Showing posts with label 'माझा होशील ना'. Show all posts
Showing posts with label 'माझा होशील ना'. Show all posts

Monday, 24 February 2020

'माझा होशील ना' मालिकेतून या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा करणार छोट्या पडद्यावर पदार्पण

जवळपास गेली दोन वर्षं प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेफेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. 'माझा होशील नाहि नवी मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेनुकतंच या मालिकेचे प्रोमोज झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाले.
या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण गौतमी मुख्य भूमिकेत दिसणार आहेपण मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला असून हा अभिनेता कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहेमुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेज्येष्ठ दिवंगत अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा नातू आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेया मालिकेत सुनील तावडेविनय येडेकरनिखिल रत्नपारखीअच्युत पोतदारविद्याधर जोशी  असे अनेक प्रसिद्ध कलाकार देखील झळकणार आहेतमाझा होशील ना ही मालिका  मार्च पासून रात्री  वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.