला. मराठी सेलिब्रिटी मंडळींच्या पर्वाचा विजेता प्रसाद ओक याच्याही अनेक आठवणी ताज्या झाल्या आहेत.

या स्पर्धेत सहभागी होण्याची मिळत असलेली संधी नाकारण्याचा केलेला विचार, ते स्पर्धेचा विजेता होणे, असा अभिनेता प्रसाद ओक याचा प्रवास खूपच अप्रतिम ठरला होता. तो काळ म्हणजे सुवर्णकाळ होता असं सांगायला प्रसाद ओक कधीही विसरत नाही. दिवसभर सुरु असलेलं चित्रीकरण, त्यानंतर रात्री उशिराने मिलिंद इंगळे यांच्या घरी जाणं, रियाज करणं अशा कठोर मेहनतीनंतर, त्याने हे विजेतेपद मिळवले आहे. 'अजिंक्यतारा' प्रसाद ओक अशी बिरुदावली मिळाल्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. 'एक देश एक राग'मध्ये सहभागी झाल्यामुळे या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे प्रसाद ओक यांनी म्हटले आहे.
'सा रे ग म प'च्या कुटुंबियांनी एका अनोख्या पद्धतीने एकत्र येऊन २५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. सेलिब्रिटी पर्वाचा विजेता प्रसाद ओकसह अनेक गायक, कलाकार मंडळी यात सहभागी झाली होती. हा दिमाखदार सोहळा 'झी युवा' वाहिनीवर रविवार  ३१ मे  या दिवशी संध्याकाळी ७   वाजता पाहायला विसरू नका.